Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

ahilyanagar arts : अहिल्यानगरच्या गणेशमुर्तीची देशभरात डंका.

ahilyanagar arts : अहिल्यानगरच्या गणेशमूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत. गणेशमूर्ती मध्ये रंगरंगोटी व रेखावटी व विविध कारणामुळे मूर्तीचांगली बाणती. नगरयेथील विविधकारखान्या मध्ये मूर्तिकार एक से बढकर एकमूर्ती निर्माणकर्ण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अहिल्यानगरच्या गणेशमुर्ती जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारीः मूर्ती निर्मितीला वेग; रंगरंगोटीपासून ते नक्षीकाम सुरू

ahilyanagar arts :

अहिल्यानगरच्या गणेशमूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत. गणेशमूर्ती मध्ये रंगरंगोटी व रेखावटी व विविध कारणामुळे मूर्तीचांगली बाणती.
नगरयेथील विविधकारखान्या मध्ये मूर्तिकार एक से बढकर एकमूर्ती निर्माणकर्ण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अहिल्यानगरच्या गणेशमुर्ती जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारीः मूर्ती निर्मितीला वेग; रंगरंगोटीपासून ते नक्षीकाम सुरू

ahilyanagar arts
ahilyanagar arts

दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये गणेशमूर्तीला वेग आला आहे. लहान ते अतिभव्य, आखीव रेखीव, सुरेख अशा मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. येथील विविध मूर्ती निर्मिती कारखान्यांमध्ये मूर्तिकार आणि कुशल कारागीर अहोरात्र परिश्रम घेत आहेत. येथील गणेशमूर्तीना देशभरातून पसंती मिळते.

गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कायदेशीर वादामुळे मूर्तिकार आणि कारखानदारांना सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. पर्यावरणपूरक मूर्तीसाठी शासनाने नवे निकष लागू केल्यामुळे अनेक कारखान्यांचे काम थांबले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मूर्तिकारांना उशिरा का होईना, मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी, गणेशोत्सव अगदी जवळ आलेला असतानाही मूर्तिकारांनी आशावादाने पुन्हा कामाला वेग दिला असून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यंदा गणेशोत्सव

ahilyanagar arts
ahilyanagar arts

तुलनेने लवकर आल्यामुळे मूर्ती निर्मितीसाठी असलेला वेळ अत्यंत मर्यादित राहिला आहे. त्यातच मागील गोंधळामुळे सुरुवातही उशिरा झाली. त्यामुळे आता कारागीरांनी रात्रंदिवस एकच ध्यास घेतला असून मूर्तीच्या रंगरंगोटीपासून ते नक्षीकामापर्यंतची कामे सुरू आहेत. एका मूर्तीच्या मागे अनेक तासांचे कौशल्य आणि परिश्रम गुंतलेले असतात. मूर्तीकलेतील बारकावे, चेहऱ्यावरील भाव, डौलदार मांडणी, सजावट यासाठी कलाकारांचे सामूहिक काम सुरू आहे.
‘माधुरी हत्तीणी ‘वर आधारित गणेश मूर्ती…

BHARINICO यंदा कोल्हापूरमध्ये चर्चेत असलेल्या ‘माधुरी हत्तीणी’वर आधारित मूर्तीना विशेष पसंती मिळत आहे. या मूर्तीमध्ये गजाननाचे हत्तीणीवर बसलेले स्वरूप भाविकांच्या मनाला भिडत आहे. तसेच पारंपरिक स्वरूपातही लालबागचा राजा, चिंतामणी, लंबोदर, सिद्धिविनायक यांसारख्या प्रसिद्ध मूर्तीच्या प्रतिकृतींचीही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे लाटणे यांनी सांगितले.

ahilyanagar arts
ahilyanagar arts

महिलांना रोजगाराची संधी..

मूर्तीनिर्मिती कारखान्यात विशेष बाब म्हणजे येथे महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मूर्ती निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये जसे की रंगकाम, अलंकार सजावट, नक्षीकाम, थर देणे या सर्व प्रक्रियांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. पुरुषांप्रमाणेच त्याही काम करत असून त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही लक्षणीय आहे, असे लाटणे यांनी सांगितले.
डिझाईन, कलात्मक मांडणीकडे द्यावे लागते लक्ष..

नगर शहरातील गणेश मूर्तीना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जसे की मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे मूर्तीचे डिझाईन, कलात्मक मांडणी, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, ग्राहकांच्या मागणीनुसार विशेष आकार, सजावट याकडे बारकाईने लक्ष द्यावे, लागते असे ‘स्वप्निल आर्ट ‘चे प्रमुख प्रफुल लाटणे यांनी सांगितले.

Leave a comment