Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

POST OFFICE NEW SCHEME: फक्त ५ लाख गुंतवा आणि व्याजातून मिळवा तब्बल २ लाख… कोणती आहे ही पोस्टची नवीन स्कीम…

फक्त ५ लाखांची गुंतवणूक, आणि व्याजातून तब्बल २ लाखांहून अधिक कमाई! शिवाय इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत करसूटही मिळणार. सुरक्षिततेसोबत हमखास नफा देणारी ही योजना सध्या चर्चेत, संधी गमावू नका!

POST OFFICE NEW SCHEME: आजकालच्या अनिश्चितेच्या वातावरणात प्रत्येकाला सर्वप्रथम एकच चिंता सतावते ती म्हणजे पैसे कुठे ठेवले तर सुरक्षित राहतील आणि त्यावर समाधानकारक परतावा मिळेल? वाढत्या महागाईच्या सावटात आणि बाजारातील अस्थिरतेत लोकांच्या गुंतवणुकीचे गणित पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळेच सरकारी योजनांना पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण या योजना केवळ सुरक्षिततेची हमी देतात असे नाही, तर सोबत टॅक्स बचतीचे दुहेरी फायदेही देतात.

अशा वेळी, पोस्ट ऑफीसची (POST OFFICE NEW SCHEME) टाईम डिपॉझिट स्कीम गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर तुमचा पैसा सरकारी सुरक्षिततेच्या कवचाखाली राहतो आणि तुम्हाला तब्बल ७.५% टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. आजच्या घडीला हा परतावा छोटा नाही, विशेषत: बँकांच्या डिपॉझिट व्याजदराशी तुलना केली तर. त्यामुळे ज्यांना स्थिर परतावा आणि सुरक्षितता हवी आहे, त्यांच्यासाठी ही स्कीम खरोखरच हिट ठरत आहे.

याहूनही महत्त्वाचं म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्येही सुट मिळते. इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर सूट मिळाल्यामुळे तुम्ही केवळ पैसा वाढवता असे नाही, तर तुमचं टॅक्स बचतीचं गणितही अधिक मजबूत करता. म्हणजेच एका गुंतवणुकीतून तीन फायदे. पैसा सुरक्षित, परतावा हमखास आणि करसवलतीचा बोनस!

पोस्ट ऑफीसची टाईम डिपॉझिट स्कीम,का आहे खास?

पोस्ट ऑफीसची (POST OFFICE NEW SCHEME) ही टाईम डिपॉझिट योजना खरोखरच सर्व वयोगटांसाठी उपयुक्त मानली जाते. लहान मुले, तरुण किंवा बुजुर्ग – प्रत्येकजण यात गुंतवणूक करून सुरक्षित भविष्य घडवू शकतो. या योजनेत सुरुवात करायला मोठ्या रकमेची गरज नाही; फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे गुंतवणुकीसाठी कालावधी ठरवण्याचीही मुभा मिळते. आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. विशेष म्हणजे, कालावधी जितका जास्त तितका व्याजदरही अधिक आकर्षक मिळतो. त्यामुळे सुरक्षिततेसोबतच निश्चित परताव्याचा फायदा सर्व गुंतवणूकदारांना मिळतो.

2 लाख रुपयांचे व्याज कसे मिळणार?

POST OFFICE NEW SCHEME
POST OFFICE NEW SCHEME

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट योजनेत 5 वर्षांसाठी तब्बल 5 लाख रुपये गुंतवले, तर त्याला यावर 7.5% व्याजदर लागू होतो. या हिशोबाने केवळ व्याजाच्या स्वरूपात 5 वर्षांत तब्बल 2,24,974 रुपये मिळतील. म्हणजेच गुंतवणूकदाराला मुळ रकमेव्यतिरिक्त केवळ व्याजातूनच 2 लाख रुपयांहून अधिक अतिरिक्त कमाई करता येते. एवढंच नव्हे तर, मुळ रक्कम आणि व्याज एकत्र करून गुंतवणूकदाराच्या हाती एकूण 7,24,974 रुपये येतात. त्यामुळे ही योजना फक्त सुरक्षित नाही, तर जास्त परतावा देणारा खात्रीशीर पर्याय ठरते.

कालावधीनुसार मिळणार व्याजाचे पैसे:

POST OFFICE NEW SCHEME
POST OFFICE NEW SCHEME

पोस्ट ऑफिसची ही टाईम डिपॉझिट योजना विविध कालावधींसाठी गुंतवणुकीची सोय देते आणि त्यानुसार व्याजदर बदलतात. जर तुम्ही 1 वर्षासाठी पैसे गुंतवले, तर तुम्हाला 6.9% व्याजदर मिळतो. याच योजनेंतर्गत जर तुम्ही 2 वर्षे किंवा 3 वर्षांसाठी पैसे लावले, तर व्याजदर थोडा वाढून 7% होतो. मात्र, या योजनेंतर्गत सर्वाधिक फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता. कारण इतक्या दीर्घ कालावधीत गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5% इतका जास्त व्याजदर मिळतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना अधिक फायदेशीर व आकर्षक पर्याय ठरते.

टॅक्समधून सुट मिळाल्याचा फायदा:

POST OFFICE NEW SCHEME
POST OFFICE NEW SCHEME

या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती केवळ सुरक्षित गुंतवणूक नाही तर त्यातून टॅक्समध्येही मोठा दिलासा मिळतो. कारण या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते. याचा सरळ अर्थ असा की, तुम्ही केवळ पैसा सुरक्षित ठिकाणी लावत नाही, तर त्याचबरोबर तुमचं करभारही कमी करत आहात. त्यामुळे गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होतो. एकीकडे व्याजातून चांगला परतावा आणि दुसरीकडे करबचत. यामुळे पैशाची वाढ आणि आर्थिक सुरक्षितता दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतात.

Leave a comment