KRUSHI NEWS : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पीक स्पर्धा, पहा सविस्तर…..
KRUSHI NEWS : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पीक स्पर्धा बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार. शेतकऱ्यांना दिलासा तसेच प्रोत्सान देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना नगरचे कृषी अधिक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा हे मुख्य कारण आहे
KRUSHI NEWS :
असे राहणार बक्षीस
तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे 2 हजार, जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे हे 5 हजार तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार आणि तिसरे बक्षीस हे 30 हजार रुपयांचे राहणार आहे.
या पिकांचा होणार स्पर्धेत सहभाग
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भूईमूग, सुर्यफूल यासह रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकांचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना पिक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. यातून पिकांची उत्पादकता वाढलेली दिसून येत असून एका शेतकर्याने केलेले वेगवेगळे प्रयोग आणि त्यातून वाढलेली उत्पादकता याला प्रोत्साहन देऊन अन्य शेतकर्यांपर्यंत ही बाब पोहोचवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आता अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना नगरचे कृषी अधिक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा. एका शेतकर्यांने पिकांच्या उत्पादकता वाढलेले प्रयोग सर्व शेतकर्यांपर्यंत पोहचावे. यातून सर्व शेतकर्यांच्या पिकांची उत्पादकता वाढावी हा या पिक स्पर्धेचा उद्देश आहे. यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्यावतीने पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून याबाबतचे मार्गदर्शक तत्वे कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खरीप हंगामातील 11 व रब्बी हंगामातील 5 अशा 16 पिकांचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या पिक स्पर्धेत मूग व उडिद पिक उत्पादक शेतकर्यांना 31 जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे. उर्वरित पिकांचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत सहभागी होता येणार असल्याचे बोराळे यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या शेतकर्यांना तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर स्वतंत्रपणे एक ते तीन क्रमांकाचे रोख स्वरूपातील बक्षीस देण्यात येणार आहे.
