Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

ARUN GAWALI: मुंबई अंडरवर्ल्डचा टर्निंग पॉईंट! रमा नाईकच्या मृत्यूनं पेटला वाद, काय आहे गवळी आणि दाऊद ची कहाणी…

मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्यातील गवळी-दाऊद वैराची रक्तरंजित कहाणी... ‘डॅडी’ म्हणून नावाजलेला अरुण गवळी, सूडाने पेटलेला प्रवास आणि भयाकळा स्लममधून उभा राहिलेला गुन्हेगारीचा नवा बादशहा!

ARUN GAWALI: मुंबईचा कुख्यात गँगस्टर अरुण गवळी अखेर 17 वर्षांनी जामिनावर बाहेर आला आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर तुरुंगवासातून सुटलेल्या गवळीच्या परतीमुळे पुन्हा एकदा दगडी चाळ गजबजली आहे. ‘डॅडी’ या टोपणनावाने ओळखला जाणारा हा गँगस्टर एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा दादा म्हणून राज्य करत होता. (ARUN GAWALI) दाऊद इब्राहिमचा सर्वात विश्वासू हात म्हणून गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवणारा गवळी नंतर त्याचाच कट्टर शत्रू बनला आणि याच वैरामुळे मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासात रक्तरंजित अध्याय लिहिला गेला.

अरुण गुलाब गवळी हे त्याचे पूर्ण नाव. मूळचे मध्य प्रदेशातील खंडव्यातील असलेले त्याचे कुटुंब कामाच्या शोधात महाराष्ट्रात आले आणि अहमदनगर येथे गवळीचा जन्म झाला. गरिबीच्या छायेत वाढताना त्याला लहानपणी घराघरांत जाऊन दूध विकावं लागलं. पण परिस्थितीने या मुलाला सरळ रस्त्यावर ठेवले नाही. हळूहळू तो गुंडांच्या संपर्कात आला आणि थेट दाऊद इब्राहिम व छोटा राजन यांच्या वर्तुळात दाखल झाला. पाहता पाहता तो दाऊदच्या कन्साइनमेंटचे काम सांभाळू लागला. मात्र, गुन्हेगारी जगतातील मैत्री नेहमीच टिकाऊ नसते एक दिवस आला आणि गवळी (ARUN GAWALI) व दाऊद यांच्यातील विश्वास संपुष्टात आला. त्यातून जन्माला आलेली कट्टर शत्रुत्वाची कहाणी आजही मुंबईच्या गल्लीबोळांत चर्चेत आहे.

गवळीचा तुरुंगातून बाहेर पडणं हे केवळ एका कैद्याच्या सुटकेचं प्रकरण नाही, तर पुन्हा एकदा जुन्या ‘डॅडी’च्या साम्राज्याच्या सावल्या शहरावर पडण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. आता 70 वर्षांच्या गवळीचा पुढचा डाव नेमका काय असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता लागली आहे.

गुन्हेगारी विश्वात एंट्री कशी झाली ?

ARUN GAWALI
ARUN GAWALI

मुंबईच्या गुन्हेगारी जगतात 1980 चं दशक हे रक्तरंजित बदल घडवून आणणारं ठरलं. याच काळात अरुण गवळीची एंट्री झाली आणि शहराच्या अंडरवर्ल्डला नवा खेळाडू मिळाला. (ARUN GAWALI) शालेय जीवनातला त्याचा मित्र रामा नाईक आधीच एका ताकदवान गँगचा भाग होता. ही गँग खंडणी व तस्करीसारख्या काळ्या धंद्यात गुतलेली होती आणि गवळी त्यात ओढला गेला.

दरम्यान, वरदराजनने मुंबई सोडली आणि करीम लालाही गुन्हेगारीतून बाहेर पडला. परिणामी अंडरवर्ल्डमध्ये फक्त तीन शक्ती उरल्या रामा नाईक, दाऊद इब्राहिम आणि गवळीची गँग. इथूनच मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्याच्या नकाशावर एक नवं वादळ तयार होऊ लागलं.

दाऊद-गवळीची दुश्मनीची कशी झाली ?

ARUN GAWALI
ARUN GAWALI

मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये 1986 नंतर मोठा भूचाल झाला. (ARUN GAWALI) दाऊद इब्राहिमचं नाव गल्लोगल्लीत गुंजू लागलं आणि 1998 साली तो दुबईला पळाला. पण गवळीच्या आयुष्यातला निर्णायक क्षण मात्र तेव्हाच आला, जेव्हा त्याचा जिवलग मित्र रामा नाईक एका टोळीयुद्धात मारला गेला. मित्राच्या मृत्यूने संतप्त झालेल्या अरुण गवळीने सूडाचा ज्वालामुखी पेटवला आणि स्वतःची गँग उभी केली.

याच क्षणापासून दाऊद आणि गवळीची कट्टर दुश्मनी सुरू झाली. भयाकळा स्लमच्या काळ्याकुट्ट वातावरणातून उगवलेला गवळी पाहता पाहता गुन्हेगारी साम्राज्याचा राजा बनला. लोक त्याच्या नावाने थरथर कापू लागले, तर अनुयायी त्याला आदराने “डॅडी” म्हणू लागले.

Leave a comment