Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

TARIFF WAR: भारतावर बोट ठेवणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं”; अमेरिकेला भारताचं थेट प्रत्युत्तर! पहा सविस्तर

TARIFF WAR: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफच्या धमक्यांचे लक्ष्य बनवले असून, यावेळी त्यांनी थेट रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीचा मुद्दा उचलून धरला आहे. सोमवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक आक्रमक पोस्ट करत म्हटले, की "भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, आणि तेच तेल खुल्या बाजारात विकून प्रचंड नफा कमावतो.

नवी दिल्ली | New Delhi

TARIFF WAR: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफच्या धमक्यांचे लक्ष्य बनवले असून, यावेळी त्यांनी थेट रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीचा मुद्दा उचलून धरला आहे. सोमवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक आक्रमक पोस्ट करत म्हटले, की “भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, आणि तेच तेल खुल्या बाजारात विकून प्रचंड नफा कमावतो. युक्रेनमध्ये रशियाच्या युद्धमशीनमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना भारत शांतपणे नफ्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यावरून स्पष्ट आहे की भारताला या मानवी संकटाशी काहीही देणेघेणे नाही. म्हणूनच भारतावर टॅरिफ वाढवणे हे योग्य ठरेल.”

या वक्तव्यानंतर भारत सरकारकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले की, “आरोप करणाऱ्या देशांनी प्रथम स्वतःकडे बघावे.” रशियाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलाबद्दल भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत नाही. हे व्यवहार राष्ट्रीय हित जपत पारदर्शक पद्धतीने केले जात आहेत.

ट्रम्प यांची ही भाषा त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र भारताने स्पष्ट केलं आहे की, अशा धमक्यांनी भारताच्या धोरणांवर कुठलाही परिणाम होणार नाही. उलट, आपले राष्ट्रीय हित हे सर्वोच्चच राहील, मग टॅरिफ येऊ दे किंवा दंड!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत अवतरले असून, त्यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल, असे जाहीर करून खळबळ उडवली होती. मात्र सोमवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आणखी एक इशारा दिला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्याच्यावर आणखी टॅरिफ आकारले जाईल.

या प्रकारामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, भारत सरकारने मात्र शांततेने पण ठामपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला उत्तर देताना भारताने म्हटले आहे की, “आरोप करणाऱ्या देशांनी प्रथम स्वतःकडे बघावे.”

भारताच्या मते, रशियाकडून तेल खरेदी करणे हे पूर्णतः कायदेशीर असून, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून देशहितासाठी हे व्यवहार केले जात आहेत. एकंदरीत, ट्रम्प यांच्या राजकीय हेतूंनी प्रेरित या धमक्यांना भारताने फारसं गांभीर्याने न घेता अत्यंत प्रगल्भ उत्तर देत, जागतिक स्तरावर आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

TARIFF WAR
TARIFF WAR

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर कडक शब्दांत (TARIFF WAR) नाराजी व्यक्त केली आहे. भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या कच्च्या तेलाबद्दल त्यांनी थेट आक्षेप घेतला असून, रशियाकडून खरेदी केलेले कच्चे तेल भारत खुल्या बाजारात विकतो आणि भरपूर नफा कमावतो, असा आरोप त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये रशियाच्या वॉर मशिनमुळे जेव्हा निर्दोष लोक मारले जात आहेत, तेव्हा भारत मात्र या बाबीशी अनभिज्ञ असल्यासारखं वागत आहे. यावरून त्यांनी रोष व्यक्त करत सांगितले की, “भारताला याचा काहीही देणेघेणे नाही, आणि म्हणूनच मी भारतावरील टॅरिफ (TARIFF WAR) आणखी वाढवणार आहे.”

ट्रम्प यांनी हे सगळे वक्तव्य ट्रूथ या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केलं असून, त्यात त्यांच्या शैलीप्रमाणे भारतावर टीका आणि इशाराही दिला आहे. या विधानानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारत-अमेरिका आर्थिक संबंधांवर वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताचं सडेतोड ट्रम्पना उत्तर: “तेलाच्या आयातीसाठी अमेरिकेनेच प्रोत्साहन दिलं होतं!”

TARIFF WAR
TARIFF WAR

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या टॅरिफ वाढीच्या इशाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ठाम प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी त्यांच्या X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरुन (TARIFF WAR) एक सडेतोड निवेदन पोस्ट करत स्पष्ट केलं आहे की, रशियाकडून तेल आयात केल्यामुळे भारत अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या रडारवर असला तरी यामागे कारण वेगळं आहे.

रणधीर जयस्वाल म्हणाले की, “युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन तेलाचा पुरवठा युरोपकडे वळवण्यात आला. याच काळात जागतिक ऊर्जा बाजारपेठ कोलमडू नये म्हणून भारताने रशियाकडून तेल घेण्यास सुरुवात केली.” आणि विशेष बाब म्हणजे, या आयातीसाठी अमेरिकेनेच भारताला प्रोत्साहन दिलं होतं, हे त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केलं आहे. या वक्तव्यामुळे भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अधिक मजबूत झाली असून, ट्रम्प यांच्या आरोपांना तथ्यांच्या आधारे चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यामुळे अमेरिका-भारत संबंधांत नव्या वळणाची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतावर टीका करणारे देश हे रशियासोबत व्यापार करत असल्याची टीका प्रवक्त्यांनी केली आहे. भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध होण्यासाठी भारताने रशियाकडून तेल आयात केले. जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे भारताला हे करणे भाग पडले, मात्र जे देश भारतावर टीका करतात त्या देशांनी देखील रशियासोबत व्यापर केल्याचे समोर आले आहे. आमच्याप्रमाणेच या देशांनाही हा व्यापर करणे आवश्यक असल्याने सर्व चालू आहे, आहे, असा आरसा भारताने दाखवला आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ (TARIFF WAR)  धमक्यांवर भारताने आता ठोस आकडेवारीसह प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारतावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केलं की, युरोपियन युनियनचा रशियासोबतचा द्विपक्षीय व्यापार २०२४ मध्ये तब्बल ६७.५ अब्ज युरोवर पोहोचला, जो भारताच्या रशियासोबतच्या एकूण व्यापाराच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहे.

ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सांगितलं की, २०२३ मध्ये हा व्यापार १७.२ अब्ज युरो होता आणि तरीही कोणी युरोपला प्रश्न विचारत नाही. शिवाय, २०२४ मध्ये युरोपियन एलएनजी (Liquefied Natural Gas) आयात विक्रमी १६.५ दशलक्ष टनांवर पोहोचली, ज्याने २०२२ मधील १५.२१ दशलक्ष टनांचा विक्रमही (TARIFF WAR) पार केला आहे. या स्पष्ट आणि ठाम आकड्यांमुळे भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अजून ठाम झाली असून, युरोप आणि अमेरिका यांचं दुटप्पी धोरण उघडं पडलं आहे. भारत फक्त स्वतःच्या उर्जासुरक्षेसाठी झगडतोय, असं भारताने दाखवून दिलं आहे.

अमेरिकेचा रशियाशी युरेनियमचा व्यापार:

TARIFF WAR
TARIFF WAR

जगासमोर भारताने (TARIFF WAR) पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलं आहे की, अमेरिका स्वतः रशियाशी युरेनियमचा व्यापार करत आहे, आणि तरीही भारतावर टिका केली जाते, हे अतिशय दुटप्पी वागणूक दर्शवते आहे.

या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, अमेरिका त्यांच्या आण्विक क्षेत्रासाठी, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी, फर्टिलायझर आणि रासायनिक उत्पादनांसाठी अनेक वर्षांपासून रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लुओराईड विकत घेत आहे. त्यामुळे भारतावर बोट दाखवण्याआधी, अमेरिकेने स्वतःकडे पाहावे, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.

यासोबतच, भारताने हेही ठणकावून सांगितले आहे की, राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना भारत करत राहील. भारताची ऊर्जा गरजा आणि नागरिकांचे हित लक्षात घेता, देश कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, हे या निवेदनातून ठळकपणे समोर आलं आहे.

Leave a comment