NASHIK NEWS: “पावसात रखडलेले काम; सप्तशृंग घाटात भाविकांचा प्रवास संकटात!”…पहा सविस्तर
NASHIK NEWS: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असले तरी, त्यांचा प्रवास हा श्रद्धा नाही तर धाडसाची परीक्षा ठरत आहे. सप्तशृंग घाटमार्गाची अवस्था अत्यंत धोकादायक असून, स्वागत कमानीपासून ते गडावरील कर नाक्यापर्यंतचा सुमारे ९ किमीचा रस्ता खड्डे, तुटलेली सुरक्षा कथडी, कोसळणारे दगड, रखडलेली कामे आणि सूचना फलकांचा अभाव यामुळे अपघातासाठी सापळा ठरत आहे.
नाशिक | Nashik
NASHIK NEWS: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असले तरी, त्यांचा प्रवास हा श्रद्धा नाही तर धाडसाची परीक्षा ठरत आहे. सप्तशृंग घाटमार्गाची अवस्था अत्यंत धोकादायक असून, स्वागत कमानीपासून ते गडावरील कर नाक्यापर्यंतचा सुमारे ९ किमीचा रस्ता खड्डे, तुटलेली सुरक्षा कथडी, कोसळणारे दगड, रखडलेली कामे आणि सूचना फलकांचा अभाव यामुळे अपघातासाठी सापळा ठरत आहे. ४० कोटी रुपये खर्चून मे पासून सुरू असलेल्या कामांचा दर्जा, गती आणि नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पावसामुळे आणि धुक्यामुळे कामांना अडथळा येतोय हे मान्य, पण त्यातून भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य आहे. भक्तांना भगवतीच्या दर्शनासाठी निघताना ‘भगवती भरोसे’ घाट चढावा लागतो, हे शासनासाठी लाजिरवाणं चित्र आहे. वाहनचालक आणि भाविक संतप्त असून, सुरक्षेबाबतची बेफिकिरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. श्रद्धा आहे, पण जीव मोलाचा आहे.
सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी निघालेला प्रवास ‘श्रद्धेचा नव्हे, तर धाडसाचा!’:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी (NASHIK NEWS) दरवर्षी हजारो भाविक गडावर ये-जा करत असतात. मात्र, या पवित्र यात्रेला सध्या अडथळ्यांची शर्यत बनलेली आहे. सप्तशृंग घाट (NASHIK NEWS) मार्गाच्या स्वागत कमानीपासून ते गडावरील ग्रामपंचायतीच्या कर नाक्यापर्यंतचा संपूर्ण रस्ता धोकादायक अवस्थेत आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, तुटलेली कथडी, खचलेले रस्ते, रखडलेले कॉक्रिटीकरणाचे काम, आणि सूचनादर्शक फलकांचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता सतत निर्माण होते.
या मार्गावरून प्रवास करताना भाविकांचे जीव मुठीत धरावे लागतात. देवीच्या दर्शनाची आस मनात ठेवत निघालेल्या भाविकांना सुरक्षेअभावी ‘भगवती भरोसे’ प्रवास करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती शासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देते. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था दयनीय, ही बाब भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा विषय बनली आहे. हा रस्ता श्रद्धेचा आहे, पण सध्या तो मृत्यूचा सापळा ठरत आहे!
गडावर आगामी नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी सुट्या तसेच दिनविशेष निमित्त भाविकांचा सततचा राबता असणार हे निश्चित आहे. दरवर्षीप्रमाणे यात्रा काळात सुमारे २० ते २५ लाख भाविकांची हजेरी गडावर लागते, यावरून भक्तांच्या श्रद्धेची आणि भक्तीभावाची कल्पना येते.यात्रा काळात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असली, तरी उर्वरित काळात खासगी वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते.
सध्या आषाढ मास सुरू असल्याने, मंगळवार आणि शुक्रवार या शुभ दिवशी देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी देखील भाविकांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. यामुळे घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हे सर्व लक्षात घेता, गडावर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे.

रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. त्यात खबरदारीच्या सूचना देणाऱ्या फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना अंदाजे मार्गक्रमण करत पुढे सरकावे लागते. रस्ता काँक्रिटीकरणाचे काम जागोजागी अर्धवट असल्याने तसेच त्यांच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनचालकांना घाटाच्या दरीच्या बाजूने डांबरी रस्त्यांच्या एका लेनवरून वाहने चालवत घाट उतरावा लागतो.
डांबरी रस्त्यांवर अस्तर उखडलेले आहे. जागोजागी खड्डे पडलेले. काँक्रीटीकरण कामामुळे त्याच्या दुरूस्तीचे काम होत नाही. कथड्याकडील भराव खचलेला आहे. यामुळे वाहनांना अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.
मे महिन्यापासून सप्तश्रृंगघाटात ९ किलोमीटर अंतरादरम्यान रस्त्याच्या काँक्रिटीकरण, सुरक्षा कथड्यांची व्यवस्था, तसेच कोसळणाऱ्या दरडींना (NASHIK NEWS) अटकाव घालणाऱ्या संरक्षक जाळ्या बसवणे यांसारखी महत्वाची विकासकामे सुरु आहेत. यासाठी तब्बल ४० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि महावितरण या विभागांची जबाबदारी आहे.

मात्र, कामांना खीळ बसवणारा मुख्य अडथळा म्हणजे मे महिन्यापासूनच सुरु झालेला पाऊस. विशेषतः गडावर कोसळणारा पाऊस इतर भागापेक्षा सर्वाधिक असल्याने, धुक्यामुळे दिवसा विकासकामे थांबतात, असे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पण याचदरम्यान, भाविकांच्या सुरक्षेकडे घाटात दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अवघड वळण, तुटलेले कथडे, कोसळणारे दगड अशा धोकादायक ठिकाणी सूचना किंवा खबरदारी घेणाऱ्या फलकांची गरज भासते आहे. वाहनचालक आणि भाविक यांची ही नाराजी दुर्लक्ष करता येणार नाही!
भाविकांची होणारी गैरसोय:

शासनाकडून करण्यात येत असलेले काम रखडलेले आहे. ही वस्तुस्थिती आता लपवून राहिलेली नाही. ग्रामपंचायत हद्दीत गटारीचे काम सुरू असले तरी, जागोजागी रस्ता खोदल्यामुळे संपूर्ण गल्लीबोळात खालीवर झालेला मार्ग आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या असुविधेमुळे स्थानिक नागरिक आणि भाविक दोघेही त्रस्त झाले आहेत.
अधर्वट दगडी काम पाहता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.तसेच गडावर देवीच्या मंदिराचे काम सुरू असून, गाभान्याच्या परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. प्रसाधनगृहांची दुर्गंधी मंदिर (NASHIK NEWS) परिसरात वाढलेली असल्याने श्रद्धाळूंना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
गाभाऱ्यात पेडदर्शन, रोपवे आणि पायरी मार्गाने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन कोलमडलेले आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याकडे ट्रस्टचे दुर्लक्ष असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. आता शासन, ग्रामपंचायत आणि ट्रस्ट यांनी या समस्यांवर तातडीने लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे.
सप्तशृंग घाटात रस्ता काँक्रिटीकरण, सुरक्षा कथड्यांचे मजबुतीकरण, तसेच दरडींना संरक्षक जाळ्या बसवणे ही अतिशय महत्त्वाची कामे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरु आहेत. या कामांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पडत आहे. हजारो श्रद्धाळू दरवर्षी गडावर येतात आणि त्यामुळे या घाटातील सुरक्षित रस्ते आणि मजबूत संरचना अत्यंत गरजेच्या आहेत.
मात्र, यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने कामांना अडथळा निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे दरडींचा धोका वाढलेला असून, कामात अडथळे येत आहेत. तरीही प्रशासन नवरात्रोत्सवापूर्वी घाटातील कामे पूर्ण करण्यावर भर देत आहे.हे काम वेळेत पूर्ण झाले, तर भाविकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवास अनुभवता येईल. त्यामुळे आता संबंधित विभागांसमोर वेळेवर आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
