Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

NASHIK NEWS: गुन्हेगारांची खैर नाही! आयुक्तालयाच्या कारवायांना गती, ‘टॉप टेन’ सराईतांवर लक्ष केंद्रित; गुन्हेगारांनसाठी रेड अलर्ट…पहा सविस्तर

NASHIK NEWS: गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालय आता आक्रमक पवित्रा घेत आहे! तडीपारी, प्रतिबंधात्मक कारवाया करूनही अनेक सराईत गुन्हेगार गंभीर गुन्ह्यांत सहभागी होत असल्याचे आढळल्याने, आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलिस दलाने कठोर कारवाईचे धोरण राबवायला सुरुवात केली आहे.

नाशिक | Nashik

NASHIK NEWS: गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालय आता आक्रमक पवित्रा घेत आहे! तडीपारी, प्रतिबंधात्मक कारवाया करूनही अनेक सराईत गुन्हेगार गंभीर गुन्ह्यांत (NASHIK NEWS) सहभागी होत असल्याचे आढळल्याने, आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलिस दलाने कठोर कारवाईचे धोरण राबवायला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुका, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या मोठ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून गुन्हे शाखेपासून ते सर्व पोलीस ठाण्यांनी (NASHIK NEWS) सराईतांची यादी अपडेट केली असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी मिटके यांच्या नेतृत्वाखाली तेराही पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, हिस्ट्रीशीटर व चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या गुन्हेगारांना जरब बसणारच! कारण यावेळी पोलिसांची तयारी ‘नो टॉलरन्स’ मोडवर आहे.

तडीपारी व प्रतिबंधात्मक कारवाया करूनही बहुतांश सराईत गंभीर गुन्ह्यात (Crime) सहभागी होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत, समाजाच्या सुरक्षेला धोका (NASHIK NEWS) पोहोचवणाऱ्या या सराईत गुन्हेगारांविरोधात आता आयुक्तालयाने (Police Commissionerate) अधिक कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. फक्त नावापुरती कारवाई न करता, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसह (Local Body Election), दिवाळी व इतर सणोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, या गुन्हेगारांची माहिती पुन्हा तपासून सराईतांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे. ही यादी केवळ आकडेवारी नसून पोलिसांच्या रणनीतीचा कणा ठरणार आहे.नाशिक पोलिसांकडून आता केवळ कारवाई नव्हे, तर समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून सराईत गुन्हेगारांसाठी येणारा काळ अंधारमय ठरणार आहे.

NASHIK NEWS
NASHIK NEWS

नाशिक शहरातील (NASHIK NEWS) गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आयुक्तालयाने आता अधिक आक्रमक आणि ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांसह टोळींवर आता थेट मोक्का, स्थानबद्धता, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचा (Action) जोर लक्षणीयरीत्या वाढवण्यात येणार आहे.

यामागील मुख्य उद्देश म्हणजे आगामी गणेशोत्सव, दिवाळी आणि सार्वत्रिक निवडणुका या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, ‘भलतंच विघ्न नको’ म्हणून सुरुवातीपासूनच काटेकोर खबरदारी घेण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक कारवाई आणि त्यात लागणाऱ्या बाबींची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. या सगळ्याचा थेट संदेश असा दिला गेला आहे. सराईत गुन्हेगारांनी (NASHIK NEWS) आता सावध होणे गरजेचे आहे. कारण यंदा नाशिक पोलिसांची नजर अधिक तीव्र, आणि कारवाई अधिक प्रभावी असणार आहे!

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या स्पष्ट आदेशानुसार नाशिक पोलिस दल आता सराईत गुन्हेगारांवर चोख कारवाईसाठी सज्ज झाले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड (NASHIK NEWS) या महत्त्वाच्या विभागांचे सहाय्यक आयुक्त, तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, तेराही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, एनडीपीएस व गुंडाविरोधी पथकाचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी हद्दीतील सराईत गुन्हेगार, चोरटे व हिस्टीशिटरवर आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही परिमंडळांसह पोलीस ठाण्याच्या संबंधित विभागांनी सराईतांची यादी अपडेट केली असून, यानुसार पुढील काही दिवसांत कारवाई आरंभली जाणार आहे. आता गुन्हेगारांसाठी मोकळे रस्ते बंद होणार आहेत!

राजकीय गुन्हेगारीदरम्यान, यापूर्वी पोलिसांनी राजकीय नेत्यांसह त्यांची मुले व इतरांवर मोक्का, तडीपारी व इतर गुन्हे नोंदवले होते. मात्र, कालांतराने अचानक हे गुन्हे खिळखिळे झाले, एव्हाना रद्दही झाले. त्यातून अनेकांना दिलासा मिळून ते भाजपवासी होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यानुसार यापुढे राजकीय नेते, पक्ष पदाधिकारी, नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या मर्जीत राहून गुन्हे करणाऱ्यांना यंदा हेरले जाणार का? त्यातील अनेकांचा ‘टॉप टेन’ यादीत समावेश आहे.

टॉप टेन’वर लक्ष:

NASHIK NEWS
NASHIK NEWS

शरीर व मालाविरुद्धचे गुन्हे तसेच विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी असणाऱ्या हिस्ट्रीशिटरची यादी आता अधिक काटेकोरपणे संकलित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील ‘टॉप टेन सराईत व गुन्हेगार’ वेगळे ओळखले गेले असून, यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय ‘टॉप टेन’ संशयितांवर आता अधिक तीव्र व कठोर स्वरुपाची कारवाई होणार आहे. फक्त परंपरागत पद्धतीनेच नव्हे, तर तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे यांना जेरबंद करण्याचा संकल्प पोलिसांनी केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, यंदा कारवाईचा आलेख मागील वर्षीच्या तुलनेने अधिक वाढवला जाणार असून, गुन्हेगारांना कुठेही वाव मिळणार नाही, अशीच पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे. गुन्हेगारीला मुळापासून उखडून टाकण्यासाठी नाशिक पोलिसांचा हा मिशन मोड आता सुरू झाला असून, ‘टॉप टेन’ गुन्हेगारांसाठी येणारे दिवस फारच कठीण ठरणार आहेत!

यादी तयार:

NASHIK NEWS
NASHIK NEWS

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा बिघाड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आता पोलिसांनी चांगलाच फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलीस ठाणे (NASHIK NEWS) प्रभारींना सराईतांवर कठोर कारवाईचे आदेश दिले गेले असून, प्रत्येक ठाण्याने ‘टॉप टेन संशयितांची यादी’ तयार केली आहे. या यादीतून सध्या जे सक्रिय गुन्हेगार आहेत, त्यांना थेट लक्ष्य करण्यात येत आहे.या गुन्हेगारांवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे, ज्यात तडीपारीपासून ते गुन्हेगारी कायद्याखालील कारवायांचा समावेश असेल.

पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचा धोक्याचा धोशा उरु देणार नाही, अशी भूमिका घेत आहे. यामुळे आगामी सणोत्सव, निवडणुका नक्कीच शांततेत पार पडतील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. गुन्हेगारांसाठी आता सावधगिरीचा इशारा दिला गेला असून, कायदा तोडणाऱ्यांना क्षमा नाही, ही पोलिसांची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे.

ठळक मुद्दे:

  • वारंवार गुन्हे करणाऱ्यांना नोटिसा
  • गतवर्षी ४०२ जण तडीपार
  • तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्यांना जिल्ह्याबाहेरचा रस्ता
  • स्थानबद्धतेच्या कारवाई वाढवणार
  • दंगलखोरांनाही झटका बसणार
Leave a comment