DEVENDRA FADNAVIS: “‘दहशतवाद कधीच भगवा नव्हता!’ “१७ वर्षांच्या आरोपांना पडला न्यायालयीन विराम,फडणवीसांचे प्रतिउत्तर!”…पहा सविस्तर
DEVENDRA FADNAVIS: १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायलढाईनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांच्यावर दहशतवादी कट, हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवल्याचे गंभीर आरोप होते.
मुंबई | Mumbai
DEVENDRA FADNAVIS: १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायलढाईनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांच्यावर दहशतवादी कट, हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवल्याचे गंभीर आरोप होते. मात्र, NIA विशेष न्यायालयाने “केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे ठाम मत नोंदवत सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
हा निर्णय केवळ आरोपींसाठी नव्हे, तर देशभरातील चर्चेसाठीही ठरतोय एक मोठा टर्निंग पॉईंट. दीर्घकाळ राजकीय आणि धार्मिक वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या प्रकरणावर अखेर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवत या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनेक राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर मोठा निकाल समोर आला आहे. या बहुचर्चित प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांचा समावेश होता. यांच्यावर दहशतवादी कट रचणे, हत्या करणे आणि धार्मिक उन्माद पसरवणे असे अत्यंत गंभीर आरोप (DEVENDRA FADNAVIS) ठेवण्यात आले होते.
मात्र, NIA विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आणि स्पष्ट केलं की, केवळ शंकेच्या आधारावर कुणालाही दोषी ठरवता येत नाही. त्यामुळे सातही आरोपी निर्दोष ठरले. या निकालामुळे एकीकडे काहींना न्याय मिळाल्याचा दिलासा वाटतोय, तर दुसरीकडे या निर्णयाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशभर गाजलेल्या या प्रकरणाला आता एक नवा वळण मिळाल्याचं चित्र आहे. कोर्टाच्या या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल १७ वर्षांनंतर अखेर आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या भीषण घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

जिथं सामान्य माणसांची रोजची धावपळ चालते, त्या भिक्खू चौकात झालेला हा बॉम्बस्फोट एका क्षणात अनेक कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त करून गेला. मृतांच्या नातेवाईकांना आजही तो काळा दिवस जसा चित्तवेदक आठवतो, तसाच आजचा निकाल त्यांच्या भावनांना पुन्हा एकदा झळ पोहचवणारा ठरतो आहे. न्यायालयाचा निकाल काहीही असो, या घटनेचे दु:ख, वेदना आणि त्या निरपराध नागरिकांचे बलिदान कधीच विसरले जाणार नाही, एवढं मात्र नक्की.
तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली, हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक, तर काहींसाठी दिलासादायक ठरला आहे. “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, आणि त्यावर आधारितच सर्व आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे. इतक्या वर्षांच्या तपासानंतर, हजारो पानांची केस डायरी, शेकडो साक्षीदार, आणि वर्षानुवर्षे चाललेल्या सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.
या निकालाने देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेषतः या प्रकरणाला ‘हिंदू दहशतवाद’ या वादग्रस्त लेबलखाली पाहिलं गेल्यामुळे, हा निर्णय अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DEVENDRA FADNAVIS) प्रतिक्रिया दिली आहे आणि या निर्णयाच्या स्वागतासोबतच काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता हा निकाल पुढे काय वळण घेईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) अकाऊंटवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार.” त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी एका विशिष्ट समुदायावर लादण्यात आलेल्या दहशतवादी ठपक्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. फडणवीस यांनी सूचित केले की, केवळ राजकीय किंवा धार्मिक हेतूने एखाद्या विचारधारेस किंवा समूहास दहशतवादाशी जोडणे हे अन्यायकारक आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, “हिंदू सहिष्णु असतो, देशाच्या विरोधातील कारवाया कधीच करत नाही.” त्यांच्या या वक्तव्यातून हिंदू समाजाच्या शांतताप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ स्वभावावर भर देण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाच्या राजकीय संदर्भात अधिकच चर्चा रंगू लागल्या आहेत.
सत्य कधी पराभूत होत नाही :

सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय.
मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण, आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. आजच्या न्यायालयीन निर्णयाने हेच स्पष्ट झालं आहे. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वर्षं या खोट्या आरोपांमध्ये वाया गेली. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही.
हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. तरीही ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. या पद्धतीने एका संपूर्ण समाजावर डाग लावण्याचा प्रयत्न केला गेला. आज न्यायालयीन निकालामुळे हे षडयंत्र उघडं पडलं आहे. याच्यासारखा धादांत अन्याय काँग्रेसकडे उत्तर म्हणून उरला आहे का? असा सवाल आता उठू (DEVENDRA FADNAVIS) लागलाय. एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही.
