Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

RAMDAS KADAM: “सावली बार माझाच… पण आम्ही तो चालवत नाही!” रामदास कदमांनी दिली स्पष्ट कबुली…पहा साविसर

RAMDAS KADAM: खळबळजनक आरोप, राजकीय पडसाद आणि जबरदस्त असा कबुलीजबाबाने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अक्षरशः गाजले! शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी थेट राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्सबार प्रकरणावरून गंभीर आरोप करत सभागृहात खळबळ उडवून दिली.

मुंबई | Mumbai

RAMDAS KADAM: खळबळजनक आरोप, राजकीय पडसाद आणि जबरदस्त असा कबुलीजबाबाने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अक्षरशः गाजले! शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी थेट राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (RAMDAS KADAM) यांच्यावर डान्सबार प्रकरणावरून गंभीर आरोप करत सभागृहात खळबळ उडवून दिली. परब यांनी विधान परिषदेत दावा केला की, मुंबईतील “सावली” नावाचा डान्सबार गृहराज्यमंत्री कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असून, तिथून पोलिसांनी छापा टाकून २२ बारबालांना ताब्यात घेतले आहे. यावर त्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.

या आरोपानंतर माजी मंत्री रामदास कदम (RAMDAS KADAM) यांनी स्वतः पुढे येत “सावली बार माझाच असून, परवाने पत्नीच्या नावावर आहेत,” हे मान्य केले. त्यांनी स्पष्ट केलं की, “सावली” बार एक शेट्टी नावाचा इसम ३० वर्षांपासून चालवत आहे, वेटर परवाने आणि ऑर्केस्ट्रा परवाना अधिकृत आहे, मात्र चुकीच्या गोष्टी आढळल्यावर करार तात्काळ रद्द केला.” या विधानामुळेच राजकीय भूकंपाला नवे वळण मिळाले आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक मोठा राजकीय स्फोट झाला, जेव्हा शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते अनिल परब यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आणि सनसनाटी आरोप करत सभागृहात खळबळ उडवली. परब यांनी दावा केला की, मुंबईतील कांदिवली परिसरात “सावली” नावाचा डान्सबार योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असून, पोलिसांनी छापा टाकून तेथून २२ बारबाला ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

RAMDAS KADAM
RAMDAS KADAM

या आरोपांनी राजकीय वातावरण तापवले असतानाच, रामदास कदम यानी खुलासा करत सांगितले की, सावली बार हा त्यांच्या पत्नीच्या नावावर असला तरी तो गेल्या ३० वर्षांपासून एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला आहे. त्याचबरोबर, वेटरचे लायसन्स, ऑर्केस्ट्राचा परवाना सर्व अधिकृत असून, पोलिसांच्या छाप्यानंतर “त्या व्यक्तीसोबतचा करार तात्काळ रद्द केला,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या साऱ्या घडामोडींमुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ‘सावली डान्सबार’ प्रकरणावरून केलेले वक्तव्य केवळ अर्धवट माहितीवर आधारित असून, सभागृहाची दिशाभूल करण्याचा त्यांचा स्पष्ट प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांनी स्पष्ट सांगितले की, “आम्ही तो डान्सबार चालवित नसून, तो गेल्या अनेक वर्षांपासून एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला आहे.”

RAMDAS KADAM
RAMDAS KADAM

“अनिल परब यांनी जाणूनबुजून खोटी माहिती सभागृहात मांडली आहे. त्यांच्या या कृतीमुळे सभागृहाचा दर्जा घसरतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य गंभीरतेने पाहिलं गेलं पाहिजे. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,” अशी तीव्र प्रतिक्रिया कदम यांनी दिली. या साऱ्या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, या प्रकरणाला केवळ डान्सबारपुरते न ठेवता राजकीय हेतूने हाताळले जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

आमचा बार शेट्टी नावाचा इसम चालवतो:

RAMDAS KADAM
RAMDAS KADAM

माजी मंत्री रामदास कदम यांनी अखेर ‘सावली डान्सबार’ प्रकरणावर मौन सोडत धक्कादायक खुलासे केले आहेत. “सावली बार गेल्या ३५ वर्षांपासून माझा आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी डान्सबार संदर्भातील सर्व परवाने वैध असल्याचे सांगितले.

“त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे. तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचे वेटरचे लायसन्स देखील आमच्याकडे आहे, परंतु ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही,” असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर, “पोलिसांनी छापा टाकला तेव्हा काही चुकीच्या गोष्टी आढळल्या.

त्यामुळे आम्ही तात्काळ त्या शेट्टीसोबतचा करार रद्द केला,” असे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Leave a comment