Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

UDDHAV THACKERAY: “शिवसेना-मनसे युतीच्या मागे कोणती गोपनीय योजना? उद्धव ठाकरेंची जोरदार प्रतिक्रिया!”

UDDHAV THACKERAY: "उद्धव ठाकरे यांची मोदींवर जोरदार टीका; उपराष्ट्रपती निवडणुकीत तडकाफडकी निर्णयावर प्रश्न! राहुल गांधींच्या स्नेहभोजनाला प्रतिसाद; दिल्लीतील राजकीय घडामोडींवर ताजी अपडेट!"

नवी दिल्ली | New Delhi

UDDHAV THACKERAY: मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच महाराष्ट्रातील राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. नुकतेच उद्धव ठाकरे दिल्ली दौर्‍यावर असून, ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आज दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

या पत्रकार परिषदेत, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी (UDDHAV THACKERAY) ठामपणे म्हटले, “युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघं भाऊ पुरेसे आहोत; तिसऱ्याची गरज नाही!” या वक्तव्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीची शक्यता पुन्हा चर्चेत आली असून, मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत नवा रंग भरू शकतो.

तसेच, ‘इंडिया’ आघाडीच्या संदर्भात देखील उद्धव ठाकरेंनी (UDDHAV THACKERAY) स्पष्ट केलं की, “कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, ही लढाई लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे.” त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची प्रबळ चर्चा सुरु आहे.

युतीचा निर्णय घ्यायला आम्ही भाऊ सक्षम:

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY)  यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबतच्या प्रश्नावर दिलेले उत्तर विशेष लक्षवेधी ठरले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले, “युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम आहोत, त्यासाठी तिसऱ्याची आवश्यकता नाही.” या ठाम वक्तव्यानंतर, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे. एकीकडे ठाकरे कुटुंबातील सुसंवादाचे संकेत मिळत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हं दिसत आहेत.

त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत, असेही स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे, इंडिया आघाडीत शिवसेनेचा ठाम आणि निर्भीड सहभाग अधिक स्पष्ट झाला आहे. एकंदरित, शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेपासून ते इंडिया आघाडीसोबतच्या निर्धारापर्यंत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे राष्ट्रीय राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आजच्या दिवसात ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार असून, या चर्चांमधून आगामी राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याचा आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण, ज्यामुळे ठाकरे कुटुंबीय जेवणासाठी गांधींच्या निवासस्थानी जाणार आहेत.

ही भेट औपचारिक असली, तरी राजकीय दृष्टिकोनातून तिचं महत्त्व लक्षणीय आहे. या सगळ्याबरोबरच, शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या खासदारांची सुद्धा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये बैठक घेणार आहेत. या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या व्यस्त दौऱ्यामुळे शिवसेनेच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, देशाच्या राजकीय नकाशावर एक नवा रंग चढताना दिसतोय.

एकनाथ शिंदेंवर टीका:

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण अधिकच तापवलं. शिंदे यांच्या भाजपशी जवळिकीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील. शिंदे मालकांना भेटत असतील तर आक्षेप नाही.” या वक्तव्याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या केंद्र सरकारशी असलेल्या संबंधांवर बोट ठेवले. यावर पुढे बोलताना उद्धव म्हणाले, “गद्दार गद्दार असतो. गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही.” अशा ठाम आणि खोचक शब्दांत त्यांनी शिंदेंच्या भूमिकेला धारेवर धरले.

उद्धव ठाकरेंचा हा संतप्त पवित्रा केवळ एकनाथ शिंदेवर नव्हे, तर त्यांच्या गटाच्या संपूर्ण राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. त्यांच्या या प्रतिक्रिया केवळ टीका नसून, आगामी राजकीय संघर्षाची झलकही देतात. उद्धव ठाकरेंच्या या भाष्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचे संकेत मिळत आहेत. ठाकरे यांची ही टीका आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

चीन दौऱ्यावरुन ठाकरेंची टीका:

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी चीन दौऱ्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. गलवान संघर्षानंतर देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला गेला, चीनविरोधाबाबत मोहिम उघडली गेली, हे आठवून देत ठाकरे म्हणाले की, “देशातील जनतेला देशभक्तीचे धडे देणारे आता स्वतः त्याच चीनला भेट देत आहेत.” त्यांनी हा दौरा फक्त शिष्टाचारापुरता नसून, मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी आहे का?

असा रोखठोक सवाल उपस्थित करत केंद्र सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. याचबरोबर ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, आणि अशा देशाशी जवळीक साधणे हे शहीद जवानांचा अपमान आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेमुळे आगामी चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोदींच्या परराष्ट्र धोरणावरही नवा वाद उभा राहिला असून, विरोधकांना टीकेचं नवं मुद्दा मिळालं आहे.

उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं?

याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारण्यात आला असता, उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात मुंबईत चर्चा करु म्हणाले. या वक्तव्यातून स्पष्ट होते की, ते पुढील राजकीय रणनीतीबाबत सखोल विचार करत आहेत. त्याचबरोबर, उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवरून हल्लाबोल करत केंद्र सरकारवर टीकेचा वर्षाव केला. त्यांचे म्हणणे आहे की, मोदींच्या परराष्ट्र धोरणांनी देशाच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवला आहे.

याशिवाय, उपराष्ट्रपती निवडणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, “उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आले? ते सध्या आहे तरी कुठे याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राजकीय चर्चांना चालना देत, त्यांनी आजच्या दिवशी राहुल गांधी यांच्याकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रण असल्याचेही सांगितले. यामुळे ठाकरे कुटुंबाच्या राजकीय हालचालींवर देशभर लक्ष लागले आहे आणि आगामी काळात मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात.

Leave a comment