Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

krushi update : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ४० कोटी ८३ लाखांची भरपाई. पहा सविस्तर…..

krushi update : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ४० कोटी ८३ लाखांची भरपाई. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील एप्रिल व मे महिन्यात अतिवृष्टी, अचानक चालू झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे अधिक प्रमाणावर नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्या साठी शासनाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटी ८३ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

krushi update :

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ४० कोटी ८३ लाखांची भरपाई. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील एप्रिल व मे महिन्यात अतिवृष्टी, अचानक चालू झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे अधिक प्रमाणावर नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्या साठी शासनाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटी ८३ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडण्यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एकाच वेळी मदत करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात एप्रिल २०२५ आणि मे २०२५ या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि अतिरिक्त

krushi update
krushi update

पावसामुळे शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जवळपास ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. त्यापोटी शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जवळपास ४० कोटी ८३ लाख रुपयांची आर्थिक मदत आता मंजूर करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांच्या २२ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान

 

सोलापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ३२१ शेतकऱ्यांच्या २०७.७५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना ४४ लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. तर मे महिन्यात जिल्ह्यातील ३२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या २१ हजार ९८९.१२ हेक्टर शेती आणि फळबागांचे नुकसान झाले होते. त्यांना जवळपास ४० कोटी ४३ लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. लवकरच ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Leave a comment