Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

OPERATION MAHADEV: पहलगाम हल्ल्याचा सूड! ऑपरेशन महादेव’ भारताचा सर्जिकल स्ट्राईक; अमित शाह यांचा मोठा खुलासा

OPERATION MAHADEV: नवी दिल्लीच्या पावसाळी अधिवेशनात आज राष्ट्राच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा गाजला आहे. ऑपरेशन सिंदूर! कालपासून सुरु असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या या ऑपरेशनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एक धडकी भरवणारा आणि त्याहून अधिक गर्वाची भावना निर्माण करणारा खुलासा केला.

नवी दिल्ली | New Delhi

OPERATION MAHADEV: नवी दिल्लीच्या पावसाळी अधिवेशनात आज राष्ट्राच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा गाजला आहे. ऑपरेशन सिंदूर! कालपासून सुरु असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या या ऑपरेशनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एक धडकी भरवणारा आणि त्याहून अधिक गर्वाची भावना निर्माण करणारा खुलासा केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या  बैसरन खोऱ्यात काही दिवसांपूर्वी पर्यटकांवर करण्यात आलेल्या निर्दयी हल्ल्यातील तिन्ही दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी स्पष्ट शब्दांत दिली.

अमित शाह म्हणाले, “हल्लेखोरांमध्ये अफगाण लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी (OPERATION MAHADEV) आणि कुख्यात दहशतवादी जिब्रान याचाच समावेश होता. या तिघांनी धर्म विचारून निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना होती. मात्र आपल्या सुरक्षा दलांनी त्यांचं योग्य ते उत्तर दिलं आहे ते म्हणजे तीनही दहशतवादी ठार!”

या निर्णायक कारवाईसाठी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जोरदार अभिनंदन करत अमित शाह यांनी मृतांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. संसदेत सरकारचा निर्धार स्पष्ट झाला आहे. भारत दहशतवाद सहन करणार नाही, आणि प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर अधिक कठोरपणे दिलं जाईल!

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament) जोरदार गाजत असून, या अधिवेशनात काल आणि आज विशेष लक्ष वेधून घेतलेली बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा. देशाच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या मुद्द्यावर आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत थरारक माहिती दिली.

ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. ही कारवाई लष्कर व जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाने पार पडली असून, या ऑपरेशनमुळे संपूर्ण देशात एक सकारात्मक संदेश गेला आहे.

OPERATION MAHADEV
OPERATION MAHADEV

ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक कारवाई नव्हे, तर भारताच्या दहशतवादविरोधी (OPERATION MAHADEV) धोरणाचा स्पष्ट पुरावा आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध नागरिकांची हत्या केली, याचा मी निषेध करतो, असे स्पष्ट शब्दांत सांगत अमित शाह यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली.

संसदेत आज गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती देताना, पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता, असं ठामपणे सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, या घटनेवर चर्चा होणं अत्यावश्यक आहे आणि ती झालीही पाहिजे.

यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आधी ‘ऑपरेशन महादेव’ (OPERATION MAHADEV) ची माहिती दिली. या कारवाईत सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन धोकादायक दहशतवादी सेना, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, यातील सुलेमान हा लष्कर ए तोयबाचा कमांडर होता आणि त्याचा पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात सहभाग होता, अशी माहिती देखील त्यांनी दिली. ही माहिती केवळ दहशतवाद्यांवर झालेल्या कारवाईचा तपशील नव्हे, तर भारत सरकारचा हा स्पष्ट संदेश आहे. देशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्यांचा शेवट अटळ आहे!

OPERATION MAHADEV
OPERATION MAHADEV

लोकसभेत आज बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत गंभीर आणि संवेदनशील माहिती दिली. ते म्हणाले की, “अफगाण लष्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारातील दहशतवादी (Terrorist) होता.” या दहशतवाद्यांनी देशाच्या भूमीत नृशंसता दाखवली होती.

शाह यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी आज सदनाला हे सांगतो की, ज्यांनी बैसरनच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्यात हे तिन्ही दहशतवादी होते. या तिघांचाही खात्मा करण्यात आला आहे.” या निर्णायक कारवाईसाठी त्यांनी लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांना धन्यवाद दिले.

या दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध नागरिकांची हत्या केली, ही घटना देशाच्या अंत:करणाला हादरवणारी आहे. त्यामुळे “मी निषेधे करतो आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”, असं शाह म्हणाले. हे वक्तव्य केवळ एक माहिती नव्हे, तर सरकारचा निर्धार आहे. दहशतवाद्यांचा खात्मा हा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अनिवार्य आहे.

कसं राबवलं ऑपरेशन महादेव?

OPERATION MAHADEV
OPERATION MAHADEV

ऑपरेशन महादेव (Operation Mahadev) या महत्त्वाच्या कारवाईविषयी माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत धडकी भरवणारे तपशील उघड केले. त्यांनी सांगितले की, २३ एप्रिलला जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात पहिला निर्णय घेतला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ द्यायचे नाही. ही घोषणा केवळ निर्णय नव्हती, तर कृतीसुद्धा होती! शाह यांनी ठामपणे सांगितले की, “आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही, त्यांचा खात्मा केला.” हे वक्तव्यच सरकारच्या निर्धाराची साक्ष देतं.

पुढे त्यांनी सांगितले की, २२ मे रोजी गुप्तचर यंत्रणेला एक महत्त्वाची माहिती मिळाली की, एका गावात दहशतवादी उपस्थित आहेत. यानंतर सुरू झाली माहितीची तपासणी. २२ मे ते २२ जुलै या कालावधीत दहशतवाद्यांचे सिग्नल तपासण्यात आले, आणि त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली गेली. ही कारवाई म्हणजे केवळ दहशतवाद्यांचा खात्मा नव्हे, तर भारताच्या सर्जिकल डावपेचाची स्पष्ट जाणीव होती!

२२ जुलैला घडलेली घटना म्हणजे ऑपरेशन महादेवच्या यशस्वी टप्प्याचा निर्णायक क्षण होता. याच दिवशी सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचे समजले, आणि पुढील कारवाईचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. कोणतीही वेळ न दवडता चार पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. या जबरदस्त मोहिमेचा परिपाक म्हणजे, सोमवारी तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ही कारवाई अचूक नियोजन, वेळेवर माहिती आणि सुरक्षा यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण ठरली.

या दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली, यामागे एक महत्त्वाची भूमिका एनआयएने बजावली. त्यांनी जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले, आणि त्यातून चार जणांची ओळख पटली. यात स्पष्ट झाले की, ज्यांचा खात्मा करण्यात आला तेच पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते. ही कारवाई म्हणजे फक्त तीन अतिरेक्यांचा अंत नव्हे, तर दहशतवाद्यांच्या बुरख्याआड लपलेल्या नेटवर्कचा भेद करणारा निर्णायक प्रहार होता!

Leave a comment