TIK TOK: TikTok येणार भारतात परत? वेबसाईटने निर्माण केली नवी उत्सुकता, पण खरा खेळ अजून बाकी!
“जून 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेले टिकटॉक पुन्हा भारतात परतणार का, यावर सोशल मीडियात उत्सुकता आणि चर्चेला उधाण आलं आहे; वेबसाईट सुरू झाल्याने चाहत्यांच्या मनात नवीन आशेची किरणं जागी झाली आहेत.”
TIK TOK: भारतामध्ये बंदी घातल्यानंतर पुन्हा एकदा टिकटॉकच्या पुनरागमनाची चर्चा जोरदार रंगली आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत खळबळ माजवणारे हे चिनी व्हिडिओ शेअरिंग अॅप, जे जून 2020 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतात बंद करण्यात आले होते, आता पुन्हा देशात सुरू होणार का? असा प्रश्न लाखो चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण, अलीकडेच अनेक युजर्सच्या लक्षात आलंय की टिकटॉकची अधिकृत वेबसाईट भारतात उघडत आहे.
यामुळे टिकटॉक परतणार का? या चर्चेला आणखी खतपाणी मिळालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेबसाईट सुरू झाली असली तरी सध्या हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही. म्हणजेच अॅपचा ‘डाऊनलोड’ पर्याय गायब आहे. तरीदेखील, वेबसाईट सक्रिय होण्यामागचं कारण नेमकं काय? हे भारतामध्ये टिकटॉकचं मोठं पुनरागमन होणार आहे याचं द्योतक आहे का? असा थरारक प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, लाखो टिकटॉक (TIK TOK) चाहत्यांसाठी ही बातमी म्हणजे आशेची नवी किरण ठरत आहे. अनेकजण या अॅपच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता या घडामोडीमुळे त्यांच्या अपेक्षांना उधाण आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या दुनियेत एकेकाळी धुमाकूळ घालणाऱ्या टिकटॉकने जर खरंच भारतात परतायचं ठरवलं, तर हा निर्णय पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवू शकतो.
जून 2020 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतात बंदी घालण्यात आलेले लोकप्रिय चिनी व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (TIK TOK) पुन्हा एकदा भारतात परत येणार का? अशी चर्चा रंगत आहे. कारण, काही युजर्सच्या लक्षात आलंय की टिकटॉकची वेबसाइट आता भारतात सुरू झाली आहे. मात्र, हे अॅप अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही. या घडामोडीमुळे लाखो चाहते आनंदित झाले आहेत, कारण ते याची आतुरतेने वाट पाहत होते.
अधिकृत दुजोरा नाही पण परतीची चिन्हे?

टिकटॉक किंवा त्याची पॅरेंट कंपनी बाइटडान्सने भारतात परतण्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र वेबसाईट उघडत असल्याने लोकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. काही युजर्सनी ‘X’वर वेबसाईट कार्यरत नसल्याची तक्रार केली असून, पुनरागमन टप्प्याटप्प्याने होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
क्रिएटर्स आणि जाहिरातदांवर परिणाम:

भारतामध्ये टिकटॉक बंद झाल्यानंतर अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अॅप्सना लोकप्रिय होण्याची मोठी संधी मिळाली. मात्र, टिकटॉकने पुन्हा परत येण्याचे संकेत दिल्यास सोशल मीडिया विश्वात मोठा बदल घडू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या पुनरागमनामुळे छोट्या आणि नवोदित कंटेंट क्रिएटर्सना स्वतःचं व्यासपीठ मिळेल, जाहिरात व्यवसायात नवी ऊर्जा येईल आणि भारतातील डिजिटल कंटेंटची प्रचंड वाढणारी बाजारपेठ आणखी विस्तारेल.
पूर्णपणे कधी सुरू होणार?

टिकटॉक भारतात पूर्णपणे कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सरकारकडून आणि कंपनीकडून येणाऱ्या गाईडलाईन्सची प्रतीक्षा सर्वांना करावी लागणार आहे. मात्र, टिकटॉकची वेबसाईट भारतात कार्यान्वित झाल्याचे लक्षात आल्यानंतर या लोकप्रिय अॅपच्या पुनरागमनाची शक्यता अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्स आणि कंटेंट क्रिएटर्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच त्यांना पुन्हा टिकटॉकवर आपले आवडते व्हिडिओ पाहण्याची आणि नव्या जोशात कंटेंट तयार करण्याची सुवर्णसंधी मिळेल, अशी अपेक्षा वाढली आहे.
