Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

UDDHAV THACKERAY: ‘मी सांगण्यात कमी पडलो’; उद्धव ठाकरेंनी मांडलं पराभवावर स्पष्ट आणि थेट मत…पहा सविस्तर

UDDHAV THACKERAY: विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर उद्धव ठाकरे यांनी थेट महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांवर फोडले आहे. सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणूक आयोग, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही रोखठोक हल्लाबोल केला.

मुंबई | Mumbai

UDDHAV THACKERAY: विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी थेट महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांवर फोडले आहे. सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणूक आयोग, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही रोखठोक हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत राऊतांनी विचारले, “जे लोकसभेला कमावलं, ते विधानसभेला कसं गमावलं?” त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, “ईव्हीएम घोटाळा, बोगस मतदार, आणि मतदार यादीतील खेळ सुरुच आहे.

लाडकी बहीणसारख्या फसव्या योजना जनतेसमोर उघड झाल्या. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली होती. काही मतदारसंघ सोडावे लागले. विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तू-तू, मै-मै सुरुच होती. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फटका बसला. जर एकत्र येऊन पुन्हा तीच चूक करायची असेल, तर त्याचा काही अर्थ नाही,” असे ठाकरेंनी (UDDHAV THACKERAY) ठामपणे सांगितले.

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर थेट महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांवर फोडले आहे. या मुलाखतीत त्यांनी मतविभाजन, उमेदवारीतील गोंधळ आणि एकत्रित लढ्याऐवजी झालेले वाद, या गोष्टींचा तीव्र शब्दांत उल्लेख करत स्पष्टपणे सांगितले की, “अशा फॉर्म्युल्यावर पुन्हा लढून काही उपयोग नाही.” याच मुलाखतीत त्यांनी निवडणूक आयोगावरही अविश्वास व्यक्त केला आणि भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

“ईव्हीएममध्ये घोटाळा सुरूच आहे, मतदार यादीतील गोंधळ अजूनही सुटलेला नाही,” असेही ते म्हणाले. ही मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली असून, ती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

“जे तुम्ही लोकसभेला कमावलं, ते विधानसभेला गमावलं, फक्त सहा महिन्यात हे कसं घडलं?” असा थेट आणि धारदार प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना ‘सामना’च्या मुलाखतीदरम्यान विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी स्फोटक आरोप केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ईव्हीएम घोटाळा, मतदार यादीतील गोंधळ, बोगस मतदार, या सगळ्यावर आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

मतदार अचानक कसे वाढले, हे उघड होत आहे.” त्याचबरोबर “लाडकी बहीणसारख्या फसव्या योजना” जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरल्याचे ते म्हणाले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील मतविभाजन, खेचाखेच आणि शेवटच्या दिवसापर्यंत झालेले “तू तू मै मै” यामुळे चुकीचा संदेश गेला. “ही चूक पुन्हा करायची नसेल तर एकत्र येण्याचा काही अर्थ नाही,” असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी (UDDHAV THACKERAY) व्यक्त केलं.

“लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती,” अशी थेट आणि आत्मपरीक्षणात्मक कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली. या चुका पुढे सुधारल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा “ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही,” हे त्यांनी ठणकावून सांगितलं. लोकसभेच्या वेळी सगळ्यांचं लक्ष केवळ जिंकण्यावर होतं.

“आपल्याला जिंकायचे आहे” ही भावना सर्व पक्षांमध्ये होती. मात्र विधानसभेच्या वेळी, “मला जिंकायचं” असा मीपणा निर्माण झाला आणि त्यातून पराभव ओढवला. उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी स्पष्टपणे कबूल केलं की मविआत समन्वयाचा अभाव तर होता, पण त्याहीपुढे “लोकसभेचे यश सगळ्यांच्या डोक्यात गेले होते,” हीच खरी हार मान्य करायला हवी.

आपण केलेली कामे लोकांना सांगण्यात कमी पडलो:

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

विधानसभा निवडणुकीच्या पराभवामागे अनेक कारणे असली तरी उद्धव ठाकरे यांनी मनापासून आत्मपरीक्षण करत काही मुद्दे मांडले. “विधानसभेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडलाच, काही अंशी सत्य असेल, पण प्रत्यक्ष मी बघायला गेलो नाही,” असे ते म्हणाले. मात्र यापेक्षा मोठी चूक त्यांनी स्वतः मान्य केली आहे. “आपण केलेली कामे आपण लोकांना सांगण्यात कमी पडलो.”

“आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शिवभोजन थाळी सुरु केली, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. कायदा-सुव्यवस्था चांगली होती,” याची आठवण त्यांनी करून दिली. करोनासारख्या कठीण प्रसंगी “कटेंगे तो बटेंगे” ही वृत्ती न बाळगता “मी सगळ्यांना समानतेने वागवलं… फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर गेलो… जनतेने मला कुटुंबातलं एक मानलं,” हे त्यांचं म्हणणं विशेष भावनिक आणि ठाम होतं. “यासारखं दुसरं समाधान नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हव्या:

UDDHAV THACKERAY
UDDHAV THACKERAY

महायुतीला पाशवी बहुमत मिळाले, पण ‘जल्लोष कुठे झाला नाही’, हे विशेष लक्षणीय आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत या मुद्द्यावर स्पष्टपणे बोट ठेवले. “अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघायला पाहिजे होता, मात्र तो अवाक् का झाला?” हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “ग्रामीण भागातील अनेक लोक म्हणतात, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केले, तरी आमच्या गावात तुम्हाला इतकी मते कशी मिळाली माहिती नाही,” हे निरीक्षण ते मांडतात. “पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात,” असा आरोप करत त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“ईव्हीएम हँकिंगचा मुद्दा वेगळा, पण लोकशाहीत आरटीआयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर माझी माहितीही मिळाली पाहिजे,” हे त्यांचे विधान विचारप्रवृत्त करणारे आहे. “अमेरिका, युरोपमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते. ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का?” असा प्रश्न करत त्यांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी ठामपणे मांडली.

Leave a comment