Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Cotton : शेतकऱ्यांची पुन्हा वाढणार डोकेदुखी कापसाचा साठा शिल्लक, काय होतील परिणाम…..

Cotton News: शेतकऱ्यांची पुन्हा वाढणार डोकेदुखी कापसाचा साठा शिल्लक आहे अशी माहिती मिळाली आहे. या शिल्लक असणाऱ्या कापसाच्या साठ्याने काय होणार परिणाम? या बातमीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातारण दिसून येत आहे. तसेच या शिल्लक असणाऱ्या कापसाच्या साठ्याने कापसाच्या दर काय होतील परिणाम पहा सविस्तर.

Cotton News :

शेतकऱ्यांची पुन्हा वाढणार डोकेदुखी कापसाचा साठा शिल्लक आहे अशी माहिती मिळाली आहे. या शिल्लक असणाऱ्या कापसाच्या साठ्याने काय होणार परिणाम? या बातमीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातारण दिसून येत आहे. तसेच या शिल्लक असणाऱ्या कापसाच्या साठ्याने कापसाच्या दर काय होतील परिणाम पहा सविस्तर.

भारतातील खरीप हंगामातील प्रमुख पिक जर म्हटले तर सर्वात आधी कापूस असून महाराष्ट्रामध्ये देखील खरीप हंगामात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. परंतु आपण मागच्या वर्षापासून जर पहिले तर कापसाच्या दराने शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग केला.पण आता या हंगामात तरी कापसाचे दर कसे काय राहतील याची चिंता शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच लागलेली असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी हंगाम सुरू होण्याच्या आधीच कापसाचा शिल्लक साठा किती आहे याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली असून या माहितीमुळे नक्कीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Cotton
Cotton

कापसाचा शिल्लक साठा किती आहे?

महत्वाचे म्हणजे सीसीआयने कापसाची जी काही खरेदी केलेली आहे तो कापूस सध्या सीसीआय विकत आहे. सध्या सीसीआय कडे 60 लाख गाठींचा कापूस शिल्लक असून या कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री सुरू आहे व त्यामुळे पुढील काळात देखील कापूस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असण्याची शक्यता असल्यामुळे कापसाच्या दरावर दबाव येऊ शकतो अशी शक्यता जाणकारांनी कडून सांगण्यात आली आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या कापसाच्या चालू हंगामात म्हणजेच 2024-25 च्या हंगामात कापसाचा अंतिम साठा 55.59 लाख गाठी राहण्याचा अंदाज असणार आहे. विशेष बाब म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल 84 टक्के अधिक असणार आहे. हा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला असून नवीन कापूस हंगाम सुरू होत असतानाच मागील वर्षाचा कापसाचा शिल्लक साठा जास्त असल्यामुळे कापसाची उपलब्धता वाढणार आहे. कापसाची आवक वाढल्यामुळे यावर्षीच्या हंगामामध्ये कापूस प्रेसिंगचा अंदाज 311.40 लाख गाठी राहिला असं यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Cotton
Cotton

या अगोदरचा अंदाज 301.14 लाख गाठींचा होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पाच लाख गाठींची वाढ यामध्ये नोंदवण्यात आली असून गुजरात आणि तेलंगणात अगोदरच्या अंदाजापेक्षा प्रत्येकी दीड लाख गाठींची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तसेच सीएआयने 2024-25 हंगामासाठी कापसाचा वापर तीन लाख गाठींनी वाढून आठ लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे व कापसाच्या आयात 39 लाख गाठी राहिल असा अंदाज कायम ठेवला आहे. तसेच 17 लाख गाठी कापूस निर्यातीचा आधी वर्तवलेला अंदाज देखील कायम ठेवण्यात आला आहे.

त्यामध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत निर्यातीत 11.36 लाख गाठींची घट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र जाणकारांच्या मते देशांतर्गत कापसाची उपलब्धता वाढण्याचा अंदाज असल्यामुळे आणि इतकेच नाही तर कापूस दरातील नरमाईमुळे देशात पुढील हंगामात कापसाचे दर दबावत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे नक्कीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंताजनक आहे. या शिल्लक असलेल्या साठ्यामुळे दारात घसरण येण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a comment