Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

LATUR CRIME NEWS: लातूरच्या कॉलेजमधील सैराट! तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून केला अत्याचार; प्रेमाच्या नादात फसली मासूम मुलगी…

लातूरच्या ‘शिक्षणाच्या पंढरी’वर वाढत्या गुन्ह्यांचे काळे ढग! कॉलेज परिसरात रेशीमगाठीतून उभे राहणारे गंभीर गुन्हे, १८० ‘मिसिंग’ मुलींना पोलिसांनी परत आणताच पालकांच्या चिंतेत आणखी भर!

LATUR CRIME NEWS: लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एका २४ वर्षीय तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गुडसूर (ता. उदगीर) येथील किरण विठ्ठल सूर्यवंशी याने पाच महिन्यांपूर्वी दुपारी दोन वाजता पीडितेला शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉज येथे नेले. तेथे “तू मला आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे” असे सांगत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. (LATUR CRIME NEWS) पीडितेने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि बळजबरीने अत्याचार केला, असा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतरही आरोपीने पीडितेला “ही बाब कोणाला सांगितली, तर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली. भीतीमुळे काही काळ मौन राखल्यानंतर पीडितेने अखेर धैर्य दाखवून पोलिसांत फिर्याद दिली. शनिवारी (दि.१३) आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी आणि संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून उदगीर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. (LATUR CRIME NEWS) या घटनेमुळे परिसरात संताप आणि अस्वस्थता व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटनांकडून पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

उदगीर हादरवणारी घटना : महाविद्यालयीन मैत्रीतून तरुणीवर जबरदस्ती, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद:

LATUR CRIME NEWS
LATUR CRIME NEWS

उदगीरमधील एका नामांकित महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षण घेत असताना आरोपी तरुण आणि पीडित मुलीची ओळख झाली. (LATUR CRIME NEWS) मैत्री वाढत असताना आरोपीने तिला विश्वासात घेऊन लॉजवर नेले आणि शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी “आपण भविष्यात लग्न करू, आपला सुखाचा संसार थाटू” असे आश्वासन देत तो सतत संपर्कात राहिला.

काही काळानंतर पीडितेने नकार दर्शविल्यावर आरोपीने धमकीचा मार्ग अवलंबला. “तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझा जीव घेईन,” अशी धक्कादायक धमकी देत त्याने पीडितेवर दबाव टाकला, असे तक्रारीत नमूद आहे. अखेर भीतीवर मात करत पीडितेने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने शनिवारी स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (LATUR CRIME NEWS) ही घटना महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित करत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जिल्हाभरातील प्रेमप्रकरणातून अतिप्रसंगाच्या अनेक घटना उघड:

LATUR CRIME NEWS
LATUR CRIME NEWS

मागील काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि पालकांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॉलेजांमध्ये निर्माण होणाऱ्या मैत्रीच्या नात्यांचे पुढे गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतर होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.  (LATUR CRIME NEWS) शिक्षणाच्या पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये राज्यासह राज्याबाहेरील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात, मात्र वाढत्या गुन्ह्यांनी या प्रतिमेला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत समुपदेशन करून तब्बल १८० ‘मिसिंग’ मुलींना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही आकडेवारीच चिंतेचा इशारा देणारी आहे. रेशीमगाठ जुळलेल्या मैत्रीच्या नात्यांपासून सुरू होणारी मैत्री, पुढे धमक्या, फसवणूक आणि गुन्हेगारी वळण घेतेय, असे प्रकार वाढल्याचे स्पष्ट दिसते.  (LATUR CRIME NEWS) लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पालकांना आपल्या मुला-मुलींवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे, अशी जोरदार मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.

Leave a comment