crime news: ”कुरिअर बॉय बनून आला, तोंडावर स्प्रे मारून घरात घुसला; २५ वर्षांच्या महिलेवर केला लैंगिक अत्याचार”…पहा सविस्तर
पुणे शहरातील कोंढवा परिसरात बुधवारी रात्री एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोसायटीत एक अशी घटना घडली ज्या घटनेनंतर तिथे राहणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे.त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीवर रात्रीच्या वेळी एका अज्ञात तरुणाने कुरिअर बॉयच्या वेशात येऊन घरात घुसून तिच्यावर अत्याचार (crime) केल्याची माहिती समोर आली आहे.
Pune crime:
पुणे शहरातील कोंढवा परिसरात बुधवारी रात्री एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोसायटीत एक अशी घटना घडली ज्या घटनेनंतर तिथे राहणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे.त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीवर रात्रीच्या वेळी एका अज्ञात तरुणाने कुरिअर बॉयच्या वेशात येऊन घरात घुसून तिच्यावर अत्याचार (crime) केल्याची माहिती समोर आली आहे.रात्री साडेसातच्या सुमारास, तो अज्ञात तरुण हा कुरिअर बॉय असल्याचे त्याने गेट वरती सांगितले.आरोपीने “बँकेचे महत्त्वाचे कुरिअर आहे” असे सांगून पीडितेच्या घराचा दरवाजा उघडून घेतला. दरवाजा उघडताच त्याने तिच्या तोंडावर बेशुद्ध करणारा स्प्रे फवारला आणि गोंधळात तिला अडथळा न होता घरात शिरला. यानंतर त्याने तिच्यावर अमानुष पद्धतीने (crime) जबरदस्ती केली.
ही घटना एवढ्यावरच थांबली नाही, माणुसकीला काळिंबा फसण्याची पराकाष्टा तर तेव्हा झाली जेव्हा आरोपीने हे नीच कृत्य केल्यानंतर पीडित महिलेसोबत सेल्फी काढला! हा प्रकार केवळ एक गुन्हा नसून या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शहरात या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. ज्या महिला किंवा तरुणी ज्या आपल्या घरी एकट्याच राहतात त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
कोंढवा: गार्डेड सोसायटीत अत्याचार (crime); डिलिव्हरीच्या नावाखाली घरात शिरून महिलेला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केल्याची ही घटना आहे.या घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून ओळख दिली. त्याने पीडितेच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावून “कुरिअर आहे” असे सांगितले. तरुणीने “हे कुरिअर माझे नाही” असे सांगून दरवाजा उघडण्यास नकार दिला. मात्र, आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह केला,त्यामुळे तिने सेफ्टी डोअर उघडला.
दरवाजा उघडताच, आरोपीने तिला बेशुद्ध करण्यासाठी तोंडावर केमिकल स्प्रे फवारला. यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अमानुष पद्धतीने अत्याचार (crime) केला.

घटनेनंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली – आरोपीने (crime) पीडितेच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला. शिवाय, “मी पुन्हा येईन” असा मेसेज फोनमध्ये टाईप करून ठेवला आहे त्याच्या या निर्भिडतेच कारण काय असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून, आरोपीच्या ओळखीवरून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेप्रकरणी दोषी असलेल्या त्या गुन्हेगाराचा पोलिसांची १० पथके त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.त्या डिलिव्हरी बॉय च्या वेशात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीला तरुणी घरात एकटी आहे असे माहित होते असा पोलिसांचा अंदाज आहे.
सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह; तपास सुरू, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात:

ही घटना शहरातील एका उच्चभ्रू आणि गार्डेड सोसायटीमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा व्यवस्था असूनसुद्धा आरोपीने अत्यंत सहजपणे सोसायटीत प्रवेश केला, ही बाब गंभीर आहे. त्याने डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून आपली ओळख लपवली आणि कोणतीही कठोर तपासणी न करता सुरक्षारक्षकांनी त्याला आत प्रवेश दिला, असा पोलिसांच्या प्राथमिक तपासाचा निष्कर्ष सांगत आहे.
या घटनेनंतर सोसायटी व्यवस्थापनाची भूमिकाही तपासाअंतर्गत येत आहे. डिलिव्हरीसारख्या बाह्य व्यक्तींची नोंद, त्यांची ओळख पडताळणी याबाबत पुरेशा दक्षता घेतली गेली का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनेनंतर लगेचच घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडितेचे जबाब नोंदवले असून, तिच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यावरून आरोपीचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येईल, असा विश्वास पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नंतर परिसरात भीतीचं वातावरण:
या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिकांना मध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी पोलिसांकडे अधिक कडक बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांच्या मागणीची दाखल घेतली आहे.
“हे फक्त एका महिलेचं नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचं प्रश्न आहे. सादर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
