MANOJ JARANGE PATIL: “मुंबईकरांना त्रास देऊ नका, तुमच्यामुळे माझी जात हरू नये; जरांगे पाटलांचा शेवटचा इशारा…
“आझाद मैदानावर मराठ्यांचा संघर्ष तापला, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांचा आक्रमक इशारा; ‘आरक्षणाच्या वाट्याला दुसरे वाटेकरी नकोत’ या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हं स्पष्ट!”
MANOJ JARANGE PATIL: मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे” या ठाम मागणीसाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. मात्र या आंदोलनावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. (MANOJ JARANGE PATIL) याचिकाकर्त्यांनी आंदोलनातील नियमभंगावर बोट ठेवत आक्षेप घेतला आणि कोर्टाने आंदोलकांना “नियम पाळा” असा स्पष्ट इशारा दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनीही आपल्या समर्थकांना आवाहन करत, नियम मोडू नये, शांततेत आंदोलन सुरू ठेवावे, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक गाजली. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. “ते लोक काय करणार याचा आम्हाला काहीही संबंध नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरू करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत मोर्चे काढा आणि स्पष्ट सांगा आमच्या ओबीसीच्या वाट्यात दुसरे वाटेकरी चालणार नाहीत!” असा जाहीर आदेशच भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला.
एकीकडे जरांगे पाटील नियम मोडू नये अशी हाक देत आहेत, (MANOJ JARANGE PATIL) तर दुसरीकडे भुजबळांनी ओबीसी कार्यकर्त्यांना थेट रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या संघर्षात आता “मुंबईपासून राज्यभरातल्या रस्त्यांवर” तापलेलं वातावरण आणखी पेट घेणार हे निश्चित दिसत आहे.
आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे – जरांगे पाटील:

मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलकांसमोर भावनिक आवाहन करत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेची पुनरावृत्ती केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे.” आझाद मैदानाशेजारील मोकळे मैदान गाड्यांसाठी वापरण्याची परवानगी मिळाल्याचे सांगून त्यांनी आंदोलकांना शांततेत बसण्याचे निर्देश दिले.
पाटील म्हणाले, “तुम्हाला आरक्षण नको असेल तर तुम्ही गावाकडे जाऊ शकता. पण मी मात्र तुमच्या लेकराबाळांसाठी हा त्रास सहन करत आहे. (MANOJ JARANGE PATIL) मला किती यातना होत आहेत हे तुम्हाला कदाचित जाणवत नसेल. पण माझा संघर्ष एकाच गोष्टीसाठी आहे, आरक्षण मिळवून आपल्या पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी.” त्यांच्या या शब्दांतली कणखरता आणि वेदना दोन्ही आंदोलकांपर्यंत पोहोचली. जरांगे पाटील यांनी शेवटी ठामपणे म्हटलं आहे की, “मला माझी जात मोठी करायची आहे.” त्यांच्या या घोषणेने चौथ्या दिवशीही सुरू असलेल्या आंदोलनाला नवी उर्जा मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे:

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भावनिक शब्दांत समर्थकांना आवाहन केले. ते म्हणाले, “मला त्रास होत आहे, तुम्हाला बोलण्यासाठी पाणी प्यावं लागतं. माझी शेवटची विनंती आहे, मुंबईकरांना त्रास देऊ नका. तुमच्यामुळे माझी जात हरू नये.” जरांगे पाटील यांनी आंदोलकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत, “सर्वांनी मैदानात गाड्या लावा आणि झोपा. गावाकडून जेवण येत आहे, लोक आपली काळजी घेत आहेत. (MANOJ JARANGE PATIL) न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, शांत रहा. ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जा.” त्यांच्या या शब्दांनी आंदोलकांमध्ये गंभीरता आणि शांततेचा संदेश पसरला.
ओबीसी समाजाकडून आंदोलनाची घोषणा:

मुंबईत आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. भुजबळांनी थेट आंदोलनाची घोषणा करत कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे, “ते लोक काय करणार याचा आम्हाला काहीही संबंध नाही. आपण आता तयारीला लागा.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “अनेक ठिकाणी उपोषणे सुरू करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत मोर्चे काढा. (MANOJ JARANGE PATIL) आमच्या ओबीसीच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नकोत हीच मागणी करा.” भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ओबीसी समाजाचा लढा आता अधिक तीव्र होणार असून, राज्यात वातावरण पेट घेणार हे स्पष्ट झाले आहे.
