Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

DEVENDRA FADNAVIS: “सत्ताकेंद्रात संताप अनावर! ‘सगळे आमदार माजले’; देवेंन्द्र फडणवीसांची थेट जाहीर टीका”…पहा सविस्तर

DEVENDRA FADNAVIS: विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालाय! आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मतभेदांनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे.

मुंबई | Mumbai

DEVENDRA FADNAVIS: विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालाय! आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मतभेदांनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन सुरू असताना विधानभवन परिसरात आता केवळ आमदार, स्वीय सहाय्यक आणि अधिकारी यांनाच प्रवेश असणार, असा स्पष्ट आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

या पार्श्वभूमीवर पडळकर आणि आव्हाड दोघांनीही दिलगिरी व्यक्त केली असली, तरी आव्हाडांनी सभागृहात उभे राहत स्पष्ट केलं की, “मी एकटाच येतो, माझ्यासोबत कुणीही नसतं, आणि मी कोणाच्या पासवर सही करत नाही.”

ते यामध्ये जबाबदार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. मात्र या विधानांवरून अध्यक्ष नार्वेकरांनी त्यांना “राजकारण करायचं आहे का?” असा थेट सवाल केला. यावरून वातावरण तापलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत चर्चेत उडी घेतली. विधानभवनातील शिस्तीवर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

DEVENDRA FADNAVIS
DEVENDRA FADNAVIS

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या चकमकीनंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे. आता विधानभवन परिसरात अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. म्हणजेच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेरच ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिला गेला आहे.

या सर्व प्रकारानंतर आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी, त्याच वेळी एक वादळी क्षण पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) हे यावर चांगलेच संतापले आणि त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतली. केवळ राडेबाजीच नव्हे, तर आता विधानभवनातील शिस्तीवर मोठं संकट निर्माण झालंय. ह्या घटनांमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापलेलं आहे, आणि हा वाद यानंतर कुठपर्यंत पोहोचतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

खरेतर, विधानभवनात घडलेल्या गोंधळानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वस्वी नाराजी व्यक्त करत “संबंधित व्यक्तींना विधान भवन परिसरात आणल्याबद्दल खेद व्यक्त करावा”, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. यानंतर आमदार पडळकर यांनीही तत्काळ खेद व्यक्त केला. मात्र, खऱ्या नाट्याला सुरुवात झाली जेव्हा जितेंद्र आव्हाड बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी स्पष्ट केलं, “सभागृहात मी एकटाच येतो… माझ्यासोबत मी कधीही कुणाला आणत नाही… कुणाच्या पासवर सही करत नाही… रेकॉर्डवर चुकीचे येऊ नये” हे ठामपणे सांगितलं.

DEVENDRA FADNAVIS
DEVENDRA FADNAVIS

याचवेळी त्यांनी आरोप केला की, “मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देण्यात आली.” इतक्यावरच न थांबता अध्यक्ष नार्वेकरांनी खोचक प्रश्न केला, “तुम्हाला या विषयी राजकारण करायचं आहे का?”. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत सभागृहात गदारोळ निर्माण केला आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांतून आज विधानभवनात तणावाचा क्षण स्पष्टपणे उमटला. एका मागून एक आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “धमकीचा उल्लेख करण्याला मनाई नाही. पण अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही?” हे सांगताना त्यांनी सभागृहात बसलेल्या प्रत्येक सदस्याला आरसा दाखवला.

DEVENDRA FADNAVIS
DEVENDRA FADNAVIS

ते पुढे म्हणाले, “ही प्रतिष्ठा कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बससेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे.” इतकेच नव्हे तर त्यांनी बाहेरची लोकभावना अधोरेखित करत सांगितले की, “आज बाहेर ज्या शिव्या पडत आहेत त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. सगळे आमदार माजले असे आपल्या नावाने बोलले जाते.” शेवटी त्यांनी ठामपणे विचारले, “प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत?” त्यांच्या या भावनांनी संपूर्ण सभागृह हादरवून टाकले.

Leave a comment