Randhe : रांधे गावात श्री स्वामी भक्तांचा जनसागर; महाआरती आणि महाप्रसादासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
रांधे गाव श्री स्वामी समर्थ महाआरती | अनिल आवारी स्वामी सेवा उपक्रम
पारनेर तालुक्यातील रांधे गावात श्री स्वामी समर्थांच्या महाआरतीसाठी आणि महाप्रसादासाठी हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. अनिल आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले.
रांधे, ता. पारनेर (प्रतिनिधी) :
पारनेर तालुक्यातील रांधे या छोट्याशा गावात गुरुवारी श्री स्वामी समर्थ भक्तांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला. गावातील भक्तिमय वातावरण, श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा गजर आणि भाविकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला होता.
