Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

RAJASTHAN CRIME NEWS: बापाने केली १५ वर्षांच्या मुलीची हत्या, दीड वर्षांपासून करत होता अल्पवयीन मुलीवर…

नात्यांचा विश्वास तुडवला… रक्ताच्या धाग्यालाच गळफास! अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर खून; शहर हादरलं, काळजाला वेदना देणारा प्रश्न – मुली खरंच सुरक्षित आहेत का?"

RAJASTHAN CRIME NEWSCRIME NEWS: हे कलियुग आहे! काळ कधी कोणता रंग दाखवेल, कोण कोणाचा कसा घात करेल, हे सांगणं अवघड झालं आहे. समाजात अनेक बदल झाले असले तरी महिला आणि मुलींचं आयुष्य अधिकच कठीण झालं आहे. कधी कोणत्या क्षणी, कोण स्वतःच्या मर्यादा विसरेल, काही सांगता येत नाही. आजही गुन्हेगार शिक्षा भोगूनही सुधरत नाहीत; उलट तुरुंगातून सुटल्यानंतर ते आणखी मोठे अपराध घडवतात. अशावेळी एकच प्रश्न उभा राहतो, महिला खरंच सुरक्षित आहेत का?

याचाच धक्कादायक प्रत्यय राजस्थानमध्ये आला आहे. भरतपूर पोलिसांनी बिहारमधील एका नराधमाला ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी म्हणजे मोहममद अरशत, ज्याने गुन्हेगारीची सगळी मर्यादा ओलांडली आहे. 2007 मध्ये या गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु, शिक्षा भोगून आल्यानंतरदेखील त्याच्या विकृत मानसिकतेत कुठलाही बदल झाला नाही.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या नराधमाने समाज हादरवून सोडणारी दुसरी कृत्य केली. यावेळी त्याने स्वतःच्या दत्तक घेतलेल्या 15 वर्षांच्या मुलीवर  नको ते कृत्य करून सगळ्यांना संतप्त केलं. या घटनेनं केवळ राजस्थानच नाही, तर संपूर्ण देश हादरला आहे. न्यायाच्या भीतीपलीकडे जाऊन अशा गुन्हेगारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, शिक्षा भोगूनसुद्धा काहींची मानसिकता कधीही बदलत नाही.

RAJASTHAN CRIME NEWS
RAJASTHAN CRIME NEWS

सांगायचं झालं तर, प्रत्येक माणूस आपल्या चुकांमधून शिकतो, सुधारतो आणि आयुष्याला नवी दिशा देतो. पण काही लोकं अशीही असतात की ते सर्व मर्यादा ओलांडतात. त्यांच्यासाठी शिक्षा, कायदा, समाज काहीही महत्त्वाचं राहत नाही. राजस्थानात घडलेलं हे प्रकरण त्याचं जिवंत उदाहरण आहे.

मोहममद अरशत हा असा गुन्हेगार ज्याने 2007 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या भयंकर गुन्ह्यामुळे न्यायालयाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एवढा मोठा धडा मिळाल्यानंतरदेखील हा आरोपी सुधारेल अशी समाजाची अपेक्षा होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा विकृतीची परिसीमा गाठली.

या वेळी अरशतने ज्याच्यावर विश्वास ठेवून दत्तक घेतलं होतं त्या 15 वर्षांच्या मुलीसोबत नको ते कृत्य केलं. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून समाज पुन्हा एकदा हादरून गेला आहे. प्रश्न फक्त इतकाच, शिक्षा झाल्यानंतरही जर गुन्हेगार सुधारत नसेल, तर महिला आणि मुली खरंच किती सुरक्षित?

मुलीवर करत राहिला बलात्कार…

RAJASTHAN CRIME NEWS
RAJASTHAN CRIME NEWS

सांगितलं जातं की, मोहम्मद अरशद 2024 मध्ये तुरुंगातून सुटला. समाजात स्वतःला सुधारलेलं दाखवण्यासाठी त्याने एक 15 वर्षांची मुलगी दत्तक घेतली आणि तिच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारल्याचं वचन दिलं. पण या वचनामागे लपलेलं होतं एक भयंकर सत्य!

बाहेरून जबाबदार पालकाचा आव आणणारा अरशद, आतून मात्र राक्षसी प्रवृत्तीचा होता. त्याने या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार केला. मुलीच्या मनावर भीतीचं सावट पसरवण्यासाठी तो वारंवार धमक्या देत असे – “कोणालाही सांगितलंस तर परिणाम भोगावे लागतील”. परिस्थिती इतकी भयानक होती की आरोपी स्वतः तिला शाळेत सोडायचा आणि घरी आणायचा, जेणेकरून मुलगी कुणालाही सत्य सांगू शकणार नाही.

RAJASTHAN CRIME NEWS
RAJASTHAN CRIME NEWS

शेवटी, अस्वस्थ आणि भयभीत पीडितेने आईसमोर सर्व सांगितलं. त्यानंतर घरात आणि परिसरात धक्का बसला. लोकांच्या मनात एकच प्रश्न पेटून उठला आहे – तुरुंगवास भोगूनही जर गुन्हेगार सुधारत नाहीत, तर महिलांची आणि मुलींची खरी सुरक्षा नक्की कुठे आहे?

२५ जून २०२५ रोजी या प्रकरणाला नवा वळण मिळाला, जेव्हा पीडितेच्या आईने थेट शिवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर या भयंकर कृत्याचा संपूर्ण तपशील उघडकीस आला. आपल्या विरोधात गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती मिळताच आरोपी मोहम्मद अरशद फरार झाला. पोलिसांनी सतत शोधमोहीम राबवली आणि शेवटी त्याला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात कठोर चौकशी आणि कारवाई सुरु आहे.

Leave a comment