सोयाबीन : पिवळ्या पडत असलेल्या सोयाबीन वर करा आता ‘या’ उपाययोजना, पहा सविस्तर
सोयाबीन : पिवळ्या पडत असलेल्या सोयाबीन वर करा आता ‘या’ उपायोजना. काय तुमचे पण सोयाबीन पिवळे पडत आहे का तेर घाबरू नका आता या वर उपाययोजना करण्यात आली आहे. या उपायाने सोयाबीन करा पुन्हा हिरवे गार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पहा सविस्तर...
सोयाबीन :
पिवळ्या पडत असलेल्या सोयाबीन वर करा आता ‘या’ उपायोजना. काय तुमचे पण सोयाबीन पिवळे पडत आहे का तेर घाबरू नका आता या वर उपाययोजना करण्यात आली आहे. या उपायाने सोयाबीन करा पुन्हा हिरवे गार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पहा सविस्तर.
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे काही ठिकाणी 15 ते 20 दिवसांचे तर काही ठिकाणी एक महिन्याचे पिक सध्या असेल व बऱ्याच ठिकाणी या कालावधीमध्ये सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येते. अगदी त्याचप्रमाणे या खरीप हंगामात देखील सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेली आहे. अशा प्रकारे जर सोयाबीन पिवळे पडले तर त्याचा पिकाच्या वाढीवर देखील परिणाम होऊ शकतो. याकरिता या समस्येवर ताबडतोब उपाययोजना करणे तेवढेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

सोयाबीन पिवळे पाडण्याचे कारण?
जमिनीच्या प्रकारांमध्ये चुनखडीयुक्त जमीन असेल तर सोयाबीन पिवळे पडते. परंतु उत्तम प्रतीची जमीन असताना देखील पीक पिवळे पडत असेल तर मात्र खत व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी खते कमी देणे किंवा अयोग्य प्रमाणात खतमात्रा देणे, मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना त्यासोबत मात्र सुक्ष्म अन्नद्रव्यांचा हवा तितका पुरवठा न करणे इत्यादी कारणे यामागे असू शकतात. महत्वाचे म्हणजे सोयाबीन पिकामध्ये गंधक, जस्त आणि लोह या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता असेल तरी देखील सोयाबीन पिवळे पडू शकते.
सोयाबीन पिवळे पडण्यामागे मुख्यतः अन्नद्रव्यांची कमतरता किंवा पिकावर येत असलेल्या रोगांचा प्रादुर्भाव ही दोन कारणे असू शकतात. समजा आता सोयाबीन लागवडीनंतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिवळे पडत असेल तर मात्र हे अन्नद्रव्यांची कमतरतेमुळेच घडू शकते व अगदी शेवटच्या टप्प्यात सोयाबीन पिवळे पडत असेल तर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता यामध्ये असू शकते. त्यामुळे जमीन आणि मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता शोधून काढणे यामध्ये खूप महत्त्वाचे आहे.
यामध्ये गंधक हरिद्रव्य तयार होण्यास आवश्यक आहे व हेच गंधक जर कमी पडले तर साधारणपणे 18 टक्क्यांपर्यंत हरिद्रव्य कमी प्रमाणात तयार होते. आपल्याला माहित आहे की पिकाच्या अन्न निर्मितीला चालना देण्यासाठी हरिद्रव्य महत्त्वाचे असते. तसेच जर जमिनीचा सामू वाढला असेल तर नत्र आणि स्फुरद ही मुख्य अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतं नाहीत. सोडियम या घटकाचे प्रमाण वाढते व अन्नद्रव्य सहजासहजी पिकाला उपलब्ध होऊ देत नाही व त्यामुळे देखील सोयाबीन पिवळे पडते. अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे सोयाबीन पिवळे पडण्याची समस्या दिसून येते.

यासाठी उपाययोजना?
शेतातील सोयाबीन नेमके कोणत्या कारणाने पिवळे पडले आहे हे अगोदर पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे पडत असेल तर जमिनीचा पोत सुधारण्याकरिता पेरणी करण्यापूर्वी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक करणे आहे. परंतु आता पेरण्या होऊन गेलेल्या आहेत व अन्नद्रव्यांची कमतरता हे लक्षण दिसत असेल तर नत्र या मुख्य अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असेल तर युरिया 20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी घेऊन त्याची फवारणी करा. गंधकाची कमतरता असेल तर सल्फेटयुक्त खताची पाच मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
लोहाची कमतरता असेल तर चिलेटेड फेरस 5g प्रति लिटर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण( ग्रेड 2) ची पाच मिली प्रतिलिटर पाणी घेऊन फवारणी करावी. जस्त या घटकाची कमतरता असेल तर चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रतिलिटर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण(ग्रेड-2) ची पाच मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता असेल तर 12:61:0 किंवा 17:40:0 किंवा 0:52:34 या खताची पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बोरॉनची कमतरता असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण(ग्रेड-2) पाच मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.19:19:19 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम अधिक अमोनियम सल्फेट,20-25 ग्रॅम अधिक चिलेटेड झिंक 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
