Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

SOLAPUR RAIN : सोलापूर शहरात व जिल्यात काल जोरदार पाऊस.

SOLAPUR RAIN : काल सोलापूर शहरात व जिल्यात जोरदार पाऊस लोकांच्या घरा घरात पाणी गेले. लोकांच्या घरात पाणी गेले व घरांची पडजड झाली व लोकांचे खूप नुस्कान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली व शेतीपिकांचे मोठे नुस्कान.

SOLAPUR RAIN :

 

SOLAPUR RAIN : काल सोलापूर शहरात व जिल्यात जोरदार पाऊस लोकांच्या घरा घरात पाणी गेले. लोकांच्या घरात पाणी गेले व घरांची पडजड झाली व लोकांचे खूप नुस्कान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली व शेतीपिकांचे मोठे नुस्कान.

पहिल्या छायाचित्रात जय मल्हार चौकात घराची पडड़ाड. दुसऱ्या छायाचित्रात खेड गावात ओळ्याला पाणी आल्याने गावचा संपर्क तुटला. तिसऱ्या छायाचित्रात बाळे परिसरातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले, चौथ्या छायाचित्रात निर्मलकुमार फडकुले सभागृहाजवळील झाड हॉटेलवर पडले.

सोलापूर / प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या
दोन दिवसांपासून धुवाँधार पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात जवळपास १०६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील काही घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. बाळे परिसरासह शहरातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले आहे. ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी ओड्यांना पाणी

आल्यामुळे गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

SOLAPUR RAIN
SOLAPUR RAIN

मंगळवार, ५ आणि बुधवारी ६ ऑगस्ट रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे सोलापूर शहरातील सिध्देश्वर मंदिर परिसरातील फडकुले सभागृहाशेजारी असलेले झाड नजिकच्या हॉटेलवर उन्मळून पडल्यामुळे हॉटेलचे नुकसान झाले असले तरी वामध्ये जीवित हानी झालेली नाही. बाळे, संतोष नगर भागातील जवळपास ८० घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार

पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड गावच्या ओढ्याला पाणी आल्याने रहदारीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे खेड आणि बाळे गावचा संपर्क काही काळापुरता तुटला होता. या जोरदार पावसाने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माढा, मंगळवेढा, बार्शीसह सोलापूर शहराला झोडपून काढले. त्यामुळे ओढे, नाले, गटारीसह सखल भागात पाणी साचले होते. अनेक भागातील शेती पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. शेतातील सखल भागात पाणी साचल्यामुळे, उडीद, भूईमूग, सोयाबीन, मका वासारख्या पिकांना भोका निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील विशेषतः हद्दवाढ भागातील अनेक परिसरांची वाताहात झाली. मजरेवाडी नई जिंदगी परिसर होटगी रस्त्यावरील अनेक सोसायट्या आणि नगरामध्ये तसेच हद्दवर भागातील बाळे देगाव परिसरात देखील मुसळधार पावसामुळे पाणी घरात बसल्याने अनेक कुटुंबीयांना रात्र जागून काढावी लागेल. शहरातील प्रभाग क्र ३ भवानीपेठ घोंगडे वस्ती व भाजी मार्केट सार्वजनिक १०० सीट सौचालय, लेंडकी नाला जय भवानी बगीचा व जय भवानी शाळा तसेच पुण्यओक राजमाता अहिल्यादेवी समाज मंदिर, गणेश नगर, सोना नगर, मुनाळे बोळ, सोमाणी फ्लॅट, मानवे नगर या सर्व ठिकाणी पावसाचा पाणी घरात शिरले. यानंतर महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेला तातडीने विविध उपाययोजना केल्या.

SOLAPUR RAIN
SOLAPUR RAIN

सोलापूरसह १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज कृषी हवामान अर्थात आयएमडीने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

घरांची पडझड, शेती पिकांचे मोठे नुकसान

सोलापूर शहरातील जय मल्हार चौक परिसरातील काही घरांची पडझड झाली असून, यामध्ये दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर बाळे परिसरातील जवळपास ८० घरांमध्ये पावसाचे घाण पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेड येथील ओढ्याला पाणी आल्याने रहदारीचा पूल पाण्याखाली गेल्याने खेड आणि बाळे गावाचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a comment