Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

BHANDARDARA RAIN : भंडारदरामध्ये पावसाचे धुमाकूळ सुरूच; पाणी आणखी वाढले…..

BHANDARDARA RAIN : भंडारदरामध्ये पावसाचे धुमाकूळ सुरूच; पाणी आणखी वाढले. अहिल्यानगर येथील भंडारदरा धरणात पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठा हा वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती धरण शाखेकडून दिली गेली आहे.

BHANDARDARA RAIN :

भंडारदरामध्ये पावसाचे धुमाकूळ सुरूच; पाणी आणखी वाढले. अहिल्यानगर येथील भंडारदरा धरणात पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठा हा वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती धरण शाखेकडून दिली गेली आहे.

६ मे पासून भंडारदरा पाणलोटात सुरू झालेला पाऊस थांवण्याचे नाव घेत नसून शनिवारी व रविवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले. प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत असतानाही भंडारदऱ्याला शनिवारी व रविवारी प्रचंड प्रमाणात त पर्यटक दिसून आले,

BHANDARDARA RAIN
BHANDARDARA RAIN

भंडारदन्याची वाहतूक कोंडी मात्र कायम राहिली असून पर्यटकांकडून या वाहतूक कोंडी बद्दल नाराजी व्यक्त होत आहे. भंडारदऱ्याच्या अभयारण्यात असलेले घवघरे मात्र धोक्याच्या पातळीवरून वाहताना दिसून आले. तरीसुद्धा या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांकडून गर्दी होत आहे,

सर्वात जास्त पाऊस रतनवाडी येथे पडत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत रतनवाडीला एकूण ३२४७ मि. मी. पाऊस पडला असून रविवारी याठिकाणी १७९ मि. मी. पाऊस कोसळला. घाटघर येथेही पावसाचे तांडव सुरू असून गत २४ तासांमध्ये घाटपरला १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू असल्याने मात्र भात पिकांची पुन्हा एकदा वाताहात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणातून शनिवारी संध्याकाळी चार हजार क्युसेसने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते.

BHANDARDARA RAIN
BHANDARDARA RAIN

किती झाला पाणी साठा

काल पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरणातून आणखी विसर्ग वाढविण्यात आला असून सांडव्यामधून ८४९४ क्युरोस व धरणाच्या वीज निर्माण केंद्रातून ८३५ क्यूसेस असा एकूण ९३२९ क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे निळवंडे धरणामधूनही पाण्याचा विसर्ग वाढला गेला असून १४३६८ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. प्रवरा नदीने लाभक्षेत्रात रौद्ररूप धारण केले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे. निळवंडे धरणही ८९.४७% भरले असून पाणीसाठा ७४५१ दलघफुटावर पोहोचला आहे.

गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ८२ मि. मी., घाटघर १५५ मि. मी., रतनवाडी १७९ मि. मी., पांजरे ७८ मि.मी. तर वाकी येथे ७८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून भंडारदरा
धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून आणखी विसर्ग वाढविला जाऊ शकतो, असे धरण शाखेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a comment