ahilyanagar vande bharat train : नागपूर-पुणे वंदे भारत रेल्वे आता नगरमध्ये थांबनार.
ahilyanagar today : अहिल्यानगर कारणांसाठी एक आनंदाची गोष्ट १० ऑगस्ट पासून भारत एक्सप्रेस आपल्या अहिल्यानगर मध्ये थांबणार. १० ऑगस्टला नागपूरहून सुटणाऱ्या रेल्वेपासून या रेल्वेला सुरवात होणार आहे. या निर्णयाला दिला भाजप पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत. .
ahilyanagar vande bharat train :
ahilyanagar vande bharat train : अहिल्यानगर कारणांसाठी एक आनंदाची गोष्ट १० ऑगस्ट पासून भारत एक्सप्रेस आपल्या अहिल्यानगर मध्ये थांबणार. १० ऑगस्टला नागपूरहून सुटणाऱ्या रेल्वेपासून या रेल्वेला सुरवात होणार आहे. या निर्णयाला दिला भाजप पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.
१० ऑगस्टला दिला हिरवा झेंडा; भाजप पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.

अजनी-नागपूरहून सोमवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे पुण्याकडे जाणार आहे. पुण्याहून मंगळवार वगळता ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस अजनी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. नागपूरहून पुण्याकडे जाताना या रेल्वेचे नगर स्थानकावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश..
आपल्या शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला नगरमध्ये थांबा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. अखेर आता १० ऑगस्टपासून नगर येथे थांबा मिळणार आहे. त्यामुळे अॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, महेंद्र गंधे, सचिन पारखी, प्रशांत मुथा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होईल. ७ वाजून ३७मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्याहून नागपूरकडे जाताना नगर स्थानकावर ही रेल्वे सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहचेल. दोन मिनिटे थांबून ८ वाजून ३५ मिनिटांनी नागपूरकडे निघेल.
नागपूर रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. पुण्याहून सकाळी
६ वाजून २५ मिनिटांनी नागपूरसाठी रेल्वे सुटेल. नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठीच येथील थांब्यावर रेल्वे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी तसेच नागपूरकडे जाण्यासाठी येथील प्रवाशांना आता आणखी एक पर्याय आठवडाभर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या रेल्वेचे स्वागत केले आहे.
