AJIT PAWAR: ‘चुका खपवून घेणार नाही’! “राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात,तसेच वागा,दौंडमध्ये अजित पवारांचा संतापाचा स्फोट.
AJIT PAWAR: राज्याच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची पत कमी होत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
पुणे | Pune
AJIT PAWAR: राज्याच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची पत कमी होत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (AJIT PAWAR) यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. दौंड येथे झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कार्यक्रमात अजित पवारांनी (AJIT PAWAR) कार्यकर्त्यांवर शब्दांचा बाण सोडत चांगलाच समाचार घेतला. “राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात, चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. बदनामी होते!” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना फटकारलं.

हे वक्तव्य त्यांनी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत केलं, जेव्हा त्यांच्या भावाने चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याच्या प्रकरणामुळे वातावरण तापलं होतं. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा सणसणीत इशारा आला असून, त्यांनी स्पष्ट केलं की पक्षाचे पदाधिकारी कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही. ‘चूक झाली तर जबाबदारी घेऊन परिणाम भोगावा लागेल,’ असा संदेश देत त्यांनी पक्षातील शिस्त आणि मर्यादेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या या घणाघाती भाषणामुळे आता राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचालींना वेग येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
दौंड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या भाषणातील रोखठोक शब्दांनी उपस्थित नेत्यांचे कान टोचले गेले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “चौफुल्याला तरफडू नका, बदनामी होते.” हा इशारा केवळ सामान्य सूचना नव्हती, तर पक्षातील वाढत्या शिस्तभंगाच्या घटना लक्षात घेता दिलेला ठाम संदेश होता.
विशेष म्हणजे, यावेळी आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. त्यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. अशा पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे वक्तव्य केवळ अंतर्गत शिस्तबद्धतेचा आग्रह नव्हता, तर एकप्रकारे संबंधितांना थेट इशाराच होता.

“राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात, चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पक्षातील अनुशासनाची आणि जबाबदारीची आठवण करून दिली. या प्रकरणामुळे पक्षात अंतर्गत हालचालींना उधाण येण्याची शक्यता आहे.
काही चूक होऊ देऊ नका:
दौंड येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांनी आपल्या खणखणीत शैलीत कार्यकर्त्यांची कानउघडणी करत स्पष्ट इशारा दिला. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडे कधी, कुठे, काही चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन ठौय ठौय दटशश करू नका.” त्यांच्या या थेट आणि सडेतोड इशाऱ्याने वातावरणात क्षणात गांभीर्य निर्माण झाले.
या कठोर इशाऱ्याचे विशेष महत्त्व म्हणजे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी दिली. कारण याच मांडेकर यांच्या भावाने चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याच्या प्रकरणामुळे खळबळ माजली होती. त्यामुळे अजितदादांचे (AJIT PAWAR)हे वक्तव्य नेमके कुठे झळत होते, हे उपस्थित प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवले. आता या इशाऱ्यांमुळे पक्षातील काहींना धडकी भरली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही!
माझा प्रत्येक शब्द न शब्द शूटिंग चालू आहे:
दौंड येथील कार्यक्रमात भाषण करताना अजित पवारांनी (AJIT PAWAR) फक्त इतरांना इशारा दिला नाही, तर स्वतःच्याही भूमिकेचे भान ठेवत महत्त्वाचे वक्तव्य केले. “मी आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी नीट वागले आणि बोलले पाहिजे. माझा प्रत्येक शब्द न शब्द शूटिंग चालूये,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आता जरा जरी काही चूक बोललो, तरी लगेच व्हिडीओ व्हायरल होतो, आणि लोक “बघा काय बोलला?” असे म्हणायला लागतात.
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी म्हणता यायचे ‘मी असे बोललो नाही,’ कारण काही पुरावा नसायचा. तो काळ गेला ३५ वर्षांपूर्वीचा.” पण आता परिस्थिती बदलली आहे. “ते एकदा नाही, तेच तेच तेच… लोकं म्हणतात लका कितीदा बोलले हे, आणि काय सांगतो बोलला नाही. असे टेक्निक चालू आहे,” असा टोला त्यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर लगावला. शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितले, “त्यामुळे तारतम्य ठेवून बोला.” हे वक्तव्य सध्याच्या सोशल मीडिया युगात राजकारण्यांनी काय बोलावे यावर सजग राहण्याचा इशाराच देणारे ठरले.

चौफुला येथे झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे भोरचे आमदार शंकर मांडेकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शंकर मांडेकर यांच्या भावावरती चौफुला येथे गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना, आज कार्यक्रमात भाषण करताना अजित पवारांनी (AJIT PAWAR) कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत शिस्तीचे आणि जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले आहे.
याच भाषणात अजित पवारांनी (AJIT PAWAR) वैष्णवी हगवणे प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “काही जणांनी कशाप्रकारे आपल्या सुनांना त्रास दिला? आम्ही लग्नात गेलो हा आमचा दोष का? आम्ही त्यांना सुनेला त्रास द्यायला सांगितले का?” या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप करणाऱ्यांनाच सवाल केला आहे.
अजित पवारांनी शंकर मांडेकर यांच्या भावाने केलेला गोळीबार प्रकरणावर आणि वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य करत, एकाच वेळी दोन संवेदनशील मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आणि कार्यकर्त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

दौंड येथील कार्यक्रमात अजित पवारांनी (AJIT PAWAR) त्यांच्या ठसक्याच्या शैलीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत समज दिली. “मघाशी चंद्रकांत पण कोणावर तरी खेकसला. अरे चंद्रकांत तू माझ्यावर जाऊ नकोस. मला लोकांनी मान्य केले आहे. लोकं म्हणतात हा बोलला म्हणजे काम होणार. नक्की आता आपले काम होणार. अशी माझ्या बद्दल लोकांना विश्वास होणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा आणि जबाबदारीचा उल्लेख केला आहे.
ते पुढे म्हणाले, “तरी देखील मी आता जबाबदारी वाढल्यापासून चांगले बोलायचा प्रयत्न करतो. आता बघा सगळ्यांना फोटो काढू दिले. शेवटी मला तुमची आणि तुम्हाला माझी गरज आहे. आपण एक परिवार झालोय. एकमेकांचा दुस्वास करायला एकत्र आलेलो नाही.” या शब्दांमधून त्यांनी पक्षातील एकजूट टिकवण्याचा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार (AJIT PAWAR) यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची कान उघडणी केली असली तरी त्यामागे पक्ष मजबूत करण्याचा स्पष्ट हेतू होता.
