Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

KRUSHI YOJNA : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी, पहा सविस्तर……

KRUSHI YOJNA : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षाला २४,००० कोटी रुपये खर्च केले जातील. अशी माहिती बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

KRUSHI YOJNA : 

कृषी उत्पादकता वाढवत बळीराजाचा शाश्वत विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’ला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत वार्षिक तब्बल २४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यात, १०० जिल्ह्यांमधील कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाणार असून याचा सुमारे १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभहोणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पीएम धन-धान्य कृषी योजने’ला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली. योजनेंतर्गत १०० जिल्ह्यांमधील कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षाला २४,००० कोटी रुपये खर्च केले जातील. प्रामुख्याने कृषी उत्पादकता वाढवणे, पीक वैविध्य निर्माण करणे, शाश्वत कृषी पद्धतींचा वापर करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर पीक काढणीनंतर साठवणूक क्षमतेत वाढ करणे, सिंचन सुविधा सुधारणे, दीर्घकालीन आणि अल्प मुदतीची कर्जे सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, अशी माहिती बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेसाठी प्रत्येक राज्यातून किमान एका जिल्ह्याची निवड

KRUSHI YOJNA
KRUSHI YOJNA

केली जाणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर समित्यांची स्थापना केली जाणार आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाने राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळा (एनटीपीसी) ची गुंतवणूक मर्यादा ७,५०० कोटींवरून वाढवून २० हजार कोटी रुपये केली. यामुळे एनटीपीसीला वर्ष २०३२

पर्यंत ६० गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. त्याचबरोबर देशात अक्षय ऊर्जेची क्षमता वाढवण्यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड (एनएलसीआयएल) कंपनीला आपल्या मालकीच्या एनआयआरएलमध्ये ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची
परवानगी देण्यात

Leave a comment