KRUSHI NEWS MAHARASHTRA : उपाशीपोटी वाऱ्याच्या दिशेने फवारणी, जीवावर बेतणारी चूक पहा सविस्तर…..
KRUSHI NEWS MAHARASHTRA : उपाशीपोटी वाऱ्याच्या दिशेने फवारणी, जीवावर बेतणारी चूक होतेय वाऱ्याच्या दिशेने फवारणी केल्यास औषधाचे कण आपल्या नाकाद्वारे किंवा तोंड द्वारे आपल्या शरीरात जाऊन हानी करू शकते यामुळे शेतकऱ्यांने आपली काळजी घेणे आवश्यक आहे. याचा आपल्या जीवनावर आणि शेतकऱ्यांसाठी धोका निर्माण होत आहे.
KRUSHI NEWS MAHARASHTRA :
उपाशीपोटी वाऱ्याच्या दिशेने फवारणी, जीवावर बेतणारी चूक होतेय वाऱ्याच्या दिशेने फवारणी केल्यास औषधाचे कण आपल्या नाकाद्वारे किंवा तोंड द्वारे आपल्या शरीरात जाऊन हानी करू शकते यामुळे शेतकऱ्यांने आपली काळजी घेणे आवश्यक आहे. याचा आपल्या जीवनावर आणि शेतकऱ्यांसाठी धोका निर्माण होत आहे.
पालघरमध्ये कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा सध्या पिकांवर किडीत वाढ झालेली असल्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र, उपाशीपोटी फवारणी करणे, वाऱ्याच्या दिशेने फवारणी करणे किंवा फवारणीवेळी मास्क न घालणे यांसारख्या चुका शेतकऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी सांगितले की, कीडनाशकांची फवारणी करताना नेहमी पूर्ण अंग झाकणारे कपडे,
हातमोजे, बूट व मुखपट्टी वापरणे आवश्यक आहे. उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधेचा धोका अधिक असतो. त्यामुळे जेवण करूनच फवारणीस सुरुवात करावी. फवारणी करताना वाऱ्याची दिशा ओळखा आणि वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा, अन्यथा औषध श्वसनातून शरीरात जाऊन जीवघेणा
शेती करताना कीटकनाशक हे एक गरजेचे साधन आहे, मात्र त्याचा वापर करताना थोडीशीही बेपर्वाई जीवावर बेतू शकते. शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने व सुरक्षिततेसह फवारणी करावी, हा आमचा आग्रह आहे. सोमनाथ पिंजारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, पालघरपरिणाम होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

फवारणीच्या वेळेस डोके झाकणारा टोप, चष्मा, हातमोजे, बूट आणि मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फवारणी झाल्यानंतर कपडे बदलावेत व साबणाने अंघोळ करावी, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या बाटलीवरील लेबल व सूचना काळजीपूर्वक वाचूनच वापरावे. कोणतेही औषध अंदाजाने किंवा इतरांच्या सल्ल्यावरून वापरू नये. औषधाचे प्रमाण अधिक घेतल्यास फसवणूक तर होतेच, शिवाय पर्यावरण व आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे शास्त्रशुद्ध प्रमाणातच फवारणी करावी. फवारणी करताना नळीमध्ये अडथळा आल्यास तोंडाने फुंकर मारणे टाळावे. यामुळे कीटकनाशक तोंडातून आत जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागार्फत देण्यात आल्या आहेत.
