Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

पिक विमा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता पैसे!

पिक विमा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता पैसे! सरकारने घेतला आहे मोठा निर्णय पिक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिगर खाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सरकारने मंजूर केले 1028 कोटी

पिक विमा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता पैसे! सरकारने घेतला आहे मोठा निर्णय पिक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिगर खाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सरकारने मंजूर केले 1028 कोटी.

 

पिक विमा :-पिक विमा बाबतीत जर बघितले तर गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पिक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता उघड झाला आहे. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचा किस्सा चा विमा हप्ता 1028 कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिगर खाली शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार असून आतापर्यंत जर आपण पाहिले तर खरीप हंगाम 2024 करिता राज्य हिस्सा विमा हप्ता 2083 कोटी 20 लाख इतका निधी देण्यात आला असून त्यामध्ये 1028 कोटी रुपयांचा विमा हप्ता राज्य सरकारकडे अजून पर्यंत प्रलंबित राहिला होता व हा आता वितरित करण्यास आता राज्य सरकारने मंजुरी दिली असून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पिक विमा
पिक विमा

विमा कंपन्यांना दिले जाणार इतके कोटी ?

यामध्ये आपण पाहिले तर खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 हंगामामधील जमा झालेली परतावा रक्कम 132 कोटी 90 लाख आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यास व उरलेली 896 कोटीची रक्कम सन 2025-26 मधील अर्थसंकल्पीय तरतुदी मधून संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे.

खरीप हंगाम 2023 व रब्बी हंगाम 2025-26 हंगामा यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एस बी.आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा नऊ कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे व यांच्यामार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी ही महाराष्ट्रामध्ये या विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे.

पिक विमा
पिक विमा

खरीप हंगाम 2024 साठी मंजूर झालेली भरपाई किती ?

यामध्ये जर बघितले तर खरीप हंगाम 2024 करिता एकूण 3907.43 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पोटी 3561.8 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत व प्रलंबित नुकसान भरपाई 346.36 कोटी इतकी आहे. त्यातच आता राज्य शासनाने राज्य विमा हप्ता रुपये 1028 कोटी रुपये मंजूर केल्यामुळे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम 379 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विमा पोर्टल द्वारे लवकर जमा होणार आहेत.

 

Leave a comment