RAJ THACKERAY: “आठ दिवस रस्त्यावर लढा सुरूच, सरकार शांत! आता ‘राज’किय मदतीसाठी मनसे प्रमुखांची भेट”! काय घडल…पहा सविस्तर
RAJ THACKERAY: नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड संघर्ष आंदोलनाला आता जोरदार राजकीय वळण मिळताना दिसत आहे. तासिका शिक्षक आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीसह बाह्य स्रोत भरती रद्द करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी ठिय्या दिला असला, तरी सरकारच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संतप्त भावना अधिक उफाळून येत आहेत.
नाशिक | Nashik
RAJ THACKERAY: नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड संघर्ष आंदोलनाला आता जोरदार राजकीय वळण मिळताना दिसत आहे. तासिका शिक्षक आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीसह बाह्य स्रोत भरती रद्द करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी ठिय्या दिला असला, तरी सरकारच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संतप्त भावना अधिक उफाळून येत आहेत. आंदोलनाची झळ आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांची भेट घेण्यासाठी हे आंदोलक आज मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, माजी आमदार जे.पी. गावित आणि कामगार नेते डॉ. डी.एल. कराड यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढण्याची हमी देण्यात आली आहे. त्याआधी मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार खोसकर आणि पवार यांनी आंदोलन मागे घ्या, असं आवाहन केलं होतं, पण आंदोलक ठाम आहेत. आता संघर्ष आणखी तीव्र होणार, असं स्पष्ट चित्र निर्माण झालं आहे.
नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर गेले आठ दिवस सुरू असलेलं बिऱ्हाड संघर्ष आंदोलन आता अधिक आक्रमक रूप धारण करत आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या तासिका शिक्षक आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाने राज्य शासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचार्यांना कायमस्वरूपी करा, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा” या मुख्य मागण्यांभोवती आंदोलन केंद्रीत असताना सरकारची दुर्लक्ष वृत्ती आंदोलनकर्त्यांच्या संतापाला अधिक पेटवत आहे.

सरकारकडून न्याय मिळत नसेल तर राजकीय समर्थन मिळविण्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून आता हे आंदोलक थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर आंदोलनाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या संतप्त आंदोलनात राजकीय रंग मिसळत चालला असून संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत दिसत आहेत.
नाशिकच्या आदिवासी आश्रमशाळांतील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसतो आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५० आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आज, गुरुवारी (दि. १७), थेट मुंबईत (Mumbai) राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ आंदोलनाची (Protest) सविस्तर माहिती राज ठाकरेंसमोर मांडणार असून, विशेष म्हणजे भरतीप्रक्रियेवर तोडगा निघावा, यासाठी त्यांनी हस्तक्षेप करावा, अशी ठाम मागणी होणार आहे.
राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी या विषयात लक्ष घातल्यास आंदोलनाला नवा बळ आणि दिशा मिळू शकते. शासनाकडून सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या आंदोलनकर्त्यांना आता राजकीय पाठबळाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांची भेट ही आंदोलनाच्या पुढील प्रवासात एक निर्णायक वळण ठरू शकते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे. काल (बुधवारी) माजी आमदार जे.पी. गावित आणि कामगार नेते डॉ. डी.एल कराड यांनी नाशिकमध्ये आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

याआधीही मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आणि आमदार नितीन पवार यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलक ठामपणे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि त्यांनी त्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर आता आंदोलक मुंबईत राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर संघर्षाला नवा आयाम मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात:

बिऱ्हाड मोर्चा सुरू झाल्यापासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर संघर्षाचा भडका उडालाय. प्रशासनाचे धाबे दणाणले असून,आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासूनच १२ तासांचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ही तैनाती कुठल्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी असली, तरी आंदोलक ‘आपल्या भूमिकेवर ठाम’ आहेत. तासिका शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, तसेच बाह्य स्रोत भरती रद्द करा, या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
प्रशासकीय यंत्रणेवर यामुळे तणाव वाढत चालला आहे. दरम्यान, शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने, मोर्चात संतापाची लाट उसळताना दिसते आहे. पोलिसांची उपस्थिती असली तरी आंदोलनाचा आवाज दडपता येत नसल्याचे चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.
संपूर्ण शहराचे लक्ष आता या ठिय्या आंदोलनावर खिळले आहे.हे आंदोलन फक्त मागण्या पूर्ण करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आता तो आदिवासी समाजाच्या हक्कासाठीचा निर्णायक लढा ठरतो आहे. नाशिकच्या रस्त्यांवर आदिवासी बांधवांनी दिलेल्या ठिय्याने प्रशासकीय यंत्रणा गोंधळलेल्या अवस्थेत आल्या आहेत. दररोज पोलीस बंदोबस्त वाढवला जात आहे, मात्र आंदोलकांचा निर्धार दिवसेंदिवस अधिक ठाम होत चाललाय.
फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिकच तीव्र आणि आक्रमक रूप धारण करत आहे. आंदोलन मागे घेण्याच्या विनवण्या, चर्चांचे प्रयत्न, आश्वासनं सगळंच फोल ठरत आहे, कारण आंदोलनकर्ते “मागे हटण्याच्या मूडमध्ये नाहीत.”परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली असली, तरी आंदोलनाचा आक्रोश थांबत नाही. आता या संघर्षातून काय निर्णय निघतो, सरकारचा पुढचा पवित्रा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
