Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

अहिल्यानगर ब्रेकिंग : आज भंडारदरा धरणात पाण्याच्या प्रमाणात तब्बल येवढी वाढ…

अहिल्यानगर ब्रेकिंग : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा परिणाम पर्यटकीय स्थळांवर दिसून येत आहे.तसेच दोन गडावर प्रेवेश बंदी देखील लावली आहे. सतत होणाऱ्या पाऊसामुळे आज भंडारदरा धरणात पाण्याच्या प्रमाणात तब्बल येवढी वाढ.पाण्याच्या वाढीमुळे नागरिकांना त्या दोन गडांकडे जाऊ नये असे सुचवण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना प्रवेश बंदी.

अहिल्यानगर ब्रेकिंग :

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा परिणाम पर्यटकीय स्थळांवर दिसून येत आहे.तसेच दोन गडावर प्रेवेश बंदी देखील लावली आहे. सतत होणाऱ्या पाऊसामुळे आज भंडारदरा धरणात पाण्याच्या प्रमाणात तब्बल येवढी वाढ.पाण्याच्या वाढीमुळे नागरिकांना त्या दोन गडांकडे जाऊ नये असे सुचवण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना प्रवेश बंदी.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी (दि.21) पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अधिक प्रमाणात वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने जवळील पर्यटकीय स्थळांवर बंदी घातली आहे.तसेच नागरिकांना सूचित केले गेले आहे.रात्री पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे.

वाढते पाणी,धुके आणि हिरवळ पाहून नागरिकांमध्ये फिरायला जाण्याची चळवळ निर्माण होते. यामुळे वन विभागाने जवळील पर्यटकीय स्थळांवर बंदी घातली
त्या मध्ये भंडारदरा धरणासह हरिश्चंद्रगड व रतनगडावर या दोन गडांचा समावेश आहे.शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 40 तर निळवंडे धरणातील पाणीसाठा 36 टक्के झाला होता.त्यानंतर शनिवारी देखील मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणीसाठा रविवारी रात्री उशीरापर्यंत 45 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

निळवंडेतील पाणीसाठा थोड्या प्रमाणात वाढला आहे.शनिवारी सकाळपर्यंत 206 दलघफू पाण्याची आवक झाल्याने धरणातील पाणीसाठा 4200 दलघफू झाला होता. रात्री उशीरा हा पाणीसाठा 4340 दलघफू झाला होता. शनिवार व रविवार सुट्टी आल्याने पर्यटकांची गर्दी आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने हरिश्चंद्रगड व रतनगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

मुळातील साठा 10500 दलघफूवर

दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. दरम्यान, 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल पाणीाठा 10500 दलघफू झाला होता. शुक्रवारी सकाळी मुळा धरणात 6 हजार 951 क्युसेकने आवक सुरू होती. ती सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने 2 हजार 247 (कोतूळ इनफ्लो) क्युसेकसवर आला. शनिवारी सकाळी मुळा नदीत 1753 क्युसेक विसर्ग होता. सायंकाळी हा विसर्ग 1633 दलघफू होता. पाणलोटात कमी अधिक पाऊस होत असल्याने धरणात येणारी आवकही कमी अधिक होत आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कमी होत आहे.

 

आढळात 72 टक्के पाणीसाठा

वीरगाव वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, आढळा पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने आढळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढु लागला आहे. काल सायंकाळी 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 758 दलघफू झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात अधिक पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास हे धरण येत्या काही दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

 

गोदावरीत 11079 क्युसेकने विसर्ग दारणा, गंगापूर च्या पाणलोटात मध्यम पाऊस

दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटात काल दिवसभर अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन होत होते. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळपर्यंत एकूण जवळपास 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल सायंकाळी गोदावरीत 11079 क्युसेकने विसर्ग सुरु होता.

दारणा धरणाचा साठा 61.35 टक्क्यांवर स्थिर आहे. तर गंगापूरचा 65.88 टक्क्यांवर स्थिर आहे. भावली धरण 55.37 टक्के भरले आहे. पालखेड 53.75 टक्क्यांवर पोहचले आहे. मुकणे 45.10 टक्के, वाकी 46.03 टक्के, भाम 33.08 टक्के, वालदेवी 58.34 टक्के, कश्यपी 42.87 टक्के, गौतमी गोदावरी 24.25 टक्के, कडवा 43.84 टक्के, आळंदी 21.08 टक्के, भोजापूर 55.68 टक्के असा साठा झाला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दारणा, भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावरील धबघबे कोसळुू लागले आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरुच आहे. काल सकाळी मागील 24 तासांत दारणात 356 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.

दारणा 61.35 टक्के भरले असून यातून 4742 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळपर्यंत या धरणातून अर्धा टीएमसीहुन अधिक पाण्याचा विसर्ग दारणा नदीत केला जात आहे. दारणातील पाणी गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात सामावत आहे. गंगापूर धरणात 122 दलघफू नवीन पाण्याची आवक 24 तासात झाली. काल अखेरपर्यंत या धरणात एकूण 1.3 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. अन्य धरणातही कमी अधिक प्रमाणात नवीन पाणी दाखल होत आहे. गंगापूर मधून काल सायंकाळी 3944 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. कडवातून 795 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दारणा, गंगापूर, व कडवातून विसर्ग दाखल होत आहे. तसेच नांदुरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील पावसाचे पाणी दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 11079 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळपर्यंत जायकवाडीच्या दिशेने या बंधार्‍यातून गोदावरीत 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Leave a comment