अहिल्यानगर ब्रेकिंग ! मेंढपाळांच्या पालावर दरोडा घालणाऱ्या टोळीला अखेर….
अहिल्यानगर ब्रेकिंग : येथील विळद परिसरात रात्रीच्या सुमारास एका टोळीने दहशद पसरवली आहे. त्याच टोळीने त्या परिसरात दोन ठिकाणी हात साफ केला होता. या घटनेस नुकतेच दोन ते तीन दिवस उलटून गेले असता. अहिल्यानगर स्थानिक पोलीस शाखेने त्याचा छडा लावला आहे.....
अहिल्यानगर ब्रेकिंग :
येथील विळद परिसरात रात्रीच्या सुमारास एका टोळीने दहशद पसरवली आहे. त्याच टोळीने त्या परिसरात दोन ठिकाणी हात साफ केला होता. या घटनेस नुकतेच दोन ते तीन दिवस उलटून गेले असता. अहिल्यानगर स्थानिक पोलीस शाखेने त्याचा छडा लावला आहे…..
9 जून रोजी विळद परिसरात रात्रीच्या सुमारास पोपट बन्सी होडगर (वय 35, रा. पिंप्री घुमट, विळद) हे त्यांच्या कुटुंबीयांसह शेतातील पालात झोपले असताना, तेथे 6 ते 7 अज्ञात दरोडेखोर आले. त्यांच्या सोबत लाकडी दांडके व धारदार शस्त्र होते.त्यांनी चाकूचा धाक दाखवला व मारहाण करत चोरी केली. याचा चोरीचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता
त्या नंतर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासा दरम्यान पाच संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि मोटारसायकलींचा समावेश आढळून आला आहे. या तपासात पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे.
पोलिसांनीं गनिमी कावा पद्धतीने केली कारवाईला सुरुवात…..
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम सुरु केली. पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरु ठेवला. रविवारी पांढरीपुल येथे पोलिसांनी सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये भैय्या कडू काळे (वय 18, रा. शिरोडी, ता. गंगापूर), ताराचंद विरूपन भोसले (वय 35, रा. गाजगाव, ता. गंगापूर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय 23, रा. पानसवाडी, ता. नेवासा), नागेश विरूपन भोसले (वय 20, रा. गाजगाव, ता. गंगापूर), सोनुल लक्षरी भोसले (वय 19, रा. बिडकीन, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
अटक केलेल्या संशयित आरोपींकडून 12 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकूण 3 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील बदाम काळे, रघुवीर भोसले व महेश काळे हे तीन संशयित आरोपी अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरु आहे.
तपासादरम्यान संशयित आरोपींची विचारपूस केली असता विळद येथील दरोड्यासह मांजरी (ता. गंगापूर) येथील मेंढपाळाच्या पालावरही दरोडा टाकल्याची त्यांनी कबुली दिली आहे, या संबंधित घटनेबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक घार्गे, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
