AHILYANAGAR HEAVY RAIN: अहिल्यानगरमध्ये पावसाचा कहर! १३७ जनावरे मृत्युमुखी, १५३ घरांची पडझड! पुढील इशारा अधिक भयंकर…
अतिवृष्टीचा तडाखा! पारनेरपासून पाथर्डीपर्यंत विजांच्या प्रहाराने व पुराच्या लाटेने शेतकऱ्यांची उध्वस्त स्वप्ने; शेकडो जनावरे वाहून, घरांची पडझड… जिल्ह्यात हाहाकार, प्रशासनासमोर मदतीचे आव्हान वाढले!
AHILYANAGAR HEAVY RAIN: जिल्ह्यात रविवारी रात्री ते सोमवार दुपारपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः कहर माजवला आहे. ढगफुटीसारख्या मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा खंडीत, रस्ते वाहून गेले आणि अनेक गावांमध्ये हाहाकार माजला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार राहाता आणि कोपरगाव तालुका वगळता उर्वरित तब्बल 12 तालुक्यांमध्ये पशूहानी, घरांची पडझड आणि मनुष्यहानी झाली आहे. (AHILYANAGAR HEAVY RAIN) विशेषतः पाथर्डी तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून येथे 2 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच तालुक्यात 34 मोठी जनावरे आणि तब्बल 93 लहान जनावरे वेगवेगळ्या कारणांनी मृत्यूमुखी पडली, तर 43 घरांची पूर्ण पडझड झाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात उघड झाले की, या अतिवृष्टीत एकूण 4 जणांचा बळी गेला असून 137 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. (AHILYANAGAR HEAVY RAIN) त्यात वीज कोसळून 3 जनावरे दगावली, पुराच्या पाण्यात वाहून 97 जनावरे, तर घराच्या भिंती अथवा छपराखाली दबून 6 जनावरे मृत झाली. शिवाय विविध तालुक्यात 153 घरांचे नुकसान झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून गावोगाव भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने मदत आणि पुनर्वसनासाठी हालचाली सुरू केल्या असल्या, तरी गावकऱ्यांची अस्वस्थता कायम आहे. (AHILYANAGAR HEAVY RAIN) रातोरात निसर्गाने घडवलेल्या या आपत्तीतून जिल्हा सावरायला किती वेळ लागेल, हा मोठा प्रश्न आहे.

जिल्ह्यात दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून नुकसानीची भीषण आकडेवारी आता समोर येत आहे. नगर तालुक्यात एकाचा मृत्यू तर 1 घराची पडझड झाली. अकोले तालुक्यातही 1 घर कोसळले. जामखेडमध्ये तब्बल 6 घरांचे अवशेष झाले, तर कर्जत तालुक्यात 17 घरांची पडझड नोंदवली गेली. नेवासा तालुक्यात 4 लहान जनावरे दगावली असून 26 घरांचे मोठे नुकसान झाले.
पारनेरमध्ये 1 मोठे आणि 1 लहान जनावर मृत्यूमुखी पडले तसेच 3 घरे जमीनदोस्त झाली. राहुरीत 11 घरे, संगमनेरमध्ये 1 मोठे व 1 लहान जनावरांसह 2 घरे, तर शेवगावमध्ये 1 व्यक्तीचा मृत्यू, 6 लहान जनावरे आणि तब्बल 38 घरांची पडझड झाली. श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अनुक्रमे 2 आणि 3 घरांचे नुकसान झाले.
या दोन दिवसांत जिल्ह्याने 4 जिवांचा बळी, 36 मोठी जनावरे, 101 लहान जनावरे गमावली आहेत, तर एकूण 153 घरे कोसळली आहेत. पावसाच्या या विध्वंसक तडाख्याने शेतकरी, ग्रामीण भागातील कुटुंबे आणि संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. (AHILYANAGAR HEAVY RAIN) मदतीसाठी तातडीने उपाययोजना सुरू असल्या तरी निसर्गाचा हा कहर सावरण्यासाठी मोठी झुंज द्यावी लागणार आहे.
असे आहे जनावरांची हानी:

जिल्ह्यातील मुसळधार पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने जनावरांवर प्रचंड कहर ओढवला आहे. पारनेर तालुक्यात 1 गाय आणि 1 शेळी वीज पडून ठार झाली. पाथर्डीमध्ये पुराच्या पाण्याच्या तडाख्यात तब्बल 34 गायी, 30 करडे आणि 63 शेळ्या वाहून गेल्या. संगमनेरमध्येही 1 गाय विजेच्या झटक्याने मृत्यूमुखी, तर शेवगावात 4 शेळ्या आणि 2 बोकड घराचा भाग कोसळून मृत्यूमुखी पडले. (AHILYANAGAR HEAVY RAIN) निसर्गाच्या या हल्ल्याने शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
