Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Kapus UPDATE : कापूस उत्पादकनासाठी महत्वाची बातमी, कापसाचे ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये काय असतील भाव? पहा सविस्तर…..

Kapus UPDATE : कापूस उत्पादकनासाठी महत्वाची बातमी, कापसाचे ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये काय असतील भाव? खरीप हंगामात कापसाची अधिक प्रमाणात लागवड केली जाते. कापूस हे एक खरीप हंगामातील एक प्रमुख पिक म्हणून ओळखलेले जाते. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस लावला जातो.

Kapus UPDATE :

कापूस उत्पादकनासाठी महत्वाची बातमी, कापसाचे ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये काय असतील भाव? खरीप हंगामात कापसाची अधिक प्रमाणात लागवड केली जाते. कापूस हे एक खरीप हंगामातील एक प्रमुख पिक म्हणून ओळखलेले जाते. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस लावला जातो.

 

त्यामुळे कापसाचे बाजारभाव व आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती याचा खूप जवळचा संबंध हा शेतकऱ्यांशी येतो. मागील तीन वर्षातील जर आपण ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किमती जर बघितल्या व त्यानुसार यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये काय बाजारभाव राहू शकतो याचा अंदाज देखील तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग सध्या आपण कापसाची स्थिती व बाजारभावाचे विश्लेषण थोडक्यात बघू.

Kapus UPDATE
Kapus UPDATE

 

यावर्षी कापसाच्या उत्पादनाचा अंदाज काय?

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्न धान्य उत्पादन अंदाज जर बघितला तर त्या अंदाजानुसार यावर्षी कापसाचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 10.73 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. तसेच देशातील चालू वर्षाच्या मे 2025 मध्ये कापसाचे आवक मागील वर्षाच्या मे 2024 च्या तुलनेत 49.84 टक्क्यांनी घटली आहे. तसेच युएसडीए-एफएएसचा अंदाज बघितला तर विपणन वर्ष 2024-25 मध्ये भारतातील कापूस उत्पादन 25.4 दशलक्ष 480 Ib bales आहे. तसेच शेतकरी कापूस लागवडी पेक्षा डाळी तसेच मका आणि भात सारख्या उच्च परतावा पिकांकडे वळतील अशी एक शक्यता असल्यामुळे पेरणी केलेल्या एकूण 12.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

Kapus UPDATE
Kapus UPDATE

राजकोट बाजारातील मागील तीन वर्षातील कापूस दरांची स्थिती

आपल्याला माहित आहे की गुजरात राज्यामध्ये कडी तसेच राजकोट या ठिकाणी कापसाचे जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचा कापसाचा पुरवठा तसेच मागणी याचा खूप मोठा परिणाम देशातील कापूस बाजारभावावर होत असतो. जर मागील तीन वर्षातील राजकोट बाजारातील कापसाचे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील दर बघितले तर 2022 च्या आक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 7 हजार 939 रुपये प्रतिक्विंटल होते.

2023 च्या याच महिन्याच्या कालावधीत 8710 रुपये प्रति क्विंटल, 2024 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 7 हजार 89 रुपये प्रतिक्विंटल होता. खरीप हंगाम 2025-26 साठी म्हणजेच चालू खरीप हंगामात मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत 7710 रुपये प्रति क्विंटल इतके जाहीर करण्यात आलेली असून या सगळ्या परिस्थितीनुसार जर बघितले तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये कापसाचा बाजार भाव 7400 ते 8400 रुपये प्रति क्विंटर राहील असा जाणकारांचा अंदाज आहे.

Leave a comment