Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

MANIKRAO KOKATE: “राजीनाम्याचा प्रश्नच नाही!” कोकाटेंची मंत्रिमंडळात दमदार एन्ट्री,अजित पवारांचा ‘राजकीय कवच’…पहा सविस्तर

MANIKRAO KOKATE: राज्याच्या कृषी विभागाचं नेतृत्व करणारे मंत्री माणिकराव कोकाटे सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त विधानं करणं, तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होणं या दुहेरी फटकारामुळे कोकाटेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार लटकली आहे.

मुंबई | Mumbai

MANIKRAO KOKATE: राज्याच्या कृषी विभागाचं नेतृत्व करणारे मंत्री माणिकराव कोकाटे (MANIKRAO KOKATE) सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त विधानं करणं, तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होणं या दुहेरी फटकारामुळे कोकाटेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार लटकली आहे. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रालयात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली.

मात्र, अजित पवारांनी कोकाटेंना (MANIKRAO KOKATE) कडक शब्दांत सुनावलं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्यावर चर्चाही झाली. काही ज्येष्ठ मंत्र्यांनी “राजीनामा नको, पण समज जरूर द्यावी” अशी भूमिका मांडल्याने कोकाटे यांचा राजीनामा अद्याप टळला आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडीनंतरही कोकाटे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले. आता प्रश्न असा आहे की, वादग्रस्त कृत्यांनंतरही मंत्रीपद टिकवणं ही राजकीय प्रतिष्ठेची शर्यत ठरणार का?

शेतकऱ्यांविषयी (Farmer) सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, या दोन प्रकरणांमुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (MANIKRAO KOKATE) यांच्यावर टीकेची झोड उठली असून, ते सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने न घेणं आणि सभागृहासारख्या गंभीर ठिकाणी रमी खेळण्याचा प्रकार हे एकाचवेळी उघडकीस आल्यानं, कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार लटकलेली आहे.

MANIKRAO KOKATE
MANIKRAO KOKATE

या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) कोकाटे यांनी मंत्रालयात पक्षाचे मुख्यनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली चूक कबूल करत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, यामागे केवळ राजकीय दबाव शमवण्याचा प्रयत्न आहे की, खऱ्या अर्थानं पश्चात्ताप, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि विरोधकांनी उचललेला मुद्दा लक्षात घेता, हे प्रकरण लवकर थांबणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे, शेतकरीविरोधी विधान आणि सभागृहात रमी खेळल्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. मंत्रिपदाचा दर्जा सांभाळताना वर्तनातही गांभीर्य हवे, हे अजित पवारांनी स्पष्टपणे मांडले. यावेळी कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या (NCP Minister) बैठकीत गंभीर चर्चा झाली. मात्र, पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांना समज द्यावी, अशी भूमिका मांडल्याने राजीनाम्याच्या शक्यतेवर तातडीने पडदा टाकण्यात आला आहे.

या बैठकीनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे की, पक्ष आगीवर फुंकर घालतोय की खरंच कोकाटेंना दुसरी संधी दिली जातेय? विशेष म्हणजे कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी देखील दाखल झाले असून, त्यांचा शिरकाव पुन्हा एकदा मंत्रिपद टिकवण्यासाठीचा प्रयत्न मानला जात आहे. परंतु जनता आणि विरोधक या प्रकरणात अजूनही समाधानी नाहीत. त्यामुळे ही वादळं इतक्यात थांबतील असं वाटत नाही.

MANIKRAO KOKATE
MANIKRAO KOKATE

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये वादग्रस्त वक्तव्ये आणि सभागृहातील वर्तनामुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील हजर होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करत कोकाटेंना स्पष्ट शब्दांत सुनावले “तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं.”

हे वक्तव्य करताना अजित पवारांचा आवाजात नाराजीची तीव्रता स्पष्ट जाणवत होती. सत्ताधारी पक्षाच्या एका वरिष्ठ मंत्र्याकडून असे वर्तन अपेक्षित नाही, असेही ते अप्रत्यक्षपणे सूचित करत होते. या ठिकाणी, कोकाटेंनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत आपल्या चुकांची कबुली दिली आणि “यापुढे बोलताना, वागताना मी काळजी घेईल” असे स्पष्टीकरण दिले.

राजकीय वर्तुळात ही बैठक विशेष लक्षवेधी ठरली आहे. एकीकडे सरकारची प्रतिमा आणि दुसरीकडे मंत्र्यांचे वादग्रस्त वर्तन, या सगळ्याचा ताण अजित पवारांसारख्या नेतृत्वावर आहे. त्यामुळे या घटनेने पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राजीनामा नाही, खातेबदल होणार?

MANIKRAO KOKATE
MANIKRAO KOKATE

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरु असलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आता राजीनाम्याचा निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गेला आहे, अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. “कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय आता माझ्याकडे नसून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे,” असे स्पष्ट करत अजित पवारांनी आता निर्णयाची जबाबदारी थेट मुख्यमंत्र्यांवर टाकली आहे.

दरम्यान, राजीनामा दिला जाणार की नाही, या संभ्रमात असतानाच दुसरीकडे महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलले जाणार असल्याची अंतर्गत माहिती पुढे आली आहे. म्हणजेच वादाच्या झोतात असलेल्या कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवून केवळ त्यांचं खातं दुसऱ्या विभागात हलवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हे सगळं घडताना सरकारची विश्वासार्हता आणि मंत्र्यांच्या वर्तनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Leave a comment