ahilyanagar crime : अरणगाव ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला; पहा सविस्तर…..
ahilyanagar crime : अरणगाव ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. केडगाव परिसरात कोतवाली पोलिसांनी विनापरवाना चुकीच्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या फटाक्यांची वाहतूक थांबवून त्यातून तीन लाख ३० हजारांच्या फटाक्यांसह टेम्पो असा १३ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ahilyanagar crime :
अरणगाव ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. केडगाव परिसरात कोतवाली पोलिसांनी विनापरवाना चुकीच्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या फटाक्यांची वाहतूक थांबवून त्यातून तीन लाख ३० हजारांच्या फटाक्यांसह टेम्पो असा १३ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
अरणगाव ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर केडगाव शिवारात कोतवाली पोलिसांनी विनापरवाना फटाक्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यातून तीन लाख ३० हजारांच्या फटाक्यांसह टेम्पो असा १३ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई शरिवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल कैलास जाधव वय १९ रा. कणगर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर असे टेम्पो चालकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, अरणगाव ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावरून टेम्पोमध्ये विनापरवाना फटाक्यांची वाहतूक होत आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक थोरात, पोलीस अंमलदार दीपक रोहोकले, सोमनाथ राऊत, रामनाथ हंडाळ यांच्या पथकाने पंचासह केडगाव

बाह्यवळण रस्त्यावरील टायरच्या शोरूम जवळ सापळा लावला. त्यावेळी संशयित टेम्पो आल्यानंतर थांबविला. टेम्पो चालकाला टेम्पोमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पंचा सक्षम टेम्पोची झडती घेतली असता त्यात फटाक्यांचे बॉक्स आढळून आले. त्या मालाबाबत विचारपूस केली असता फटाक्याचे बॉक्स अरणगाव शिवारातून फटाक्यांच्या गोदामातील मुलताणी कंपनीचे मॅनेजर रामचंद्र तोतराम मुलतानी (रा. सावेडी अंजली बंगला दत्त मंदिराजवळ अहिल्यानगर) यांच्या सांगण्यावरून

पिंपरी येथील नारायणशेठ बुऱ्हाणी यांना पोहोच करायचा आहे. असे सांगितले. चालकास टेम्पोतील मालाच्या वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता त्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून आला. पोलिस पथकाने टेम्पोमधून तीन लाख ३० हजारांचे फटाके व दहा लाख ५० हजारांचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला. ज्वलनशील वस्तूंची विना परवाना वाहतूक केल्याच्या आरोपावरून पोलीस अंमलदार सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
