FOLDABLE iPHONE: iPhone प्रेमींसाठी मोठी बातमी, “फोल्डेबल फोन्सच्या बाजारात आता Apple ची एंट्री! कधी होणार लॉन्च…
"Apple चाहत्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा क्षण! पहिला Foldable iPhone बाजारात दाखल होण्याची शक्यता; किंमत तब्बल 2 लाखांपलीकडे, सॅमसंगलाही देणार कडवी टक्कर… नेमका लॉन्च कधी? अद्याप गूढ!"
FOLDABLE iPHONE: स्मार्टफोनच्या दुनियेत नवनवीन ट्रेंड्स आणि भन्नाट इनोव्हेशन्स आणण्यात अॅपल नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. त्यामुळेच जगभरातील टेक-लव्हर्स आणि iPhone चाहत्यांची नजर आता अॅपलच्या पुढच्या पावलावर खिळली आहे. तुम्ही जर Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच धक्कादायक आणि रोमांचक ठरणार आहे. पुढील महिन्यात अॅपल आपली बहुचर्चित iPhone 17 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. पण खरी चर्चा यावेळी एका वेगळ्याच उत्पादनाची सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या जोरदार गाजतंय ते Apple Foldable iPhone!
होय, ऐकून धक्का बसेल पण कंपनी पुढील वर्षीच आपला पहिलाच Foldable iPhone बाजारात आणू शकते. याला आतापर्यंत मिळालेली माहिती पाहता V68 हे कोडनेम देण्यात आलं आहे. डिझाईनच्या बाबतीत हा नवा आयफोन सॅमसंगच्या Galaxy Z Fold सीरिजसारखा दिसू शकतो. म्हणजेच फोन उघडल्यावर तो अगदी टॅब्लेटसारखा अनुभव देईल मोठ्या स्क्रीनवर गेमिंग, व्हिडिओज आणि मल्टीटास्किंगची धमाल!
अॅपलचे प्रॉडक्ट्स म्हणजे फक्त फोन नसतात, तर ते जगभरात लक्झरी आणि प्रीमियम टेक्नॉलॉजीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे Foldable iPhone हा गॅझेट प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. आतापर्यंत अॅपलने या फोनबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी सोशल मीडियावरून गळालेल्या माहितीनं ग्राहकांच्या उत्सुकतेला कमालीचा उधाण आलं आहे.
अप्रतिम चार कॅमेरे:
ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्टनुसार, Apple Foldable iPhone मध्ये एकूण चार कॅमेरे असतील – एक फ्रंट कॅमेरा, एक आतील स्क्रीनवर तर दोन मागच्या बाजूस. या अत्याधुनिक सेटअपमुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचा अनुभव अधिक प्रोफेशनल, क्रिस्टल क्लिअर आणि प्रीमियम दर्जाचा होईल, अशी टेक-लव्हर्सची मोठी अपेक्षा आहे.
टच आयडी पण सिम स्लॉट नसेल:

Apple iPhone मध्ये यंदा मोठा बदल पाहायला मिळू शकतो. फेस आयडीऐवजी टच आयडी देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय, या फोनमध्ये सिमकार्ड स्लॉट नसेल, म्हणजेच तो पूर्णपणे eSIM वर चालणारा असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अत्याधुनिक आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा अनुभव मिळणार आहे.
उत्पादन आणि लॉन्च टाइमलाइन:
Apple Foldable iPhone संदर्भात मोठी हालचाल सुरू झाली आहे. अॅपलच्या प्रमुख पुरवठादार कंपन्यांनी या मॉडेलवर काम सुरू केले आहे. अंदाजानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्याचे उत्पादन वाढवले जाईल. विशेष म्हणजे हा क्रांतिकारी फोन 2025 मध्ये iPhone 18 सीरिजसोबत किंवा स्वतंत्रपणे लाँच होण्याची दाट शक्यता आहे.
रंग आणि प्रदर्शन:

सध्या Apple Foldable iPhone ची टेस्टिंग मर्यादित पातळीवर केली जात आहे आणि तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट कलर ऑप्शनमध्ये तपासला जात आहे. डिस्प्लेसाठी कंपनीने अत्याधुनिक इन-सेल टच टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. यामुळे स्क्रीनवरील क्रीज कमी होतील आणि वापरकर्त्यांना अधिक स्मूथ टच एक्सपीरियंस मिळणार आहे.
नवीन अॅपल C2 मॉडेम:
रिपोर्ट्सनुसार, आगामी Apple Foldable iPhone मध्ये क्वॉलकॉमच्या मॉडेमऐवजी अॅपलचा स्वतःचा C2 मॉडेम दिला जाऊ शकतो. या अत्याधुनिक मॉडेममुळे फोनचा परफॉर्मन्स आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अॅपलकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. तरीसुद्धा, पुढील वर्षी हा क्रांतिकारक iPhone बाजारात दाखल होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
किंमत किती असू शकते?

मागील रिपोर्टनुसार, भारतात Apple Foldable iPhone ची किंमत तब्बल 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा फोन Samsung Galaxy Z Fold 7 पेक्षा खूपच महाग ठरेल. मात्र, अॅपलला आपल्या पहिल्या फोल्डेबल डिव्हाइस मध्ये कुठलीही चूक करायची नाही. कंपनीचे स्पष्ट ध्येय म्हणजे हे उपकरण पूर्णपणे परिपूर्ण करून फोल्डेबल सेगमेंटमध्ये सॅमसंगला कडवी टक्कर देणे.
