Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR NEWS: पावसाचा प्रचंड कहर! धो-धो पावसामुळे शाळा उघडायच्या की बंद ठेवायच्या? हा निर्णय आता गावागावच्या हातात…

मुसळधार पावसाचा कहर वाढताच जिल्हा प्रशासन सतर्क! स्थानिक परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शालेय व्यवस्थापन समित्यांना शाळा बंद करण्याचा अधिकार, तर शिक्षक-कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या सेवेत हजेरी अनिवार्य अशी कठोर आदेशाची जाहीर वज्रपात!

AHILYANAGAR NEWS: जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. (AHILYANAGAR NEWS) भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनातही हाहाकार माजला आहे. आधीच १९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांत पूरस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून रस्ते वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे.

या भीषण पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कार्यरत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे आदेश निर्गमित झाले आहेत. (AHILYANAGAR NEWS) शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असला, तरी परिस्थितीची गांभीर्य पाहता हा अधिकार आता थेट ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे.

AHILYANAGAR NEWS
AHILYANAGAR NEWS

हा निर्णय म्हणजे केवळ प्रशासकीय आदेश नाही, तर लोकांच्या सुरक्षेला दिलेले प्राधान्य आहे. गावागावांतील शालेय समित्यांना प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ शाळा बंद करण्याची मोकळीक मिळाल्याने विद्यार्थ्यांचे व पालकांचे जीव वाचवण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. वाढत्या पावसाचा कहर आणि हवामान विभागाचा सततचा इशारा यामुळे हा निर्णय किती आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे. (AHILYANAGAR NEWS) आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ग्रामस्तरावरील समित्यांच्या तातडीच्या हालचालींवर खिळले आहे पाऊस किती थैमान घालतो आणि गावोगावी कशी धडाकेबाज पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यावर पावसाचे भीषण सावट दाटले आहे! आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून, शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. सध्या परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की १९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील काही गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. (AHILYANAGAR NEWS) वाढत्या पावसाने रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत आणि जनजीवन ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देत सतर्कतेचा इशारा वाजवला आहे. नागरिकांनी सावध राहून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असा जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा आहे.

AHILYANAGAR NEWS
AHILYANAGAR NEWS

जिल्ह्यात वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समित्यांना मोठा अधिकार देण्यात आला आहे. १५ व १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आवश्यकता भासल्यास शाळा बंद ठेवायचा अंतिम निर्णय आता समिती स्वतः घेऊ शकेल, असा प्रशासनाचा स्पष्ट आदेश आहे. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह तातडीची बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. (AHILYANAGAR NEWS) मात्र शाळा सुट्टीत असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहील. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवणे ही त्यांची जबाबदारी ठरणार आहे. प्रशासनाचा हा आदेश पावसाच्या कहरातही सजगतेचा इशारा देणारा आहे.

 

Leave a comment