Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Maharashtra RAIN UPDATE : हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 जुलै 2025 रोजी या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस…..

Maharashtra RAIN UPDATE :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 जुलै 2025 रोजी या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस. आज 17 जुलै 2025 वार गुरुवार असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार बघितले तर विदर्भ आणि मराठवाड्यात आज काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरिंची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात विदर्भसारख्या पट्ट्यात मात्र उकाडा जाणवायला लागला असून बऱ्याच ठिकाणी पारा 35 अंश डिग्री सेल्सिअसच्या पार गेला आहे. काही ठिकाणी पाऊस आजून कमीच आहे.

Maharashtra RAIN UPDATE

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 जुलै 2025 रोजी या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस. आज 17 जुलै 2025 वार गुरुवार असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार बघितले तर विदर्भ आणि मराठवाड्यात आज काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरिंची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात विदर्भसारख्या पट्ट्यात मात्र उकाडा जाणवायला लागला असून बऱ्याच ठिकाणी पारा 35 अंश डिग्री सेल्सिअसच्या पार गेला आहे. काही ठिकाणी पाऊस आजून कमीच आहे.

सध्या देशात बिहार आणि उत्तर प्रदेश आणि काही परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याचे दिसून येत असून या क्षेत्रा सोबतच वायव्य राजस्थान आणि परिसरावर आणखी एक ठळक कमी दाबाचे सत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून मान्सूनचा आस असलेला महत्त्वाचा असा कमी दाबाचा पट्टा राजस्थान राज्यातील कमी दाबाचे क्षेत्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सध्या सक्रिय आहे.

 Maharashtra RAIN UPDATE
Maharashtra RAIN UPDATE

काल राज्यात कुठे किती पडला पाऊस?

काल 16 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील घाटमाथा परिसर आणि कोकण या भागात मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे देखील दिसून आले. यामध्ये ताम्हिणी आणि रोहा या दोन्ही ठिकाणी उच्चांकी 210 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच विदर्भ सारख्या पट्ट्यात कमाल तापमान वाढल्याचे दिसून आले व ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

आज कुठे होणार पावसाचे आगमन?

महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु आज 17 जुलै 2025 वार गुरुवार रोजी मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि त्यासोबतच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता हवामाना विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे.

 

Leave a comment