Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

HEAVY RAIN UPDATE : अखेर मोठ्या प्रतिक्षे नंतर पाऊस पुन्हा परतला; मराठवाड्यातील ३० मंडळात अतिवृष्टी पहा सविस्तर…..

HEAVY RAIN UPDATE : अखेर मोठ्या प्रतिक्षे नंतर पाऊस पुन्हा परतला; मराठवाड्यातील ३० मंडळात अतिवृष्टी झालेली दिसून येत आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने धुवाधार हजेरी लावलेली आहे. मराठवाड्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे यामुळे विभागातील ३० सर्कलमध्ये अतिवृष्टीचे नोंद देखील झाली आहे. तसेच काही ठिकाणी कमी पाऊस देखील झालेला दिसून येत आहे.

HEAVY RAIN UPDATE :

अखेर मोठ्या प्रतिक्षे नंतर पाऊस पुन्हा परतला; मराठवाड्यातील ३० मंडळात अतिवृष्टी झालेली दिसून येत आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने धुवाधार हजेरी लावलेली आहे. मराठवाड्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे यामुळे विभागातील ३० सर्कलमध्ये अतिवृष्टीचे नोंद देखील झाली आहे. तसेच काही ठिकाणी कमी पाऊस देखील झालेला दिसून येत आहे.

चालू वर्षी एप्रिलमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मेमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली. यावर्षी मान्सूनला चांगली सुरुवात होईल असे वाटले होते. परंतु जूनमध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही. जुलैच्या सुरुवातीला मान्सूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. मात्र, त्यानंतर पावसाने चांगलीच उघडीप दिली. तब्बल दहा ते पंधरा दिवस पास गायब झाला. त्यामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळला.

HEAVY RAIN UPDATE
HEAVY RAIN UPDATE

प्राप्त आकडेवारीनुसार

दिवसभरात आठही जिल्हे मिळून सरासरी २६. १ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ४३. ८ मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात तर सर्वात कमी ९.१ मिमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोसळला आहे. विशेष म्हणजे विभागातील ३० सर्कलमध्ये अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालन्यातील ६, बीडमधील ६, लातुरातील १, धाराशिव २, नांदेड २, परभणी ९, हिंगोली ४ सर्कलचा समावेश असून या सर्कलमध्ये ६५ पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे.

HEAVY RAIN UPDATE
HEAVY RAIN UPDATE

संभाजीनगरात सर्वात कमी

जवळपास आठ दिवसांपासून कोरडा राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातदेखील सोमवारी रात्री पावसाने हजेरी दिली. मात्र विभागात सर्वात कमी पाऊस संभाजीनगरात कोसळला. जुलै महिन्यासाठी जिल्ह्याची सरासरी १०८ मिमी आहे. १ जुलैपासून संभाजीनगरात ४८.५ मिमी पावसाने हजेरी दिली आहे. सरासरीपेक्षा ही टक्केवारी ५३.३ अधिक आहे

Leave a comment