Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

NASHIK POLITICS: “नेतृत्व नाही तर पक्ष विस्तार कसा?” गोडसेंचे मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला…पहा काय घडलं

NASHIK POLITICS: शिंदे गटाच्या संघटनात्मक धुर्यांमध्ये आता खदखद उफाळून येत आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थेट पक्षातील जिल्हास्तरावरील नियोजनशून्यता, गटबाजी आणि दुर्बल संघटन यावर ताशेरे ओढले आहेत

नाशिक | Nashik

NASHIK POLITICS: शिंदे गटाच्या संघटनात्मक धुर्यांमध्ये आता खदखद उफाळून येत आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थेट पक्षातील जिल्हास्तरावरील नियोजनशून्यता, गटबाजी आणि दुर्बल संघटन यावर ताशेरे ओढले आहेत. गोडसे म्हणाले, “माझा रोख पक्ष संघटन मजबूत व्हावे यावर आहे.” ते पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री असताना कामगिरी नक्कीच कौतुकास्पद होती, पण जिल्ह्यांमध्ये तेवढीच ताकद आणि बांधणी दिसत नाही.”

विशेष म्हणजे गोडसे यांनी कुणाचेही नाव न घेता मंत्री दादा भुसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. “ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी हे प्राधान्याने करावं, पण ते होताना दिसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, गोडसे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार असून, या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या संघटनात्मक डावपेचांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थेट शब्दात आपल्या नाराजीचा सूर चढवत, जिल्हास्तरावरील संघटनात्मक कमकुवतपणा, गटबाजी आणि नियोजनशून्यता यामुळे पक्षाची वाढ खुंटल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. “पक्षश्रेष्ठींवर कोणतीही नाराजी नाही,” हे स्पष्ट करत त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. मात्र, “जिल्हास्तरावर योग्य नियोजन आणि संघटनशक्तीचा अभाव आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

गोडसे यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे शिंदे गटातील अंतर्गत घोळ पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पक्ष वाढीसाठी केवळ दिल्ली वा मुंबईतील खेळी पुरेशी नाही, तर *जिल्ह्यांतील संघटन मजबुतीकरण हाच खरा पाया आहे, हे गोडसे यांनी दाखवून दिलं आहे. आता या विधानानंतर शिंदे गटात अंतर्गत आत्मपरीक्षण सुरू होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिंदे गटाच्या संघटनेबाबत नाराजी व्यक्त करताना माजी खासदार हेमंत गोडसे यांनी थेट सांगितले की, “जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार (MLA) असतानाही उर्वरित १३ विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष यंत्रणा उभी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” मात्र, या दिशेने आजवर काही ठोस पावले उचलण्यात आलेली दिसत नाहीत, हे त्यांनी ठामपणे नमूद केले. “गटबाजी रोखणे, शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवणे आणि कुशल नेतृत्व शोधून जबाबदारी वाटप करणे हे सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

गोडसे यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला की, “शिवसेनेकडे आज इनकमिंग मोठ्या प्रमाणात आहे, मात्र अंतर्गत गटबाजीचे ‘लोन’ वाढू लागल्यास ते पक्षासाठी घातक ठरू शकते.” विशेषतः आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर* ही स्थिती चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर निशाणा साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “*माझा रोख पक्ष संघटन मजबूत व्हावे, यासाठी आहे.” त्यांनी *जिल्ह्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे, त्यांनी हे काम प्राधान्याने करणे अपेक्षित आहे, असे ठामपणे म्हटले. मात्र, “तसे होतांना दिसत नसल्याने नाराजी वाटते,” अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांनी मंत्री दादा भुसे यांचे नाव घेतले नसले, तरी त्यांनी केलेला अप्रत्यक्ष उल्लेख पुरेसा स्पष्ट होता.

पुढे बोलताना गोडसे म्हणाले, “मी आज खासदार श्रीकांत शिंदे यांची वैयक्तिक कामासाठी भेट घेणार असून, या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे.” त्यामुळे आगामी काळात शिंदे गटात संघटनात्मक सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील नाराज स्वर आता उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत, हे निश्चितच नेतृत्वासाठी एक गंभीर इशारा ठरतो आहे.

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

तसेच हेमंत गोडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) शिस्तबद्ध कार्यसंस्कृतीचे कौतुक करताना म्हटले की, “भाजपची संघटन बांधणी उत्कृष्ट आहे. त्यांच्याकडे पक्ष शिस्त चांगली आहे,” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment