Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

MAHINDRA NEW SUPERCAR: ‘सुपरकारचा फर्स्ट लूक’…आनंद महिंद्रांचा मास्टरस्ट्रोक, पण खरा धमाका अजून बाकी…

"अनंत काळापासून कारप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो अखेर आलाच! महिंद्राची ‘BE6 Batman Edition’ सुपरकार झळकली नजरेसमोर; किंमत, लूक आणि दमदार फिचर्समुळे ऑटो क्षेत्रात उसळली उत्सुकतेची नवी लाट!"

MAHINDRA NEW SUPERCAR: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र म्हटलं की, दशकानुदशके महिंद्रा अँड महिंद्रा या दिग्गज कंपनीची मक्तेदारी ठळकपणे दिसून येते. काळाच्या ओघात ग्राहकांच्या बदलत्या गरजा, कारप्रेमींच्या बदलणाऱ्या प्राधान्यक्रम आणि नव्या तंत्रज्ञानाचा ट्रेंड लक्षात घेत कंपनीनं आपल्या कार मॉडेलमध्ये सातत्याने बदल केले. आणि आता पुन्हा एकदा महिंद्रा ऑटो सेक्टरमध्ये (MAHINDRA NEW SUPERCAR) धडाकेबाज एन्ट्रीसाठी सज्ज झाली आहे. कंपनीनं नुकतीच आपली सुपरकार सादर केली असून, तिचं नाव जितकं आकर्षक आहे तितकंच तिचं लूक आणि परफॉर्मन्सदेखील जबरदस्त आहे. कार विश्वामध्ये या नव्या मॉडेलनं अक्षरशः धुमाकूळ घातला असून, “ही कार सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे” असं म्हणणं अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही.

या कारचं इंटिरिअर पाहिलं की नजरा खिळून राहतात. लक्झरी फील देणारं डिझाइन, सोनेरी रंगाचा अचूक वापर, सेंसर कंट्रोलवर एसी वेंट्स, की फॉब, रोटरी डायलवर असलेले गोल्ड अक्सेंट्स प्रत्येक तपशील कारच्या शानमध्ये भर घालतो. सीट्सपासून इंटिरिअर लेबल, डॅशबोर्डच्या पॅसेंजर साईडपर्यंत प्रत्येक कोपरा कारचा लूक आणखी उठावदार बनवतो. तांत्रिक बाबतीतही ही सुपरकार गेम चेंजर ठरणार आहे.

कारण, यात तब्बल 79 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून, कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा फुल चार्ज केली तर तब्बल 682 किलोमीटरपर्यंत धाव घेऊ शकते. एवढी अफाट रेंज दिल्यानंतर, या कारच्या फक्त 300 युनिट्स बाजारात (MAHINDRA NEW SUPERCAR) येणार असल्याचं स्पष्ट झाल्याने, “नेमके कोणाच्या नावे जाणार हे मर्यादित मॉडेल?” हा प्रश्न कारप्रेमींचं औत्सुक्य अधिकच वाढवतोय.

MAHINDRA NEW SUPERCAR
MAHINDRA NEW SUPERCAR

महिंद्राने भारतीय ऑटोप्रेमींसाठी मोठा सरप्राईज दिला आहे. BE 6 Batman Edition असं या नव्या इलेक्ट्रिक व्हेईकलचं नाव ठेवण्यात आलं असून, या एडिशनची पहिली कार तब्बल ₹27.79 लाख (एक्स-शोरूम) इतक्या किमतीत उपलब्ध होणार आहे. आकर्षक स्टायलिश लूक, प्रिमियम इंटिरिअर आणि पॉवरफुल बॅटरी बॅकअपमुळे ही कार आधीच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, या सुपरहिट मॉडेलचे केवळ 300 युनिट्सच विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याने स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. मर्यादित संख्येत मिळणाऱ्या या कारची बुकिंग कोण पटकावतो, हे पाहणं आता कारप्रेमींसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

बुकींग आणि डिलिव्हरी प्रक्रिया काय?

MAHINDRA NEW SUPERCAR
MAHINDRA NEW SUPERCAR

महिंद्राच्या BE 6 Batman Edition कारची नोंदणी प्रक्रिया 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कारप्रेमींनी ही संधी गमावू नये यासाठी कंपनीनं स्पष्ट अटी ठेवल्या आहेत, ग्राहकांना नोंदणीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत डिलरशिपवर जाऊनच अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी ₹21,000 इतकी बुकिंग अमाऊंट जमा करणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, विक्रीची सुरुवात 20 सप्टेंबरपासून होईल आणि हा दिवस योगायोगानं ‘इंटरनॅशनल बॅटमॅन डे’ म्हणून साजरा होतो. त्यामुळे महिंद्राच्या या बॅटमॅन वर्जन कारकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महिंद्राची BE6 Batman Edition ही कार विशेष आकर्षण ठरत आहे कारण ती पॅक थ्री व्हेरिएंटवर आधारित असून, इतर मॉडेल्सच्या तुलनेत तिची किंमत तब्बल ₹89,000 ने अधिक आहे. या कारसाठी महिंद्रानं थेट वॉर्नर ब्रदर्स या जागतिक ख्यातीच्या अमेरिकन फिल्म स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात अशी भागीदारी महिंद्रानं प्रथमच केली असल्याने ही कार केवळ तिच्या लक्झरी फीचर्समुळेच नाही तर या अनोख्या टायअपमुळेही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरत आहे.

कारचे फिचर इतके कमाल की पाहूनच पडेल विकेट…

MAHINDRA NEW SUPERCAR
MAHINDRA NEW SUPERCAR

महिंद्राची BE6 Batman Edition कार तिच्या स्टायलिश डिझाईनमुळे अधिकच आकर्षक ठरते. सॅटिन ब्लॅक शेडमध्ये सादर केलेली ही कार एकदम दिमाखदार भासते. व्हील आर्ट आणि बंपर बॉडीवरील ग्लॉस ब्लॅक फिनिश तिच्या लूकला प्रीमियम टच देतो. कारच्या पुढील दरवाजापाशी खास बॅटमॅन थीमचं डेकल सजवण्यात आलं आहे. याशिवाय, चारही बाजूंना उठावदार बॅटमॅनचे लोगो दिसून येतात. समोरच्या फेंडरपासून व्हील हबकॅप, रिअर बंपर, विंडो, रिअर विंडशील्ड पर्यंत सर्वत्र सोनेरी रंगाचा बॅटमॅन लोगो कारच्या लूकला अधिकच भव्य आणि एक्सक्लुझिव्ह बनवतो.

महिंद्राच्या (MAHINDRA NEW SUPERCAR)  नव्या BE6 बॅटमॅन एडिशन कारमध्ये लक्झरी आणि दमदार तंत्रज्ञानाचं अप्रतिम मिश्रण पाहायला मिळतं. या कारचं इंटिरिअर लक्झरी फील देणारं असून, त्यात सोनेरी रंगाचा कमाल वापर अगदी नजरेत भरणारा आहे. सेंसर कंट्रोलवरील एसी वेंट्स, की फॉब, रोटरी डायल यावर सोनेरी टच देण्यात आलाय. इतकंच नाही तर सीट, इंटिरिअर लेबल, डॅशबोर्डच्या पॅसेंजर साईडसुद्धा गोल्ड अॅक्सेंट्समुळे एकदम प्रीमियम भासतात.

या कारमध्ये 79kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून, एकदा चार्ज केल्यावर तब्बल 682 किमी ड्रायव्हिंग रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच, इलेक्ट्रिक कार क्षेत्रात ही कार नक्कीच गेमचेंजर ठरणार असं चित्र आहे. पण खरी उत्सुकता याच गोष्टीची आहे की फक्त 300 मॉडेल्स उपलब्ध असणारी ही खास कार नेमकी कोणाच्या नावावर जाईल? कारप्रेमींमध्ये आता या मर्यादित एडिशनसाठी जबरदस्त स्पर्धा रंगणार यात शंका नाही.

Leave a comment