uddhav thackeray: ठाकरे गटाचा सद्यस्थितीला कोण जबाबदार? अंतर्गत अस्थिरतेचं… पहा सविस्तर..
uddhav thackeray: नाशिकमधील राजकीय नेतृत्वात झालेले बदल पाहत शिवसेना ठाकरे गटाची आताची परिस्तिथी हि नुसती राजकीय घडामोडींमुळे नव्हे तर पक्षातील अंतर्गत मतभेदांमुले हि आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पासून ते सुनील बागुल तसेच मामा राजवाडे या सर्वांचं भाजपकडे कल हे केवळ पक्षांतर नसून विश्वास घात सुद्धा आहे. हा पंधरवडा इतका गाजला कि त्यामध्ये अनेक लोकांचे मतपरिवर्तनहि झाले होते. ढगाला जशी गळती लागते तशी गळती शिवसेना ठाकरे गटाला लागल्याचं दृश्य पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटातून एक एक नेते बाहेर पडत होते. यामुळे ही गळतीची साथ संपेपर्यंत थांबणे योग्य राहील, असा विचार केला. सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी स्थगित झाला असला तरी आज ना उद्या त्यांचा हा प्रवेश होणार असल्याने व आणखीही काही गळणार आहे का? ह्या सगळ्यांचीच तपासणी करणे आता आवश्यक वाटत आहे.
नाशिक । nashik
uddhav thackeray: नाशिकमधील राजकीय नेतृत्वात झालेले बदल पाहत शिवसेना ठाकरे (uddhav thackeray) गटाची आताची परिस्तिथी हि नुसती राजकीय घडामोडींमुळे नव्हे तर पक्षातील अंतर्गत मतभेदांमुले हि आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पासून ते सुनील बागुल तसेच मामा राजवाडे या सर्वांचं भाजपकडे कल हे केवळ पक्षांतर नसून विश्वास घात सुद्धा आहे. हा पंधरवडा इतका गाजला कि त्यामध्ये अनेक लोकांचे मतपरिवर्तनहि झाले होते. ढगाला जशी गळती लागते तशी गळती शिवसेना ठाकरे गटाला लागल्याचं दृश्य पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटातून एक एक नेते बाहेर पडत होते. यामुळे ही गळतीची साथ संपेपर्यंत थांबणे योग्य राहील, असा विचार केला. सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी स्थगित झाला असला तरी आज ना उद्या त्यांचा हा प्रवेश होणार असल्याने व आणखीही काही गळणार आहे का? ह्या सगळ्यांचीच तपासणी करणे आता आवश्यक वाटत आहे.
पाच वर्षांपूर्वीच्या नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जोरदार कामगिरी करत तब्बल ३५ नगरसेवक निवडून आणले होते. या यशानंतर शिवसेना हे नावच महापालिकेत दबदबा निर्माण करत आहे, असं चित्र होतं. त्याच दरम्यान, भाजप व इतर पक्षांतील अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत(uddhav thackeray) प्रवेश करण्यास सुरुवात केली होती.
राजकारणात जे नेते वारंवार पक्षांतर करतात, ते अनेकदा जनमताच्या हवेचा अंदाज घेऊनच दिशा बदलतात, असं बोललं जातं. त्यामुळेच त्या काळात शिवसेनेची सत्ता येणार, असा सूर उमटताच अनेकांचा ओढा तिकडे वाढला आहे. मात्र, निवडणुका झाल्याच नाहीत आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शिवसेना (uddhav thackeray) पक्ष दोन गटांमध्ये विभागला एक ठाकरे (uddhav thackeray) गट आणि दुसरा शिंदे गट. त्यामुळे ज्या पक्षात घुसण्यासाठी गर्दी झाली होती, तोच पक्ष पुढे अस्तित्वाच्या लढाईत सापडला. आज नाशिक महापालिकेतील शिवसेनेचं चित्र पूर्ण बदललं असून, कोणता गट बलाढ्य ठरेल, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत भाग घेतल्यापासून, सत्तेच्या जवळ राहण्याची लालसा असलेली मंडळी त्यांच्याकडे लोहचुंबकासारखी खेचली जात आहेत. याचेच फळ म्हणजे, शिवसेनेचे ३५ नगरसेवकांपैकी तब्बल २६ जण शिंदे गटात सामील झाले, तर चारजण थेट भाजपमध्ये दाखल झाले. ठाकरे गटाच्या हातात आता केवळ पाच नगरसेवकांची मोजकी साथ उरली आहे.
यातील एक, सुधाकर बडगुजर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि लगेचच त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली. याच दिवशी विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह समारंभाला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहिले. विलास शिंदे यांनीही आपली नाराजी जाहीर केली. मात्र त्यांना ‘मातोश्री’ वर नेऊन, पत्रकार परिषदेत पक्षात असल्याचं सांगायला लावण्यात आलं.
तरी दोनच दिवसांत त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये जाहीर स्वागत करत पक्षशिस्तेच्या सीमाच ओलांडल्या. तरीही ठाकरे गटाने कोणतीही ठोस कारवाई न करता, दुर्लक्ष केल्याचं चित्र समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातून बाहेर पडल्यावर मामा राजवाडे यांची नाशिक महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नेमणूकही अत्यंत गडबडीने झाली आणि चार दिवसांतच राजवाडे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होता, मात्र काही गुन्हेगारी प्रकरणांमुळे तो सध्या लांबवणीवर गेला आहे. त्यांच्या सोबत गेलेले माजी नगरसेवक प्रशांत दिवे, समीर मराठे आणि सीमा-कन्नू ताजणे या जोडप्याने मात्र अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे, प्रशांत दिवे यांनी भाजप प्रवेशाच्या आदल्याच दिवशी शिवसेनेप्रती(uddhav thackeray) निष्ठा असल्याचे जाहीर केले होते. तर ताजणे दाम्पत्याने दोन दिवस आधीच डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांसमवेत सहभाग नोंदवला होता. अचानक त्यांनी पक्षांतर का केले, हे एक कोडेच ठरले आहे. यापूर्वीही ताजणे दाम्पत्य भाजप, शिवसेना आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करत आले आहे. दिवे कुटुंबाचीही हीच पार्श्वभूमी असून, त्यांचा पक्षांतराचा इतिहास दीर्घ आहे. त्यामुळे या हालचालींना फारसा धक्का वाटलेला नाही.
शहरासोबतच ग्रामीण भागातही ठाकरे(uddhav thackeray) गटाची परिस्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. तालुकास्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच माजी आमदार यांनी पक्षाला सोडल्या कारणाने, अनेक ठिकाणी निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार मिळवणे ही एक मोठी अडचण ठरणार आहे.
तरीदेखील शिवसेनेचे(uddhav thackeray) काही नेते आजही “भगवा फडकणारच” या घोषणांतून राणा भीमदेवी थाटाचा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. मात्र, वास्तव पाहता हे विधाने वास्तवाच्या किती दुरावस्थेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
सध्या शहर व जिल्ह्यात केवळ उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते आणि माजी महापौर विनायक पांडे हेच काहीसे ठाम नेतृत्व शिल्लक राहिले आहे. गिते व पांडे यांचा काहीकाळ इतर पक्षांत प्रवास झालेला आहे. राजवाडे यांनी अचानक पक्षत्याग केल्यानंतर, प्रथमेश गिते यांची महानगरप्रमुखपदी घाईघाईने नियुक्ती करण्यात आली. अनुभव, कार्यक्षमता याकडे दुर्लक्ष करत ‘नगाला नग उभा’ करण्याच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अशा नेमणुकांमुळे शिवसेना नेतृत्व दिशाहीन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या एक वर्षात, विशेषतः एकनाथ शिंदे यांनी पक्षत्याग केल्यानंतर, शिवसेनेत सुरू झालेली गळती अद्यापही थांबलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे, ही गळती रोखण्यासाठी पक्षाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचं दिसून आलेलं नाही. उलट, काही व्यक्तींनी पक्ष सोडणं अपरिहार्य आहे, अशा पद्धतीची भूमिका पक्षानेच स्वीकारल्याचं संकेत मिळतात. अनेक नेत्यांच्या पक्षांतराबाबत स्थानिक पातळीवर अगदी सर्वसामान्य जनतेलाही पूर्वकल्पना होती, मात्र पक्ष नेतृत्वाला याची जाणिवच नसावी, असे चित्र दिसले.
उदाहरणार्थ, सुधाकर बडगुजर व विलास शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा दीर्घकाळापासून सुरू होत्या. यावर पक्षाने केवळ उशिरा व अल्प परिणामकारक निर्णय घेतले. बडगुजर यांचे पद बदलण्यात आले, तर शिंदे यांना अपेक्षित पद देण्यात आले नाही,त्या निर्णयांमागची प्रक्रिया किंवा भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.
या साऱ्या पार्श्वभूमीवर, पक्षातील अंतर्गत प्रश्न विचारण्याचीही परवानगी नसल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्ष चालविण्याच्या प्रक्रियेत एकतर्फी निर्णय व ‘संजय राऊत(uddhav thackeray) नामक सर्वज्ञ शक्ती’वर संपूर्ण विसंबून राहणं, यामुळे पक्षाची अवस्था ‘चालला’ नव्हे तर ‘रसातळाला चालला’ अशीच झाली आहे.
विलास शिंदे पक्ष सोडणार, हे तर अगदी काळ्या दगडावरची रेघ होती. तरीही पक्षाने त्यांना सतत चुचकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जर ते पक्षासाठी खरोखरच आवश्यक होते, तर त्यांना अपेक्षित पद देऊन त्यांचं मन जिंकता आलं असतं. पण पक्षानं तो विचारही केला नाही. दुसरीकडे, सुनील बागुल त्यांच्या पूर्ण मंडळीसह बाहेर पडणार, याची खबर तर संपूर्ण गावाला होती. बागुल महाजनांना कधी भेटले, एकनाथ शिंदे यांनी त्यांना काय सांगितलं? या सगळ्या गोष्टी चर्चांमधून सामान्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. फक्त ठाकरे गटातील नेत्यांनाच त्या कळल्या नाहीत, ही बाब अचंबित करणारी आहे.
शिंदे गटातून राजवाडे यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करताना कोणतीही दूरदृष्टी दिसून आली नाही. बागुल यांच्या व्यावसायिक संबंधांव्यतिरिक्त राजवाडे यांचे कोणते कर्तृत्व आहे, हे स्थानिकांनाही समजलं नाही. आजही ‘दाढी आहे म्हणजे कट्टर शिवसैनिक’ अशी संकल्पना काही ठिकाणी जिवंत आहे, पण आता त्या जुनाट चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
जमाना बदलला आहे, शैली बदलल्या आहेत, पण काही नेते अजूनही त्या जुन्या गोडव्या भ्रमातच वावरतात. आजकाल प्रत्येक लग्नात एखादा नगरसेवक दाढी वाढवून फिरतो म्हणजे त्याला शिवसेना विचारांचा मानायचं? हा निष्कारण समज म्हणजे निव्वळ बावळटपणा नाहीतर काय!
संजय राऊत(uddhav thackeray) यांच्याकडे नाशिकमधील शिवसेनेची जबाबदारी फार पूर्वीपासूनच सोपवण्यात आली होती. वेळोवेळी तक्रारी, नाराजी आणि सूचनांचा पाऊस झाला तरी त्यांच्या जबाबदारीत फारसा फरक पडला नाही. विशेष म्हणजे, पक्षात फूट पडल्यावर राऊत(uddhav thackeray) केवळ नाशिकपुरतेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुखांनंतरचा सर्वाधिक प्रभावशाली नेता म्हणून समोर आले.
आधीच त्यांचा बोलबाला होता, पण नंतर तर त्यांच्या उपस्थितीला एकप्रकारची छुपी दहशतीची छाया लाभली. ‘राऊत म्हणतील ती पूर्व दिशा’ हेच जणू शिवसेनेचे एकमेव धोरण बनले. याच तत्त्वाच्या सावटाखाली त्यांचे कट्टर समर्थक सुधाकर बडगुजर यांनाही एक दिवस बाहेरचा रस्ता धरावा लागला.

खरं तर, राऊत यांच्यामुळेच बडगुजर यांचे पक्षात अनेक वर्षे फावले होते, हे जरी खरे असले, तरी शेवटी त्याच राऊतांच्या अति प्रभावामुळेच त्यांना पक्ष सोडावा लागला, ही व्यंगात्मक स्थिती होती. हीच कहाणी भाऊ चौधरी यांचीही. दोघेही केवळ समर्थक नव्हते, तर ‘राऊत यांचे जीव की प्राण’ होते. पण इतका निकटचा संबंध असतानाही, राऊतांच्या एकाधिकारशाहीच्या हवेमुळे त्यांनाही दरवाजा दाखवण्यात आला, हे सत्यही नजरेआड करता येत नाही.
पण अखेर या दोघांनीही संजय राऊत यांची साथ सोडली. त्यांच्यामुळेच अनेकांनी शिंदे गटाचा रस्ता जवळ केला. आज या सगळ्या मंडळींचं एकत्रीकरण शिंदे गटात झालं असून, प्रत्येक जण तिथं आपापली कहाणी आळवत आहे. कोणाला अन्याय झाल्याचं दु:ख, कोणाला संधी न मिळाल्याची खंत, पण सत्य एकच ते सत्ताधारी गटात आहेत, म्हणून काहीही असो, सगळं गपगुमान सहन करावं लागतं.
विलास शिंदे हे मुळात शिवसेनेतील(uddhav thackeray) एक सामान्य कार्यकर्ता होते. दशरथ पाटील यांच्या राजकीय पडझडीनंतर, अचानक शिंदेंना पुढे आणण्यात आलं. पक्षाने त्यांच्यावर इतकी कृपादृष्टी केली की पदांची अक्षरशः खैरातच झाली. त्यांनी विविध पदांवर काम केलं, त्यांच्या नावापुढे ‘नेतृत्व’ जोडलं गेलं, आणि आज जे काही त्यांचं “महत्त्व” दिसतं, ते फक्त आणि फक्त पक्षाच्या पाठबळामुळेच शक्य झालं. मात्र, हेच शिंदे जेव्हा “अन्याय झाला म्हणून आम्ही निघून गेलो” अशी कारणं सांगतात, तेव्हा त्यांच्या या दांभिक भूमिकेचं खंडन करण्याची हिंमत ठाकरे गटात कोणी दाखवत नाही, हेच सर्वात मोठं दु:ख आहे.
पक्षानं ज्याला जमीन दाखवली, त्याचं पायघोळ झालं आणि तेच नंतर पक्षाच्या नावाने बोटं मोडू लागले, ही विडंबनात्मक स्थिती आहे. त्यांच्या या कथित ‘अन्यायाची’ कहाणी ऐकून जी सहानुभूती मिळते, ती खरी नव्हे, हे ठामपणे सांगणारा आवाज पक्षातच कुठे गहाळ झाला, हा प्रश्न आता सर्वांनाच घाबरावतोय.
