Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

KRUSHI DOODH NEWS : दूध उत्पातक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, दूध उत्पादकांना बसेल मोठा आर्थिक फटका

KRUSHI DOODH NEWS : दूध उत्पादकांना बसणार आता मोठा आर्थिक फटका सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या बाबत व्यापारी स्तरावर काही निर्णय घेतल्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येतीलच यामुळे दुधावर होणार परिणाम.

KRUSHI DOODH NEWS :

दूध उत्पादकांना बसणार आता मोठा आर्थिक फटका सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या बाबत व्यापारी स्तरावर काही निर्णय घेतल्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येतीलच यामुळे दुधावर होणार परिणाम.

 

अमेरिकेसोबत भारताच्या व्यापारी करारा अंतर्गत कृषी आणि दुग्ध क्षेत्र खुले केले तर दूध उत्पादनातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप मोठा धोका निर्माण होईल असा महत्वपूर्ण इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आलेला आहे. मध्यंतरी अमेरिकेसोबत होऊ घातलेल्या या करारातून कृषी आणि दुग्ध क्षेत्र वगळण्यात येईल अशी एक बातमी समोर होती. परंतु त्यावर मात्र अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा शिक्कामोर्तब तरी झालेले नाही.

KRUSHI DOODH NEWS
KRUSHI DOODH NEWS

काय आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल पाहूया

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने एक अहवाल सादर केला असून त्या अहवालानुसार बघितले तर या व्यापारी कराराअंतर्गत दुग्धक्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं तर भारतातील दुधाच्या किमतींमध्ये 15 टक्क्यांची घट येऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना वर्षाला 1.3 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो व आयातीत 2.5 कोटी टनांची वाढ होऊ शकते. तसेच या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर देशातील दुधाच्या किमतीमध्ये 15 टक्क्यांची घट जरी गृहीत धरली तरी एकूण महसुलामध्ये तब्बल 1.8 लाख कोटी रुपयांचा तोटा होईल.

KRUSHI DOODH NEWS
KRUSHI DOODH NEWS

यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा साठ टक्के गृहीत धरून किमतीतील घसरणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला तर शेतकऱ्यांचे वार्षिक 1.03 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण मूल्यवर्धित रक्कम 50 टक्के किंवा 0.51 लाख कोटी रुपयांपर्यंत तोट्यात जाईल असा धक्कादायक इशारा एसबीआयने व्यक्त केला आहे. किमतींमध्ये 15% घट झाल्यामुळे दुधाची मागणीत 14 दशलक्ष टनांनी वाढ होईल परंतु पुरवठा तब्बल 11 दशलक्ष टन इतका घटेल.

त्यामुळे सुमारे 25 दशलक्ष टन दुधाची तूट आयातीतून भरून काढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढ संप्रेरक आणि अनुवंशिकरित्या सुधारित जीवांचा वापर केला जात असल्यामुळे त्या ठिकाणचे क्षेत्र जर व्यापार कराराअंतर्गत खुले केले गेले तर भारतात जीएम पदार्थांचा ओघ वाढू शकतो व साहजिकच त्यामुळे आरोग्य विषयी प्रश्न निर्माण होऊ शकतात असे देखील एसबीआयने या अहवालात म्हटले आहे.

Leave a comment