Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Ahilyanagar Sucide News : मन सुन्न करणारी घटना | आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडीमारून आत्महत्या

ahilyanagar sucide news : जामखेड तालुख्यातील नारायणगाव येथे रक्षाबंधन च्या दिवशी दोन चिमुकल्यासह आई ने केली आत्महत्या. संध्याकाळ च्या वेळी आपल्या लहान मुलांसह घराजवळील विहरीत उडी मारून संपवला आपला जीव. या घटनेने संपूर्ण परिसरात शोकाकुल.

ahilyanagar sucide news :

Ahilyanagar Sucide News : मन सुन्न करणारी घटना | आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडीमारून आत्महत्या
Ahilyanagar Sucide News : मन सुन्न करणारी घटना | आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडीमारून आत्महत्या

 

पुर्वसंध्याला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. आईने आपल्या दोन मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रूपाली नाना उगले (वय २५) मुलगा समर्थ उगले (वय ५) आणि मुलगी चिऊ उगले (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सध्या पोलिसांकडुन तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रूपाली उगले यांच्यासोबत पती नाना उगले, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जण घरात राहत होते. मुलगा शाळेतून आल्यावर सायंकाळी रूपालीने गणवेशातच मुलाला व लहान मुलीस विहिरीवर नेले आणि रुपाली हीने एकत्रितपणेपणे आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर पती व सासरे शेतातुन घरी आले तेव्हा त्यांना पत्नी

व दोन्ही मुले घरी दिसुन आले नाहीत, यावेळी त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता शेजारील विहिरीच्यावर चपला दिसुन आल्या. यानंतर सदरची घटना लक्षात आली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा तीनही मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सापोनी उज्वल राजपुत आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थ आणि माहेरकडील नातेवाईक दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. खर्डा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a comment