Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

NASHIK POLITICS: “‘तो’ काँग्रेस नेता भाजपात जाणार का? पण नेत्याने घेतला ठाम निर्णय!”…कोण आहे हा नेता?

NASHIK POLITICS: राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असतानाच, सर्वच पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. निवडणुकांची घोषणा कधी होणार, दिवाळीपूर्वी की नंतर, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात रंगणारी ही राजकीय लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

नाशिक | Nashik

NASHIK POLITICS: राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असतानाच, सर्वच पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. निवडणुकांची घोषणा कधी होणार, दिवाळीपूर्वी की नंतर, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (NASHIK POLITICS) यांच्यात रंगणारी ही राजकीय लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुद्धा तापलेल्या आहेत. मात्र अशा चर्चांना पुर्णविराम देत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवल्या जात होत्या, परंतु त्या सगळ्या बिनबुडाच्या आहेत.

मी आजही काँग्रेसमध्येच आहे आणि राहणारही आहे.” त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारांसाठी अनेक वर्षे झटले असून, आजही पक्षासाठी ते राज्यस्तरीय जबाबदारी पार पाडत आहेत. पक्षांनिष्ठेचे हे वक्तव्य म्हणजे अफवांना चपराकच मानली जात आहे. अशा घडामोडींनी राजकीय वातावरण आणखी तापले असून, निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच रोचक होणार हे निश्चित!

राज्यात येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय (NASHIK POLITICS) हवा आता तापू लागली आहे. सर्वच पक्षांकडून युद्धपातळीवर निवडणुकीची तयारी सुरू असून, कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत प्रत्येक जण रणनिती आखण्यात गर्क आहे. निवडणुकांच्या तयारीला सर्वच यंत्रणा लागली असून, गावागावांत बैठका, प्रचारफेरी आणि गुप्त हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय वर्तुळात (NASHIK POLITICS) याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. निवडणुकीचे फटाके दिवाळीपूर्वी फुटणार की दिवाळीनंतर? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या लढतीत कोण बाजी मारणार? याची चुरस दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. या लढतीची उत्सुकता शिगेला पोहचली असून, जनतेचं लक्ष आता उमेदवारांपेक्षा (NASHIK POLITICS) पक्षांच्या डावपेचांकडे वळलं आहे. या रणधुमाळीत कोणता पक्ष सत्ता राखतो, कोणता नवा विजय खेचून आणतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे!

राज्यातील राजकारण सध्या इनकमिंगच्या जोरावर गरम झालं आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळत असून, राजकीय रंगमंचावर मोठ्या नेत्यांचे प्रवेश हे एक प्रकारचं आकर्षण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात भाजपात अनेक मोठमोठे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे केला आहे.

नाशिकमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून शहरातील काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरून ते थेट कार्यकर्त्यांमध्ये, चहाच्या टपरीपासून राजकीय मंडळांपर्यंत ही चर्चा तापली आहे. मात्र, या सगळ्या चर्चांना सडेतोड उत्तर देत काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे (NASHIK POLITICS) यांनी भाजप प्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्या अफवा असल्याचे म्हंटले आहे. “मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहणार,” असा ठाम शब्द त्यांनी दिला आहे. यामुळे सध्या नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून, चर्चांना वेगळं वळण मिळालं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल दिवे?

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अशा अफवा येत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर, राजकीय वर्तुळात आणि स्थानिक पातळीवर माझ्या इतर पक्षात प्रवेश होणार या सगळ्या अफवा मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात होत्या. मात्र, स्वतः पुढे येत त्यांनी या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

“मी आजही काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि यापुढेही काँग्रेस पक्षातच राहणार आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा जबाबदार राज्यस्तरावर काम करणारा प्रतिनिधी आहे, असे सांगून त्यांनी पक्षातील आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, “काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे” आणि “काँग्रेस पक्षाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करतो आहे” असे त्यांनी ठासून सांगितल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी मी जोडलेलो असल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडून कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही आहे.” गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांनी स्वतः पुढे येत या साऱ्या चर्चांना खोडून काढले आहे.

ते म्हणाले की, “येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व संघटना मजबुती करण्याकरता मी कटिबद्ध आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्या या अफवा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये.” त्यांनी ठामपणे सांगितले की, “माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबुतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
शेवटी त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले, “जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” अशी अधिकृत माहिती खुद्द राहुल दिवे यांनी दिली. या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये गळतीच्या चर्चांना जोराचा धक्का बसला असून, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे.

NASHIK POLITICS
NASHIK POLITICS

राजकारणात यशस्वी आणि प्रामाणिक कार्य करताना विरोधकांचे लक्ष आपोआप वेधले जाते, आणि हेच काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांच्याबाबतीत घडताना दिसते. “गेल्या काही वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, माझ्या प्रभागात आणि विभागात ज्या पद्धतीने माझ्या कामाचा ठसा उमटवला आहे, त्यामुळे इतर पक्षांचे आकर्षण माझ्याकडे होऊ शकते,” अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितले की, “मी कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही. मी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी कटिबद्ध आहे.” ही भूमिका त्यांनी पुन्हा एकदा प्रभावीपणे मांडली आहे.

त्यांच्या कार्यकाळात प्रभागातील नागरी सुविधा, विकासकामे आणि जनसंपर्क यामध्ये त्यांची ठसा उमटवणारी शैली ही विरोधकांनाही जाणवली आहे. त्यामुळेच काही राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणत्याही प्रलोभनांना bगळून फक्त काँग्रेसचाच झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यांच्या या निष्ठेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ते पक्षाच्या विजयासाठी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनाही वाटतो आहे.

Leave a comment