maharashtra rain : खंडित झालेल्या पावसाने केले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, पहा सविस्तर…..
maharashtra rain : खंडित झालेल्या पावसाने केले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. मराठवाड्यात गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ह्या कारणामुळे खरीपपिकांना पाणी कमी प्रमाणात मिळाल्या मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले.
maharashtra rain :
maharashtra rain : खंडित झालेल्या पावसाने केले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. मराठवाड्यात गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ह्या कारणामुळे खरीपपिकांना पाणी कमी प्रमाणात मिळाल्या मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले.
मराठवाड्यात यंदाच्या मान्सून हंगामात पावचे अनियत असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत विभागात सरास-री २९ दिवस पाऊसहोता तर यंदा १६ दिवसच पाऊस जास्त प्रमाणात ठरला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,बीड, जालना, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाने थांबला आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि ज्वारीसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्मांण झाली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अंदाजानुसार, मराठवाड्यात यंदा सरासरी ९७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे. परंतु, जूनमध्ये मान्सून सुरुवातीला जोरदार पाऊस झाला असला तरी, जुलै महिन्यात पावसाचा जोर कमी झाला. बीड जिल्ह्यात तर गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल आहे. चोवीस तासात २.५ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर तो पावसाचा दिवस गृहित धरला जातो.
गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत मराठवाड्यात २१२.१ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र त्या तुलनेत १४४.९ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्यावर्षी हाच पाऊस या तारखेपर्यंत २६४.१ मिलीमीटर एवढा झाला होता. यावर्षी या तारखेपर्यंत मराठवाड्यात आठ जिल्ह्यांमध्ये सरासरी ६८.३ टक्के पाऊस झाला तर गेल्यावर्षी हा १२४.५ टक्के एवढा पाऊस झाला होता.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणी केली होती, परंतु पावसाअभावी पिकांची उगवण नीट झाली नाही. काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याने उगवणच न झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. विशेषतः सोयाबीन आणि कापूस पिकांना पाण्याच्या कमतरतेमुळे मोठा फटका बसला आहे.
