Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

ANIL PARAB: “आईच्या नावाने डान्सबार! गृहराज्यमंत्री कदमांवर वादळ निर्माण; अनिल परब यांनी केली राजीनाम्याची मागणी”…पहा सविस्तर

ANIL PARAB: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असूनही राजकीय वातावरण तापलेले आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे.

मुंबई | Mumbai

ANIL PARAB: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असूनही राजकीय वातावरण तापलेले आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. यापूर्वीच अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप करून राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर, आता परब यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

त्यांनी थेट आरोप केला की योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीतील ‘सावली डान्सबार’ सुरू आहे. या आरोपामुळे गृहमंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर आणि नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परब (ANIL PARAB) यांनी फक्त आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या विधानभवनात या मुद्द्यावरून खलबते सुरु असून भाजप-शिंदे गटाकडून यावर स्पष्ट भूमिका मांडली जात नाही. पुढे या आरोपांना काय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे आक्रमक आमदार अनिल परब (ANIL PARAB) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर थेट आरोपांचा बडगा उगारला. परब म्हणाले, “कांदिवली येथे ‘सावली बार’ आहे. पोलिसांनी येथे धाड टाकली आणि २२ बारबाला, २२ कस्टमर आणि ४ कर्मचारी पकडले गेले.” ही कारवाई केवळ एक पोलीस तपास नाही, तर थेट सत्तेतील व्यक्तींच्या संबंधांची गंभीर छाया उघड करणारी बाब आहे.

ANIL PARAB
ANIL PARAB

या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पंचनामा देखील केला, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे, आणि त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा थेट गौप्यस्फोट परब यांनी केला. आता सत्ताधाऱ्यांकडून या आरोपांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे आक्रमक आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर थेट आरोपांचा बडगा उगारला. परब म्हणाले, “कांदिवली येथे ‘सावली बार’ आहे. पोलिसांनी येथे धाड टाकली आणि २२ बारबाला, २२ कस्टमर आणि ४ कर्मचारी पकडले गेले.” ही कारवाई केवळ एक पोलीस तपास नाही, तर थेट सत्तेतील व्यक्तींच्या संबंधांची गंभीर छाया उघड करणारी बाब आहे.

ANIL PARAB
ANIL PARAB

या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पंचनामा देखील केला, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे, आणि त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा थेट गौप्यस्फोट परब यांनी केला. आता सत्ताधाऱ्यांकडून या आरोपांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

अनिल परब यांनी विधानसभेत भाषण करताना रोष व्यक्त करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले, “एकीकडे तुम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मिळत आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सबारमध्ये नाचवत आहात.” ही विरोधाभासी आणि लाजीरवाणी स्थिती असून, अशा व्यक्तीकडून गृहखाते चालवले जात असेल तर राज्याची प्रतिमा धुळीला मिळते, असे परब म्हणाले.

त्यामुळे त्यांनी ठामपणे मागणी केली – “आजच्या आज गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.” त्यांनी अजित पवार यांना योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन केलं, तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. “जर कारवाई नाही झाली तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल.

ANIL PARAB
ANIL PARAB

कारण सध्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जातं आहे.” एवढंच नव्हे तर, “आज बिहारमध्ये म्हणत आहेत की, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का?” अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारची प्रतिमा धोक्यात आल्याचं स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला.

Leave a comment