LOWEST PETROL PRICE COUNTRY: मुंबईत पेट्रोल १०३, पण जगाच्या पाठिवर कुठे मिळतंय फक्त २.५० रुपयांत? जाणून घ्या…
जगाच्या अर्थकारणाचा श्वासच जणू कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून आहे. अनेक देशांची राजकीय स्थिरता, सत्तांतराची समीकरणं आणि सामान्य माणसाच्या जीवनातील महागाईचा आलेख आहे. हे सगळं थेट पेट्रोल-डिझेलच्या किंमतींशी जोडलेलं आहे.
LOWEST PETROL PRICE COUNTRY: जगाच्या अर्थकारणाचा श्वासच जणू कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून आहे. अनेक देशांची राजकीय स्थिरता, सत्तांतराची समीकरणं आणि सामान्य माणसाच्या जीवनातील महागाईचा आलेख आहे. हे सगळं थेट पेट्रोल-डिझेलच्या किंमतींशी (LOWEST PETROL PRICE COUNTRY) जोडलेलं आहे. भारत याला अपवाद कसा असणार? कारण इथेही महागाईचे गणित मोठ्या प्रमाणावर तेलांच्या दरांवर अवलंबून आहे. मुंबईतच बघा, आज एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल १०३ रुपये मोजावे लागतात. सामान्य माणसाच्या खिशावरचा हा अतिरिक्त ताण आता सवयीचा झाल्यासारखा वाटतो, पण दर वाढले की खिशाला अजूनच आग लागते.
मात्र याचवेळी एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर येत आहे, जगाच्या पाठिवर असाही एक देश आहे, जिथे एक लिटर पेट्रोलचा (LOWEST PETROL PRICE COUNTRY) दर अडीच रुपयांपेक्षा कमी! ऐकूनही अविश्वसनीय वाटेल, पण त्या देशात पेट्रोलचा प्रतिलिटर भाव फक्त २ रुपये ४५ पैसे इतकाच आहे. म्हणजे मुंबईतील एका लिटर पेट्रोलच्या किमतीत तिथे चक्क ४० लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळू शकतं!
सध्या जागतिक तणाव, भू-राजकीय समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी हालचाल दिसतेय. भारतातील नागरिकांना दररोज खिशाला झळ बसतेय, पण त्याचवेळी जगाच्या नकाशावर असा एक देश आहे, जिथे गॅसोलीन म्हणजेच पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त मिळतं.
आता प्रश्न असा आहे की तो देश कोणता? जगाच्या पाठिवर कुठे आहे अशी जादुई भूमी, जिथे पेट्रोलचा भाव आपल्या कल्पनेपलीकडे आहे? जाणून घ्यायला हवं ना?

ग्लोबल पेट्रोल प्राइसच्या 11 ऑगस्ट 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, लीबियामध्ये पेट्रोलचा दर फक्त २.४५ रुपये प्रति लिटर इतका आहे. म्हणजेच अडीच रुपयांपेक्षाही कमी किंमतीत तिथे पेट्रोल उपलब्ध होतंय. आश्चर्य म्हणजे, ज्या वस्तूला जगभरात ‘काळं सोनं’ म्हटलं जातं, ते लीबियात पाण्यापेक्षाही स्वस्तात मिळतंय. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने ग्लोबल पेट्रोल प्राइस डेटावर आधारित एक विशेष टेबल सादर केलं असून त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे की, सध्या जगातलं सर्वात स्वस्त ऑइल लीबियात मिळतं. या यादीत लीबियानंतर इराण आणि वेनेझुएला या देशांची नावे येतात. दुसरीकडे भारतासारख्या देशात पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे स्वस्त पेट्रोल असणाऱ्या या देशांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नैसर्गिकच आहे.
जगभरात पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणूस हैराण झाला असताना काही देश मात्र याला अपवाद ठरतात. ताज्या रिपोर्टनुसार, स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत लीबिया अव्वल स्थानावर आहे. इथे एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त २.४५ रुपये इतकी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इराण असून तिथे प्रतिलिटर ऑईलचा दर फक्त २.५४ रुपये आहे. आश्चर्य म्हणजे, या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेलं वेनेजुएलादेखील पेट्रोल अवघ्या ३.०७ रुपये प्रति लिटर दराने पुरवतं.

यानंतरच्या क्रमवारीत कुवैत, अल्जीरिया, इजिप्त, कझाकिस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि यूएई या तेलसंपन्न देशांची नावं येतात. हे देश केवळ स्वतःसाठीच नाही, तर जगातील अनेक राष्ट्रांना तेलाची निर्यात करून अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र लीबियाने त्यांच्या देशात असलेल्या तेल दराच्या बाबतीत सगळ्यांना मागे टाकलंय.
भौगोलिक स्थिती काय?

जगभरात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांच्या खिशाला काप बसतोय, पण काही देश मात्र याला अपवाद ठरतायत. रिपोर्टनुसार, लीबिया सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश ठरलाय. इथे एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त २.४५ रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर इराण असून दर फक्त २.५४ रुपये आहे, तर तिसऱ्या स्थानावर वेनेजुएला असून तिथे दर ३.०७ रुपये आहे. यानंतर कुवैत, अल्जीरिया, इजिप्त, कझाकिस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांची नावे येतात. हे देश केवळ स्वतःचं इंधन भागवत नाहीत तर इतर राष्ट्रांना तेलाची निर्यात करूनही अर्थकारणात दबदबा राखतात.
