HEALTH TIPS: “वजन कमी करताना नकळत वाढतेय धोक्याची सावली; ग्रीन टी पिल्याने फायदा जास्त की नुकसान? काय सांगतात तज्ज्ञ…
“आरोग्यासाठी वरदान मानली जाणारी ग्रीन टी ठरतेय काहींसाठी घातक! तज्ज्ञांचा इशारा – कॅफिन, टॅनिन आणि कॅटेचिनमुळे गर्भवती, अशक्त आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.”
HEALTH TIPS: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बहुतेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, आणि त्याचे परिणाम गंभीर आजारांच्या स्वरूपात समोर येतात. (HEALTH TIPS) निरोगी राहण्यासाठी आहार, झोप आणि जीवनशैलीसोबतच काही पेयांनाही विशेष महत्त्व आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेले पेय म्हणजे ग्रीन टी. वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी चमत्कारिक मानली जाते. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीपासून ते मध्यमवयीन लोकांपर्यंत सर्वत्र ग्रीन टीची क्रेझ वाढताना दिसते. पण, ही क्रेझच तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे फार थोड्यांना माहीत आहे.
आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे की ग्रीन टी प्रत्येकासाठी योग्य नाही. त्यात असलेले कॅफिन आणि टॅनिन काही परिस्थितींमध्ये गंभीर दुष्परिणाम घडवू शकतात. गर्भवती महिला, अशक्तपणा असलेले लोक आणि काही आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी ग्रीन टीचे सेवन टाळावे, असा स्पष्ट इशारा डॉक्टर देतात. कारण, (HEALTH TIPS) जास्त प्रमाणात ग्रीन टी पिण्याने पोषणाऐवजी शरीराला हानी पोहोचू शकते.
एकीकडे ग्रीन टीला “हेल्दी लाइफस्टाईल”चा भाग म्हणून गौरवले जात असताना, दुसरीकडे तिचे दुष्परिणाम अनेकांसाठी धोक्याची घंटा वाजवणारे ठरतात. म्हणूनच तज्ज्ञांचे ठाम मत आहे की, ग्रीन टीचे सेवन करण्याआधी स्वतःच्या आरोग्यस्थितीची जाणीव ठेवणे आणि योग्य प्रमाणातच तिचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे!
ग्रीन टीचे दुष्परिणाम…

ग्रीन टीला जरी आरोग्यदायी पेय मानलं जात असलं, तरी त्याचे दुष्परिणाम शरीराला मोठा त्रास देऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यास डोकेदुखी आणि मायग्रेन वारंवार होऊ शकतात. एवढंच नाही तर सततची चिंता आणि अस्वस्थता मन आणि शरीर दोन्हीला अस्वस्थ करून टाकतात. काहींना निद्रानाश किंवा कमी झोपेची समस्या निर्माण होते, तर काहींना सततची मळमळ त्रासदायक ठरते.
याशिवाय, ग्रीन टीतील कॅफिनमुळे जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका बसण्याची शक्यता वाढते. पचनसंस्थेलाही त्याचा फटका बसतो आणि छातीत जळजळ तसेच आम्ल ओहोटी सारखे त्रास निर्माण होतात. काही प्रकरणांमध्ये चक्कर येणे आणि सौम्य डोकेदुखी सुद्धा जाणवते. म्हणूनच, ग्रीन टी पिणं म्हणजे फक्त फायदेच नाहीत तर गंभीर तोटेही आहेत. (HEALTH TIPS) योग्य प्रमाण न पाळल्यास हे “हेल्दी पेय” तुमच्यासाठी त्रासाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे ग्रीन टीचा वापर नेहमी मर्यादेत आणि आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
ग्रीन टीला आरोग्यासाठी वरदान मानलं जातं, पण चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास ते शरीरासाठी शाप ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन पोटातील आम्लाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढवतात. विशेषतः रिकाम्या पोटी ग्रीन टी पिल्यास पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि आम्ल रिफ्लक्स सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (HEALTH TIPS) एवढंच नव्हे, तर दीर्घकाळ असे केल्यास अल्सर होण्याचा धोका वाढतो.

ज्यांना गॅस्ट्र्रिटिस, पेप्टिक अल्सर किंवा संवेदनशील पचनाच्या समस्या आहेत त्यांनी कधीही उपाशीपोटी ग्रीन टी घेऊ नये. त्याऐवजी जेवणानंतर किंवा जेवणाच्या दरम्यानच त्याचे सेवन करणे सुरक्षित ठरते. याशिवाय, नैसर्गिकरित्या ज्यांना कॅफिनबद्दल संवेदनशीलता आहे त्यांनी ग्रीन टी खूप काळजीपूर्वक घ्यावी. अन्यथा अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढणे आणि अस्थिरता यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. (HEALTH TIPS) म्हणूनच, ग्रीन टी पिण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा हे पेय जरी “हेल्दी” म्हणून ओळखलं जात असलं तरी चुकीच्या सवयीमुळे ते तुमच्या आरोग्याला धोका पोहोचवू शकतं.
ग्रीन टी आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते, पण त्यातील जास्त कॅफिन शरीरासाठी घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कॅफिनमुळे कॅल्शियम शोषण कमी होतं आणि दीर्घकाळात हाडे कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, मुलांसाठी ग्रीन टी पूर्णपणे टाळावी, कारण तिचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो. (HEALTH TIPS) त्यात असलेले टॅनिन प्रथिने व चरबीसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वांचे शोषण रोखतात, जे मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे ग्रीन टी पिण्याची आवड असली तरी हर्बल ग्रीन टीचा पर्याय निवडणे शहाणपणाचं आहे आणि लहान मुलांना दररोज व मोठ्या प्रमाणात ग्रीन टी देणं टाळावं.

ग्रीन टीला आरोग्याचा सुपरड्रिंक मानलं जातं, पण तिचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत, हे अनेकांना ठाऊक नसतं. तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टी शरीरातील नॉन-हीम आयर्न शोषण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करते. हा आयर्न फळे, भाज्या, शेंगा अशा वनस्पती-आधारित पदार्थांत आढळतो आणि तो आधीच सहज शोषला जात नाही. ग्रीन टी पिल्याने अशक्तपणाने त्रस्त लोकांमध्ये थकवा वाढू शकतो आणि उर्जा कमी होण्याची समस्या तीव्र होऊ शकते. (HEALTH TIPS) याशिवाय, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ग्रीन टी धोक्याची घंटा ठरू शकते.
कारण त्यात असलेले कॅफिन गर्भपाताचा धोका वाढवते तसेच बाळाच्या वाढीवरही वाईट परिणाम करू शकते. शिवाय ग्रीन टीमधील कॅटेचिन फॉलिक अॅसिड शोषण्यास अडथळा आणते, जे गर्भाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की या काळात महिलांनी दिवसातून दोन कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये.
